भेटण आणि दुरावण हीच तर जीवनाची दिशा आहे,
पण दुरावण आणि पुन्हा भेटण हि आशा आहे.
आधी भेट मग दुरावा, या जगाची रीत आहे.
पुन्हा भेटीची आस, त्या जगण्याचे संगीत आहे.
भेटण आणि दुरावण, जरी जीवनाचं सार आहे,
दुरावून पुन्हा भेटण आशेच महाद्वार आहे.
भेटण आणि दूर होण, हेच करीत असते माणसांची फौज
पण दूर होण आणि पुन्हा भेटण यातच आहे जगण्यातली मौज.
जरी परत भेट झाली योगायोग समजावा,
आशावादी जीवनाचा उगम झाला मानावा
मिलन आणि विरह हा नियम या नियतीचा,
विऱ्हातुनही मिलन व्हावे किरण हवा आशेचा.
भेटून विलगणे विलगून भेटणे हि तर रीत जगण्याची
भेटण्यासाठी विलगणे हि आशा जगण्याची .
No comments:
Post a Comment