चालण्यासाठी वाट असते,
वाटेसाठी चालणं नसतं।उंच भरारी घेणा-यानां,
आभाळाचे भय नसते।
खुप खुप ताकद लागते,
आलेलं अपयश पचवायला।
डोळ्यात आलेलं पाणी पुसुन,
ओठाँवर हसु खेळवायला।
करण्यासारखं खुप आहे,
उमेद मात्र हवी।
मिळण्यासारखं ध्येय आहे,"जिद्द्"मात्र हवी!
दिवस सरले, राञ ओझरली,पाऊस ओथंबला,ऊनाला सावलीणं स्पर्श केला.....
पण मी माञ अधुरीच तुझाविना....
आणि तुझी वाट बघत आयुषभर......
तुझीच ....
मन हे असे का असते...????
मन हे असे का असते...????
मन हे असे काअसतेअसूनही स्वतःचे दुसर्याचे का भासते
असूनही सर्वांमध्ये एकाकी त्याचाच विचार करणारे,
दिसणार्या प्रत्येक चेहर्यात त्याचाचचेहरा पाहणारे,
नसता जवळी तो उगीच वेड लावते मन हे असे का असते ????
नाही येणार तो माहीत असूनही तासन तास सैरभैर वाट पाहणारे,
आजतरीमाझ्यासाठी त्याला वेळ मिळू देम्हणून देवाला प्रार्थना करणारे,
खोटीआस लावून स्वतःच स्वतःला फसवते
मन हे असे का असते ????
किती वेळा समझावे ह्याला नाही इथे कुणी कोणासाठी,
नाही आहे वेळ इथे कुणालाक्षणभरही तुझा विचार करण्यासाठी,
जाणते हे सर्व तरी त्याच्यासाठीच झुरते
मन हे असे का असते ????
डोळे पुसायला कुणीतरी असेल तर,रुसायला बरं वाटत;
ऐकणारे कुणीतरी असेलतर,मनातलं बोलायला बरं वाटत;
कौतुक करणारं कुणीतरी असेल तर, थकेपर्यंतराबायला बरं वाटत;
आशेला लावणारं कुणीतरी असेल तर,वाट बघायला बरं वाटत;
आपल्यासाठी मरणारं कुणीतरी असेल तर,मरेपर्यँत जगायला बरं वाटत....
No comments:
Post a Comment