जीवन ही एक रंगभूमीच,
फरक फक्त एवढाच,
रंगभूमी तीन भिंतीची,
जीवन भिंतीहीन.
भिंती असतात मर्यादेच्या-
मेकप न करताच-
प्रत्येकजण आपापल्या
भूमिका निभावत असतो,
अगदी न चुकता-
तिथ प्रक्टीसची जरूर नसते,
नेपथ्य पार्श्वसंगीताला मज्जावच
दिगदर्शकतर नसतोच म्हणा
शब्दाभिनय सगळ आपलच
प्रत्येकाचाच गैरसमज
निर्माता मात्र दोर्यांनी स्वत
काठ्पुतल्याना नाचवीत असतो.
जीवन ही एक रंगभूमीच
No comments:
Post a Comment