Thursday, May 3, 2012

शब्द...आणि....स्पर्श....


*शब्द...
शब्दांची जुळवाजुळव करता आली की माणसाला भाषा येऊ लागते...
पण फक्त शब्दांची भाषा यायला लागली की आपल्याला "संवाद" जमायला लागलाय या
भ्रमात माणसं जगत असतात...

आयुष्यातल्या काही अनमोल क्षणांमध्ये शाब्दिक संवाद काम करत नाही... तिथे शब्द
द* *ुय्यम पडतात...
अश्या क्षणांमध्ये भावनिक संवाद होतो... आणि भावनिक संवादाची एकमेव भाषा
म्हणजे,

"स्पर्श"....

जिथे शब्द संपतात तिथे स्पर्श काम करते...
ही भाषा शिकावी लागत नाही...
अंतरमनाचे धागे जुळले ना की स्पर्शाची भाषा आपोआपच येते...


लहानपणी आईच्या कुशीत झोपलेले असतांना तिने मायेने डोक्यावरून फिरवलेला हाथ...
पहिला नंबर आल्यावर बाबांनी पाठीवर दिलेली कौतुकाची थाप...
आजीच्या सुरकुत्यांशी खेळतांना वाटणारी मजा...
भांडता भांडता तिला जवळ ओढून तिच्या कपाळावर हळूच विसावलेले त्याचे होठ...
अन त्याक्षणी एका अनामिक ओढीने त्याला बिलगून तिच्या अस्तित्वाची जाणीव करून
देणारी तिची मिठी...

ह्या सगळ्या गोष्टींना पूर्णत्व द्यायची ताकद शब्दांत नाही... तिथे फक्त
स्पर्शाचीच भाषा लागते...

शब्द या सर्व भावनांना फक्त जन्म देतात...
पण त्या खऱ्या अर्थाने "जगायला" ते स्पर्श अनुभवावेचं लागतात...*

No comments:

Post a Comment