Monday, May 7, 2012

*आईची ममता , वडिलांचे प्रेम *

*आईची ममता , वडिलांचे प्रेम *
बहिणीची माया, वृक्षाची छाया
इकडून तिकडून सारखीच ...!

सुखाची चाहूल, दुखाचे सावट
दिवसाचा आयाम अन रात्रीचा आराम
इकडून तिकडून सारखाच ...!

मौनाची भाषा, भाषेचे मौन
जाणिवेच भान अन भानामधली जाणीव
इकडून तिकडून सारखीच ...!

दगडातला देव, प्रार्थनेचे पेव
हार, तुरे , नैवेद्य प्रसाद अन पुढचे निर्माल्य
इकडून तिकडून सारखेच ...!

हसणारे चेहरे, चेहर्यांवरच हास्य
चौपाटीवरची भेळ अन उंदरा-मांजरांचा खेळ
इकडून तिकडून सारखाच ...!

गवताची हिरवी पाती, निधडी कडवी छाती
ओली सुपीक माती अन घट्ट गुंतलेली नाती
इकडून तिकडून सारखीच ...!

सांताचा पाठलाग अनंताचा मागोवा
भक्तीचा ओलावा अन अंताचा सुगावा
इकडून तिकडून सारखाच....

No comments:

Post a Comment