Saturday, May 12, 2012

*प्रवास जीवनाचा *

*प्रवास जीवनाचा *
एखाद्याची आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचण्याची गती 'संथ' असली म्हणून त्याला
नाकर्ता ठरवणं हे कितपत योग्य आहे हे मला नाही कळत...
झटपट शिखर गाठण्याच्या नादात बेधुंद होऊन प्रवास करणारे कदाचित पेहले शिखरावर
पोहोचतीलही...
पण जेंव्हा वाटेत अडथळा येतो तेंव्हा गती जितकी जास्त तितक्या जोरात अपघात
होतो...
अपघात जेवढा मोठा जखमाही तितक्याच गंभीर...
अन गंभीर जखमा भरायला वेळही खूप जास्त लागतो...

याउलट जे संथ पण खंबीर पणे प्रवास करत असतात त्यांच्या वाटेत अडथळा आला तरी
त्यांना फक्त ठेच लागते...
ती माणसं सहसा पडत नाहीत... अशी ठेच जखम करत नाही असं नाही... पण ती फक्त
तात्पुरती जखम..
एकदा का ती जखम भरली की ते परत पुढच्या प्रवासासाठी सज्ज होतात...
एकदा ठेच नक्की कुठे लागतेय हे कळालं की मग माणूस पुढच्या वेळी जरा जास्त सावध
राहतो ..
अशी माणसं मग जास्त लांब प्रवास करतात..

तसंपण सस्याच्या अन कासवाच्या शर्यतीत शेवटी विजय कोणाचा होतो हे सगळ्यांना
चांगलच ठाऊक आहे !!!!

No comments:

Post a Comment