Thursday, May 3, 2012

'माणूस'

*मला ना या 'माणूस' नावाच्या प्राण्याचं कोडं काही केल्या सुटत नाही...
का इतकं विचित्र वागतो तो...

त्याला दगडात देव दिसतो...* *
मग माणसातला 'माणूस' का नाही दिसत...

* * असं म्हणतात देवाने सृष्टी निर्माण केली अन माणूस पण...
पण हे किती अंशी खरं आहे यावर मला खूप शंका आहे... आणि ती या माणसामुळेच...

कुठल्या दगडात देव आहे हे ठरवणारा कोण.. तर माणूस...* *
कोणाचा देव कुठला, कोणत्या देवाचा कोणता रंग हे ठरवणारा कोण... माणूस...
कोणत्या देवाची पूजा करायची, कोणत्या देवासमोर मेणबत्ती लावायची, कोणाला
जाळायचं कोणाला दफन करायचं हे ठरवणार माणूस...
अहो हे तर सोडा चक्क वार पण वाटून टाकलेत माणसांनी देवांसाठी... अमुक एक वारी
हा देव अन अमुक एक वारी तो देव... त्यातपण भारतातले अर्धे अधिक देव तर Waiting
list मधे आहेत... देवच इतके आहेत करणार काय...
भक्ती आणि माणुसकी यांचा अर्थ कळतोय कोणाला इथे...
देवाची आठवण पण कधी येते आपल्याला.. परीक्षेत पास होण्यासाठी, नौकरीत
बढतीसाठी, चांगलं नवरा मिळण्यासाठी... म्हणजे जेंव्हा काही 'हवं असतं'
तेंव्हाच...
बरं त्यात पण पास झालो तर ते "आपल्या मेहनतीमुळे".. अन नापास झालो की सगळं
खापर देवावर फोडायचं.. काय चुकलं माझं... दर शनिवारी दिवा लावायचो..

देव सगळ्यांवर सारखाच प्रेम करतो हो... त्याला रंगात, जातीत भेद करता येत
नाहीत.. कारण निर्माण करतांना त्याने फक्त माणूस निर्माण केला होता... अन
माणुसकी हा एकच धर्म ही ...* *
रंग, जात, पात हे सगळे भेद निर्माण करणारा माणूस...

No comments:

Post a Comment