Tuesday, May 29, 2012

ह्या मातीच ऋण फेडायचं... ह्या मातीच आपण काही देणं लागतो...

    ह्या मातीच ऋण फेडायचं... ह्या मातीच आपण काही देणं लागतो...
    ही असली वाक्य आपण ऐकलीच असतील...
    पण काही वर्षांपूर्वीच...

    आजकालच्या so called 'Modern' माणसाचा मातीशी संबंध राहिलाच कुठे आहे...
    मातीची घरं...
    अर्थातच... आजही काही गावात आहेत मातीची घरं... पण खूप मोजकीच...
    बाकी गावांच शहरीकरण झालं... अन मातीची जागा सिमेंट ने घेतली...
    अन Modernization च्या धुंदीत बेधुंद झालेल्या या शहरी माणसाला मातीची कधी
    'धूळ' झाली हे कळलंच नाही...
    मातीची धूळ झाली आणि धुळीची 'Allergy'... अन झाला माणूस मातीपासून दूर...

    ज्या घरात राहतात... त्या घरातली माणसं सुद्धा तशीच वागतात...
    जशी गरज तश्या आकारात घडण्याचा मातीचा गुणधर्म नकळतच मातीच्या घरात राहणाऱ्या
    माणसांत पण यायचा...
    ती माणसं मोकळ्या मनाने वागायची, समजून घ्यायची, मिळून-मिसळून राहायची...

    मग माणसांनी सिमेंट ची घरं बांधलीत अन त्यांची मनं त्यांनी त्यात कोंडून
    घेतली...
    आणि वरवरच्या रंगरंगोटी ने माखलेल्या या सिमेंट च्या घरातली माणुसकीच हरवली...

    सगळे जण आपले घराचे अन मनाचे दोन्ही दारं बंद करून मधे पडून असतात हल्ली !!!



    --


    *जे आपल्याला हवं असतं, ते आपल्याला कधी मिळत नसतं, कारण जे आपल्याला मिळतं,
    ते आपल्याला नको असतं, आपल्याला जे आवडतं, ते आपल्याकडे नसतं, कारण जे
    आपल्याकडे असतं,
    ते आपल्याला आवडत नसतं, तरीही आपण जगतो आणि प्रेम करतो, याचंच नाव 'आयुष्य'
    असतं...!*

Monday, May 14, 2012

* आपल कोणीतरी असण्यापेक्षा *



आपल कोणीतरी असण्यापेक्षा
आपण कोणाचे असण्यात आनंद आहे
चार दिवास झिजण्यापेक्षा
एका दिवसाच्या जीवनचा अर्थ आहे
वादळातून चालण्यापेक्षा वादळात
मोहेन पडण्यात समर्पण आहे
कठावरून डोकावण्यापेक्षा
पुरामध्ये झोकून देण्यात जीवन् आहे
कोणी आपल्यासाठी झुरण्यापेक्षा
आपण कुणासठीतरी झुरण्यात प्रीत आहे,
आपल कोणीतरी असण्यापेक्षा
आपण कोणाचेतरी असण्यात आनंद आहे*

Saturday, May 12, 2012

*प्रवास जीवनाचा *

*प्रवास जीवनाचा *
एखाद्याची आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचण्याची गती 'संथ' असली म्हणून त्याला
नाकर्ता ठरवणं हे कितपत योग्य आहे हे मला नाही कळत...
झटपट शिखर गाठण्याच्या नादात बेधुंद होऊन प्रवास करणारे कदाचित पेहले शिखरावर
पोहोचतीलही...
पण जेंव्हा वाटेत अडथळा येतो तेंव्हा गती जितकी जास्त तितक्या जोरात अपघात
होतो...
अपघात जेवढा मोठा जखमाही तितक्याच गंभीर...
अन गंभीर जखमा भरायला वेळही खूप जास्त लागतो...

याउलट जे संथ पण खंबीर पणे प्रवास करत असतात त्यांच्या वाटेत अडथळा आला तरी
त्यांना फक्त ठेच लागते...
ती माणसं सहसा पडत नाहीत... अशी ठेच जखम करत नाही असं नाही... पण ती फक्त
तात्पुरती जखम..
एकदा का ती जखम भरली की ते परत पुढच्या प्रवासासाठी सज्ज होतात...
एकदा ठेच नक्की कुठे लागतेय हे कळालं की मग माणूस पुढच्या वेळी जरा जास्त सावध
राहतो ..
अशी माणसं मग जास्त लांब प्रवास करतात..

तसंपण सस्याच्या अन कासवाच्या शर्यतीत शेवटी विजय कोणाचा होतो हे सगळ्यांना
चांगलच ठाऊक आहे !!!!

माणसांच आयुष्यं हे त्या दिव्यासारखं असतं...

दुसऱ्यांना सुखी आणि आनंदी ठेवण्यासाठी स्वतःला त्रास करून घेऊन जगणाऱ्या
माणसांच आयुष्यं हे त्या दिव्यासारखं असतं...
एखाद्याच्या आयुष्यात अंधार पडला की मग त्यांना दिव्याची आठवण येते...
दिव्याच सामर्थ्य हेच... तो स्वतः जळत राहतो पण परिसरातला अंधार नाहीसा करून
तिथे रोषणाई करतो...

अन असं नाही की त्याला जळत राहायला त्रास होतो...
त्यात जोपर्यंत प्रेमाचं, किंमतीच, विश्वासाचं तेल ओतलं जातं तोपर्यंत तो दिवा
अगदी स्वखुशीनं जळत राहतो...
त्याला बस तेवढंच हवं असतं...

पण शेवटी माणसं ही... अंधारात त्यांचे चेहरे दिसत नाहीत...
अन जेंव्हा त्या अंधाऱ्या रात्रीची पहाट होते तेंव्हा त्या उजेडात त्यांचे खरे
चेहरे समोर येतात...
तेंव्हा त्यांची "गरज" संपलेली असते... अश्या वेळी मग ते हमखास दिवा विझवतात...
मग विझवलेल्या दिव्याच्या आयुष्यात भर दिवसा "अंधार" पडतो...

विझलेले दिवे कोणाच्याच आयुष्यातला अंधार दूर करू शकत नाहीत...

"स्वतःच्या सुद्धा नाही" !!!!
 

तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार....

तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार....



आधी विचार करा, मग कृती करा.

स्वाभिमान असावा पण गर्व नसावा.......

आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही!

शुद्ध बीजपोटी फले रसाल गोमटी!

निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही......

ठरवलेले सर्व मिळत नाही , पण जे आपण ठरवतो त्यासाठी आपले प्रयत्न कमी पडले तर
जे आपण ठरवतो त्याच्याशी आपण कधीच प्रामाणिक नसतो.

मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.

आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव
तुम्हाला देईल.

सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

*स्त्री ...''

*स्त्री ...''
.
सख्यांच्या सहवासात रमनारी ती एक
'मैत्रिण' असते......
तो आपल्याशिच लग्न करेल ना? अशी हुरहुर
वाटानारी ती एक 'प्रेयसी' असते.........
नवार्याची घरी यायची नेहेमीची वेळ
गेली की काळजी करणारी ती एक 'बायको'
असते....
मुलाना उशीर झाला की व्याकुलतेने वाट
पाहनरी ती एक 'आई' असते.........
बाबांचा राग झेलनारी ती एक 'मुलगी'
असते......
भाऊबिजेला भावाकडून भेट मिलाल्यावर
आनंद होनारी ती एक 'बहिन' असते............
आयुष्यात अशी नाती जपनारी ती एक
शेवटी एकटीच असते........!!!*

मी असाच आहे


मी असाच आहे,
एकटा एकटा जगणारा....
सर्वात असाताना देखील,
स्वतःहाच्या शोधात फिरणारा.....

मी असाच आहे,
खुप प्रेमाने बोलणारा....
आपल्या सरळ वागण्याणे ,
कुणालाही सहज आपलसं करणारा......

मी असाच आहे,
जीवानाच मर्म जाणणारा....
साध्या मैत्रीच्या नात्यालाही,
आपला धर्म मानाणारा.....

मी असाच आहे,
दुखाःतही नेहमी हसणारा....
अन हसत हसता
नियतीला लाजवणारा....

मी असाच आहे,
इतरांना सतत प्रकाश वाटणारा....
पण स्वतःहा मात्र,
काळोखात आठणारा.....

मी असाच आहे,
सगळ्यांपासुन दुर दुर जाणारा
जाताना मात्र सगळ्यांच्या मनात
**घर एक करुन राहणारा...*

लढ रे मना हिम्मत तु साठवून...

लढ रे मना हिम्मत तु साठवून...


नको मागे फिरू तु आशी पाठ दाखवून
लढ रे मना हिम्मत तु साठवून

जाईल हे ही वादळ थोडा वेळ घोघालुन
तगायचय तुला आपल्यांना आठवून

लक्ष्यात ठेव प्रत्येक वादळlला शेवट हा असेलच
घाबरला आहेस तरी निट बघ मार्ग तुला दिसेलच

नको मागे फिरू तु आशी पाठ दाखवून
लढ रे मना हिम्मत तु साठवून

माहित आहे दुबळl आहेस तु टिकायला
काहीच नाही आहे तुझ्याकडे लढायला

तरी ही ललकारया देत रहा ओरडून ओरडून
नको मागे फिरू तु आशी पाठ दाखवून

लढ रे मना हिम्मत तु साठवून
लक्ष्यात ठेव वादळच खुप काहि शिकवितात

प्रत्येक वेळी ते तुमच आयुष्यच बद्लवितात
उपयोग कर त्यांचा स्वताला तपासायला

काय आहोत आपण? आणि काय होवू शकतो हे जनायला
नको हाथ पाय गालु रूप त्याचे पाहून

स्वार हो त्यावर लढायचे ठरवून
नको मागे फिरू तु आशी पाठ दाखवून

लढ रे मना हिम्मत तु साठवून

 

Monday, May 7, 2012

" : आळशी माणसं खुप हुशार असतात :".

" : आळशी माणसं खुप हुशार असतात :". माझ्या या वाक्यावर आईची प्रतिक्रिया
ठरलेली आहे. "बरं बाई.तुमचा रेडा गाभणा. देतो, चांगलं दहा शेर दुध देतो."
आळशीपणा आणि हुशारी यांचं समीकरण जरीआईला पटलं नसलं तरी माझा यावर ठाम विश्वास
आहे. माझ्या अनेक [आळशी] आप्तेष्टांचा या मताला सुप्त पाठींबा आहे हे मला ठाऊक
आहे.

आळशी माणसं कधीही कौटन किंवा रंग जाणारे कपडे विकत घेत नाहीत. सिंन्थेटिक,
म़ळखाऊ रंगाचे, मशिन वाश/ बाई वाश असेच कपडे घेतात. रिंकल फ्री कापड हा त्यांचा
आवडता प्रकार. १-१ कपडा वेगळा धुणार कोण आणि कौटनच्या कपडयाला इस्त्री करणार
कोण? एवढा सगळा विचार कपडे घेताना करावा लागतो आणि त्यासाठी चणाक्ष बुध्दी
लागते. रात्री झोपायच्या आधी दिवा बंद करायलाउठायचं नसेल तर जवळ स्वीच घेण्याची
व्यवस्था घराचं वायरिंग चालु असतानाच करुन घ्यावी लागते. इतक्या बारीक-सारीक
गोष्टी लक्षात ठेवुन करणं हे काही येरागबाळ्याचं काम नाही. म्हणजे नंतर नुसता
हार घातला की काम झालं. ;D

ही माणसं जेवतात अगदी सावकाश. यांच जेवण होइपर्यंत ताटं उचलुन झालेली असतात,
उरलं सुरलं काढुन ठेवलेलं असतं. अगदी पुसुन घ्यायची वेळ झाली तर ताट हातात घेऊन
जेवत बसतात. नंतर यांना काही काम पडत नाही. हे लोक बहुदा भात खात नाहीत. भाता
आधीचं जेवण होईपर्यंत एतकाचेंगटपणा करतात की भाताची आणि झोपेची वेळ एकच येते.
बरं भात खाल्ला नाही म्हणजे जाडी वाढत नाही आणि जाडी वाढली नाही म्हणजे व्यायाम
करावा लागत नाही. चहा गाळल्यावर चोथा हातांनीकधी काढत नाहीत, त्यात पाणी घालुन
परत गाळतात आणि तेच डस्ट-बीन वर आदळतात. देवालाही सोडत नाहीत. पुजेला बसताना
पंचपात्रात पाणी घ्यायला नको म्हणुन सरळ देवाला नळाखाली धरतात. चेष्टा नाही -
प्रत्यक्ष पाहिलं आहे. ;D

हे लोक पब्लिकमध्ये मात्र प्रिय असतात. कधीही फारशी कटकट करत नाहीत.
महिनोंमहिने यांचं पासबुक अपडेटेड नसतं. ते असावं असा त्यांचा हट्टही नसतो.
बँकेत गेले आणि प्रिंटर बंद असेल तर सरळ बाहेर येतात. वाट बघत किंवा हुज्जत
घालत बसत नाहीत. भाजी घेताना कोणती भाजी केवढ्याला बगैरे विचारत बसत नाहीत.
सगळं घेऊन झालं की एकदमच कीती झाले ते विचारतात. जणु काही त्यांनीच आपल्याला
गणित शिकवलंआहे अशा थाटात मान डोलवत पैसे देऊन मोकळे होतात. तो सुट्टे नाहीत
म्हणाला तर उरलेले पैसे त्याला दान करतात. आपले पाकिट उलथं-पालथं करुन सुट्टे
शोधायच्या किंवा शेजारच्या दुकानातुन सुट्टे करुन घ्यायच्याभानगडीत पडत नाहीत.
त्यामुळे भाजीवाले, रिक्षावाले इ. लोक यांच्यावर सदैव खुष असतात. अशा
लोकांमुळेचतर रिक्षा, टॅक्षी चालु आहेत. अहो, चितळे, वैद्य यंचा धंदा चाललाच
नसता जर सगळ्याच बायकांनी मोदक, पुरणपोळी घरीच करायच ठरवलं असतं तर. :D :D :D

ही शोधाची जननी आहे" आळशी लोक काम बाकी छान करुन घेतात. उंटावरुन शेळ्य हाकायची
सवय असते ना. आपलं काम समोरच्याकडुन कसे करुन घ्यावं हे त्यांना बरोबर कळते.
आळशीपणा हा एक गुण "मॅनेजर" म्हणवुन घेणा-या प्राण्याकडे असणं आवश्यक आहे असं
मला
मनापासुन वाटतं. अति उत्साही मॅनेजर प्रत्येक-न-प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत
बसतो. आपलं काम तर वाढवतोच पण हाताखालच्या लोकांना फार इरीटेट करतो. खरंतर
माणुस आळशी आहे म्हणुनच तो उत्क्रांत झाला. दुनिया ज्यांची सारखी उदाहरणे देत
असते त्या मुंग्या, मधमाशा किंवा कोळ्यासारखं काम करत बसला असता तर
त्यांचासरखाच राहिला असता. माझ्या मते, "गरज ही शोधाची जननी आहे" असं
म्हणण्यापेक्षा "आळस ही शोधाची जननी आहे" असं म्हटलं पाहिजे. :D ;D :D

पायावर चालत राहिला असता तर वाहनं तयार झालीच नसती. सगळे निरोप प्रत्यक्ष जाऊन
सांगायचे ठरवले असते तर पोस्ट, टेलिग्राम, ई-मेल या गोष्टी अस्तित्वात आल्याच
नसत्या. रीमोट कंट्रोल, कौर्डलेस फोन यांची गरज किती होती बघा आणि त्यामागे आळस
किती होता ते बघा.... आणि आता तुम्हींच सांगा - आळशीपणा आणि हुशारी यांच नातं
आहे की नाही? :-[
मनापासुन वाटतं. अति उत्साही मॅनेजर प्रत्येक-न-प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत
बसतो. आपलं काम तर वाढवतोच पण हाताखालच्या लोकांना फार इरीटेट करतो. खरंतर
माणुस आळशी आहे म्हणुनच तो उत्क्रांत झाला. दुनिया ज्यांची सारखी उदाहरणे देत
असते त्या मुंग्या, मधमाशा किंवा कोळ्यासारखं काम करत बसला असता तर
त्यांचासरखाच राहिला असता. माझ्या मते, "गरज ही शोधाची जननी आहे" असं
म्हणण्यापेक्षा "आळस ही शोधाची जननी आहे" असं म्हटलं पाहिजे. :D ;D :D

पायावर चालत राहिला असता तर वाहनं तयार झालीच नसती. सगळे निरोप प्रत्यक्ष जाऊन
सांगायचे ठरवले असते तर पोस्ट, टेलिग्राम, ई-मेल या गोष्टी अस्तित्वात आल्याच
नसत्या. रीमोट कंट्रोल, कौर्डलेस फोन यांची गरज किती होती बघा आणि त्यामागे आळस
किती होता ते बघा.... आणि आता तुम्हींच सांगा - आळशीपणा आणि हुशारी यांच नातं
आहे की नाही? :

चुकांपासुन धडा घ्या आणि पुढे चला !

चुकांपासुन धडा घ्या आणि पुढे चला !
learn mistakes anger management life balance personality developement


“To err is human” अशी इंग्लिशमध्ये एक म्हण आहे याचा अर्थ “माणसाकडून चुका
होतातच”. ऑफिसमध्ये, घरी, मित्रांसोबत, समारंभात कधीतरी कुठेतरी आपण चुकत
असतोच.आपल्याला आपली चुक कळते, त्यानंतर थोडी अपराधीपणाचे भावनाही मनात सलू
लागते.
मनावर संयम हवा, जिव्हानियंत्रण असावे, राग आटोक्यात असावा इत्यादी बरेच सल्ले
चुका होउ नये म्हणुन देण्यात येतात. पण तरी सुध्दा आपण चुकतोच. घाबरु नका, मी
काही तुम्हाला असे उपदेशाचे डोस देणार नाही आहे. तर आज आपण बोलु यात चुक
झाल्यानंतर (होय झाल्यानंतर , केल्यानंतर नव्हे!) ती चुक सुधारण्यासाठी कसे
वागावे आणि होणारा मनस्ताप कस टाळता येइल याबद्दल.

चुक सुधारण्याची सुरुवात होते चुक झाली आहे हे मान्य करण्यापासून.
तिर्‍हाइताच्या नजरेने आधी आपले वागणे तपासून पहा. चूक लक्षात येइलच (अर्थात
असल्यास!)

– आपल्या भावनांवर आणि मनावर नियंत्रण ठेवा. केलेल्या चुकीमुळे मन अस्थीर होउ
देउ नका. एक मोठा श्वास घ्या आणि हळु हळु सोडा. मनाला थोडे ताजे करा.

– चुक घडुन गेल्यानंतर लगेचच त्याचा विचार करु नका. अथवा प्रतीक्रिया देउ नका.
थोडा वेळ घ्या (२-३ तास) आणि तोपर्यंत दुसर्‍या एखाद्या गोष्टीत लक्ष गुंतवा.

– एकदा तुम्ही फ्रेश झालात की मग झालेल्या चुकीचा विचार करा. “4 Q” थीअरीचा
वापर करा. म्हणजेच ( Why) असे का घडले?, (which) कशामुळे घडले?, (How) जे झाले
ते कसे सावरता येइल? (who) झाल्या प्रकारामुळे कोण कोण दुखावले गेले आहेत? हे
चार प्रश्न स्वतःला विचारुन त्यांची उत्तरे शोधा.

– झाला प्रकार सावरण्यासाठी काही करता येइल का ते पहा. जर काही करता येण्याची
अंधुकशी देखिल शक्यता असेल तर जरुर करा.

– आणि अगदिच काही करण्यासारखे नसेल तर पुन्हा अशी चुक करणार नाही हे मनाशी
पक्के ठरवा.
– झाल्या चुकीचा परीणाम सध्या हाती असलेल्या कामांवर होउ देउ नका. त्यामुळे
जास्त चुका होण्याचा संभव असतो.

– पश्चाताप करुन काहीच हाती लागत नाही. आणि चिंता करुन झाले तर नुकसानच होते.
म्हणुन हे दोन्ही टाळा.

– Sorry म्हणा. होय हा सगळ्यात सोपा उपाय आहे. बर्‍याच लोकांना सॉरी (Sorry)
म्हणणे कमीपणाचे वाटते. पण तसे काही नसते. आपली चुक असल्यास सॉरी म्हणण्यास
काहीच हरकत नाही.

– पण फक्त नावापुरता सॉरी म्हणुन उपयोग नाही. “Saying sorry will not help,
you should feel sorry” मनापासुन खंत वाटली पाहीजे आणि मनापासुन माफी मागीतली
पाहीजे.

– कधीही आपल्या वागण्यामुळे एखादी व्यक्ती दुखावली असल्यास क्षणभर ती व्यक्ती
महत्त्वाची आहे की ज्या गोष्टीशी संबंधीत चुक याचा विचार करा. उत्तर तुम्हाला
आपोआप मिळेल.

– शहाणा आणि मुर्ख माणसात अथवा यशस्वी आणि अपयशी माणसात एक फरक असतो. शाहाणा
माणुस झालेल्या चुकांमधुन धडा घेतो आणि पुढे जातो. मुर्ख माणुस एकदा केलेल्या
चुकांमधुन काहीच न शिकता त्याच चुका वारंवार करत राह्तो.

*आईची ममता , वडिलांचे प्रेम *

*आईची ममता , वडिलांचे प्रेम *
बहिणीची माया, वृक्षाची छाया
इकडून तिकडून सारखीच ...!

सुखाची चाहूल, दुखाचे सावट
दिवसाचा आयाम अन रात्रीचा आराम
इकडून तिकडून सारखाच ...!

मौनाची भाषा, भाषेचे मौन
जाणिवेच भान अन भानामधली जाणीव
इकडून तिकडून सारखीच ...!

दगडातला देव, प्रार्थनेचे पेव
हार, तुरे , नैवेद्य प्रसाद अन पुढचे निर्माल्य
इकडून तिकडून सारखेच ...!

हसणारे चेहरे, चेहर्यांवरच हास्य
चौपाटीवरची भेळ अन उंदरा-मांजरांचा खेळ
इकडून तिकडून सारखाच ...!

गवताची हिरवी पाती, निधडी कडवी छाती
ओली सुपीक माती अन घट्ट गुंतलेली नाती
इकडून तिकडून सारखीच ...!

सांताचा पाठलाग अनंताचा मागोवा
भक्तीचा ओलावा अन अंताचा सुगावा
इकडून तिकडून सारखाच....

Thursday, May 3, 2012

आभाळात उडणारा पक्षी.....


आभाळात उडणारा पक्षी,
किती बेधुन्द होऊन उडतो...
पंखांच्या बाळा वर,
वार्य़ाशी तो लाडतो...
कस ही आसला आभाळ,
तो मात्र उडत्च राहतो..
आभाळात त्या,
आपले जाग तो शोधू पाहतो...
मला ही आज त्या पक्षा सारखा उडयेचे आहे,
पंखांच्या बळावर,
वार्य़ाशी लाडयचे आहे...
कस ही असला आभाळ,
मला मात्र उडत्च राहीचे आहे..
आभाळात त्या आपले जाग शोधायेचे आहे.....

!! निर्णय !!

!! निर्णय !!

निर्णय चुकतात आयुष्यातले आणि मग आयुष्याच चुकत जाते ..
प्रश्न कळत नाही कधी कधी आणि उत्तरही चुकत जाते ..
सोडवताना वाटते , सुटत गेला गुंता ..
पण प्रत्येक वेळी 1 नवीन गाठ बनत जाते ..
दाखवणाऱ्याला वाट माहित नसते ..
चालानार्याचे ध्येय मात्र हरवून जाते ..
वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी ..
"अनुभव " म्हणजे काय हे तेव्हाच कळते ...!!
जेव्हा एखादी "ठेच " काळजाला लागते ....!

शब्द...आणि....स्पर्श....


*शब्द...
शब्दांची जुळवाजुळव करता आली की माणसाला भाषा येऊ लागते...
पण फक्त शब्दांची भाषा यायला लागली की आपल्याला "संवाद" जमायला लागलाय या
भ्रमात माणसं जगत असतात...

आयुष्यातल्या काही अनमोल क्षणांमध्ये शाब्दिक संवाद काम करत नाही... तिथे शब्द
द* *ुय्यम पडतात...
अश्या क्षणांमध्ये भावनिक संवाद होतो... आणि भावनिक संवादाची एकमेव भाषा
म्हणजे,

"स्पर्श"....

जिथे शब्द संपतात तिथे स्पर्श काम करते...
ही भाषा शिकावी लागत नाही...
अंतरमनाचे धागे जुळले ना की स्पर्शाची भाषा आपोआपच येते...


लहानपणी आईच्या कुशीत झोपलेले असतांना तिने मायेने डोक्यावरून फिरवलेला हाथ...
पहिला नंबर आल्यावर बाबांनी पाठीवर दिलेली कौतुकाची थाप...
आजीच्या सुरकुत्यांशी खेळतांना वाटणारी मजा...
भांडता भांडता तिला जवळ ओढून तिच्या कपाळावर हळूच विसावलेले त्याचे होठ...
अन त्याक्षणी एका अनामिक ओढीने त्याला बिलगून तिच्या अस्तित्वाची जाणीव करून
देणारी तिची मिठी...

ह्या सगळ्या गोष्टींना पूर्णत्व द्यायची ताकद शब्दांत नाही... तिथे फक्त
स्पर्शाचीच भाषा लागते...

शब्द या सर्व भावनांना फक्त जन्म देतात...
पण त्या खऱ्या अर्थाने "जगायला" ते स्पर्श अनुभवावेचं लागतात...*

'माणूस'

*मला ना या 'माणूस' नावाच्या प्राण्याचं कोडं काही केल्या सुटत नाही...
का इतकं विचित्र वागतो तो...

त्याला दगडात देव दिसतो...* *
मग माणसातला 'माणूस' का नाही दिसत...

* * असं म्हणतात देवाने सृष्टी निर्माण केली अन माणूस पण...
पण हे किती अंशी खरं आहे यावर मला खूप शंका आहे... आणि ती या माणसामुळेच...

कुठल्या दगडात देव आहे हे ठरवणारा कोण.. तर माणूस...* *
कोणाचा देव कुठला, कोणत्या देवाचा कोणता रंग हे ठरवणारा कोण... माणूस...
कोणत्या देवाची पूजा करायची, कोणत्या देवासमोर मेणबत्ती लावायची, कोणाला
जाळायचं कोणाला दफन करायचं हे ठरवणार माणूस...
अहो हे तर सोडा चक्क वार पण वाटून टाकलेत माणसांनी देवांसाठी... अमुक एक वारी
हा देव अन अमुक एक वारी तो देव... त्यातपण भारतातले अर्धे अधिक देव तर Waiting
list मधे आहेत... देवच इतके आहेत करणार काय...
भक्ती आणि माणुसकी यांचा अर्थ कळतोय कोणाला इथे...
देवाची आठवण पण कधी येते आपल्याला.. परीक्षेत पास होण्यासाठी, नौकरीत
बढतीसाठी, चांगलं नवरा मिळण्यासाठी... म्हणजे जेंव्हा काही 'हवं असतं'
तेंव्हाच...
बरं त्यात पण पास झालो तर ते "आपल्या मेहनतीमुळे".. अन नापास झालो की सगळं
खापर देवावर फोडायचं.. काय चुकलं माझं... दर शनिवारी दिवा लावायचो..

देव सगळ्यांवर सारखाच प्रेम करतो हो... त्याला रंगात, जातीत भेद करता येत
नाहीत.. कारण निर्माण करतांना त्याने फक्त माणूस निर्माण केला होता... अन
माणुसकी हा एकच धर्म ही ...* *
रंग, जात, पात हे सगळे भेद निर्माण करणारा माणूस...

Wednesday, May 2, 2012

जाणे कुठे हरवले ते दिवस...

*जाणे कुठे हरवले ते दिवस...
फुटलेल्या घोट्यांचे...
अन तुटलेल्या झोक्यांचे...

किती धडपडायचो तेंव्हा... काही गणितच नाही...* *
तेंव्हापण सोलायचेच ना कोपरे अन गुढगे...
थोडावेळ दुखायचे सुद्धा ..
घळाघळा वाहायचे अश्रू...
पण तितक्याच लवकर वाळून पण जायचे...
परत खेळायला लागलो ना की ते दुखणं कुठल्या कुठे पळून जायचे...

कारण तेंव्हा कारणे शोधा?? हा प्रश्न फक्त एकदाच, म्हणजे, वार्षिक परीक्षेतच
यायचा...
तसंपण तेंव्हा आपल्याकडे पाटी अन पेन्सील असायची...
जे वाटेल ते काढायचं... आवडलं तर परत परत तेच गिरवायच...
अन नाही आवडलं तर सरळ सरळ पुसून टाकायचं...


मग आपण मोठे झालो... आणि सगळी सोय गेली...
व्यावहारिक जगात अन स्वार्थी माणसांत "टिकून राहणं" म्हणजे रोजच एक नवी
परीक्षा...
त्या परीक्षेतल्या प्रश्नांची कारणं शोधता शोधता मग सगळी निरागसता हरवते...

न असलेली दुखणी पण मग अश्यावेळी खूप दुखायला लागतात...
कारण परत खेळ सुरु करायची आपल्या मनाची मुळीच इच्छा नसते...
त्यामुळे ते त्या नसलेल्या दुखण्यातच पळवाट शोधत फिरते...
अश्यावेळी मग अश्रू पण दगा देतात... मुक्तपणे गालावरून ओघळत नाहीत ते...
फक्त पापण्या ओल्या करून जातात...
ओल्या पापण्या सहसा कोणाला दिसत नाहीत... त्या बघायला अंतरंगाचे सूर जुळावे
लागतात... अन अशी माणसं खूप कमी भेटतात...

मोठेपणी आपली पाटी-पेन्सील हरवते...
आणि त्याची जागा घेते "Permanent Marker" ...
म्हणजे "पुसून टाकायची" सोय रहात नाही...
एकदा जे गिरवलं ते पुसता येत नाही...
त्याचे "Marks" फक्त आयुष्यभर आपल्या सोबत राहतात...

लहानपणीच्या जखमा शरीरावरचे सालटे काढतात...
अन मोठेपणीच्या..... मनावरचे !!!!*