Thursday, March 15, 2012

मन, कल्पना आणि आठवणं...

मन, कल्पना आणि आठवणं...
कुठलही भौतिक अस्तित्व नसणाऱ्या पण आपल्या अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग
असणाऱ्या आणि स्वतःचं अस्तित्व वेळोवेळी दाखवून देणाऱ्या गोष्टी..
मन तर आपलं विचित्रच...
वर्गात 'नागरिकशास्त्राचा' period चालू असतांना कुठल्यातरी थंड हवेच्या ठिकाणी
'पर्यावरणशास्त्राचे' धडे गिरवणं या मनाला कसं जमतं देवच जाणे...
कल्पनेचं पण काही तसंच...
... व्यावहारिक जगाच्या सत्यांना सामोरं जाता जाता सर्व सुखं सोयींनी समृद्ध
असलेल्या काल्पनिक जगात आपल्याला नेण्याचं सामर्थ्य फक्त कल्पनेमधेच असतं...
अन आठवनीन बद्दल तर बोलायलाच नको...
सुखं आणि दुखं या दोन्ही परस्पर विरोधी भावनांची अनुभूती एकाच वेळी करून देणं
आठवणींनाच जमतं...
"आपल्याकडे कमीत कमी आठवणी तर आहेत" ही गोष्ट जेवढी सुखावणारी तेवढीच
"आपल्याकडे आता फक्त आठवणीच आहेत" ही गोष्ट दुखावणारी...
सुखद आठवणी जास्त त्रास देतात...

पण या गोष्टींना भौतिक अस्तित्व नाही तेच बरं..
कारण अस्तित्व सिद्ध झालेल्या गोष्टींच्या सीमा ठरवायची माणसांना वाईट सवय
असते...
अन सीमा ठरवल्या गेल्यात की बंधनं येतात..

काही गोष्टींना बंधनं नसलेलीच बरं...

No comments:

Post a Comment