Thursday, March 15, 2012

क्षण तुझे अन् माझे

समोरच्या व्यक्तीने दिलेली सहानभूती दरवेळी आपले समाधान करेलच असे गरजेचे
नाही.
आयुष्याच्या काही क्षणी
"आपण पुरते फसलो आहोत, पण 'फसलो आहोत' असेही म्हणता येत नाहीयेय.
कारण जे मिळालंय ते मिळवण्याची मनापासून इच्छा होती.
जे आहे ते जीवघेणे नाहीयेय....पण ते जसे हवे होते,जसे अपेक्षित होते तसेही
नाहीयेय...
... सहानभूतीने थोडा धीर येईल पण आपली परिस्थिती जैसे थे तशीच राहणार आहे."
याची पूर्ण जाणीव झालेली असते.अश्या वेळी जवळ कुणी नको हवं असतं.
मनात आधीच विचारांची गर्दी असते,बाहेरची गर्दी स्वतःहून त्यात वाढवण्याची
मुळीच इच्छा नसते.
आपल्यावरच्या परिस्थितीच्या सर्व बाजू, सर्व +/- मुद्दे आपल्याला स्वतःला
माहित असतात,
पटतही असतात.....सुखासाठी तडजोड करावी लागणार ह्याची खात्री हि झालेली
असते.....
पण.......शेवटी एकच रुखरुख मनाला लागून राहते ती ह्याची गोष्टीची कि,
"सुखातही कधी कधी फसवणूक होते.."
कारण शेवटी.....
"तडजोडीने मिळालेल्या सुखात माणसाचे लक्ष सुखापेक्षा तडजोडीकडेच जास्त जाते."

No comments:

Post a Comment