Wednesday, March 28, 2012

आजचा माणूस...

आजचा माणूस...
आजचा माणूस कुठली गोष्ट सगळ्यात चांगली करायला शिकला असेल ना तर ती म्हणजे
'दुर्लक्ष्य करणे'...
'आपलं काही अडत नाहीये ना'... मग दुनिया गयी तेल बेचने हा यांचा Attitude ..
एक व्यक्ती आपल्या आयुष्याची ५-६ वर्ष civil services च्या exam च्या तयारी
साठी बहाल करतो.. खूप काही व्यक्तिगत सुखसोयींच बलिदान करून, अनेकांशी झगडून
तो शेवटी IAS/IPS बनतो..
आपलं संपूर्ण आयुष्यं देशाच्या सेवेसाठी प्रदान करतो..
काहीतरी चांगलं करायला जातो अन या भ्रष्ट नेत्यांच्या किंवा माफियांच्या हस्ते
मारला जातो..
आई बाप पुरते तुटून जातात... आयुष्यभर एकटेच झगडत राहतात..
शेजारी-पाजारी धीर देतात, कॉलोनीतले लोक हळहळ व्यक्त करतात आणि आजचा माणूस
(म्हणजे बाकी सगळेच)
"खूप वाईट झालं.. या देशाच काय होणार देव जाने" एवढ्या शब्दात दिलगिरी व्यक्त
करून सगळा भार देवावर टाकून, "स्व" ची काळजी करायला मोकळे होतात..

हीच माणसं मग dirty picture च्या show ला चार चार आठवडे गर्दी करतात..

सत्य तर हेच आहे...
की स्वतःला 'हुशार' म्हणवणाऱ्या आजच्या या माणसाला खरे "Hero" कोण आहेत हे
अजून ओळखताच आलेलं नाहीये..

दुखं एकाच गोष्टीच आहे...
आजचा माणूस 'हुशार' राहिलाच नाहीये...
तो दिवसेंदिवस "शहाणा" होत चाललाय...

No comments:

Post a Comment