Wednesday, March 28, 2012

शब्द

देता शब्दांना मी चाल
बनतात हातातली ढाल
शब्दांची करता आखणी
शोभे जणू चारोळी देखणी

देता शब्दांना आकार
दिसतो जणू अलंकार
शब्द शब्दातले अंतर
भारून मारलाय मंतर

शब्द शब्दाला जुडावा
देह शब्दासाठीच पडावा
जेंव्हा पडते शब्दात ढील
पाहून हसतात मिश्कील

लागे शहाण्या शब्दाचा मार
मारण्या नको ढाल तलवार
शब्द असे जालीम हत्यार
सुटता चिरी काळीज आरपार
 

No comments:

Post a Comment