Sunday, March 4, 2012

झाड...

झाड...
एक छान पाऊस पडतो अन जमिनीत लपलेल्या बीजांना अंकुर फुटतो... मग एक छोटंसं
रोपटं आपली मान धर्तीच्या वर काढतं... पण ते मोठं व्हायला कित्येक वर्ष
लागतात... नंतर कधीतरी एक लाकुडतोड्या येतो त्या झाडावर अनेक घाव करतो अन काही
तासात त्याचे लाकडाच्या छोट्या छोट्या तुकड्यात रुपांतर करतो... त्या लाकडांची
राख करायला मग एक ठिणगीच खूप असते...

नात्यांचही काही तसंच असतं...
अश्याच कुठल्यातरी क्षणी काही भेटीगाठी होतात, त्यात गप्पांचा पाऊस पडतो अन
एका नवीन नात्याला अंकुर फुटतो... मग संवादाच्या निमित्ताने हे नातं आपली मान
वर काढतं... आणि हे नातं जपून ठेवायला वर्षानुवर्षे लागतात... त्याला जोपर्यंत
'विश्वासाचं' खत-पाणी दिलं जातं तोपर्यंत ते सुखरूप वाढतं... पण जर त्यात
'गैरसमज' आला तर मग त्या नात्याचे छोटे छोटे तुकडे होतात... कारण तेंव्हा घाव
सरळ मनावर होतात... आणि एकदा मनं बिघडली की मग त्या नात्याची राख व्हायला
संशयाची एक ठिणगीच खूप असते...

 

No comments:

Post a Comment