Thursday, December 29, 2011

झ-यांनी आजकाल
दगडातून फुटणं सोडून दिलय
पक्षांनिही आजकाल
किलबिलणं बंद केलय
फुलांनी आजकाल
फुलणं’ सोडून दिलय
पावसाने तर आपलं
कोसळणच बंद केलय
त्यांना म्हणे माणसां कडून
उत्तर हवय .. की ही हिरवीगार
जंगलं तुम्ही का तोडलीत...?
" माहितीच्या अधिकाराच्या
कायद्यात तुम्ही बसत नाही"
असं माणूस त्यांना म्हणाल्याचं ऐकतोय..!
" हो पण झाडे तोडणे हा गुन्हा आहे..
असं तुमचा कायदाच सांगतो..ना.."
असे असित्वाने त्याला विचारले
असंही ऐकतोय..!
"हो गुन्हा आहे म्हणून आम्ही त्याचा
दंड ही भरतो.की."
असं माणूस त्यांना म्हणाला,
आणि गुन्हा आहे पाप तर नाही ना..? असेही
माणूस अस्तित्वाला म्हणाला...असं ऐकतोय
तेव्हा मात्र सारा आसमंत खदखदून हसला
आणि म्हणाला "
" बा मानवा तु थोर आहेस!, सर्व शक्तीमान आहेस
जा तुझ्या राज्यावरचा सूर्य कधीच मावणार नाही.."
माणूस आनंदाने निघून गेला..
त्याला वाटलं या प्रकृतीनं आपल्याला
केवढा मोठा आशीर्वाद दिला........!!!??

हारणारे नेहमीच हारत नाहीत...

*हारणारे नेहमीच हारत नाहीत...
जिंकणारे नेहमीच जिंकत नाहीत...
हारणारेही कधीकधी असे उडतात,
की पुन्हा जमिनीवर उतरत नाहीत...
आणि जिंकणारे कधीकधी असे आपटतात,
की उडायचे पुन्हा स्वप्नही पाहत नाहीत...
वेळ बदलते...माणसं बदलतात
पण आयुष्य कुणासाठीही थांबत नाही...
बदल हेच आयुष्य असतं
हे बऱ्याच जणांना शेवटपर्यंत कळत नाही...

कशासाठी बी डर्टी..

*कशासाठी बी डर्टी *

वाईट आपला पाठलाग करत राहणार, सावलीसारखं मागं राहणार यात शंका नाही. प्रश्‍न
आहे तो आपण त्याला चुकवू शकतो की नाही? मला वाटतं चुकवू शकतो... प्रचंड गर्दीत
आपण अपघात चुकवत चालू शकतो, मरणाचा पाठलाग चुकवत जगू शकतो, बऱ्याच काही गोष्टी
आपण चुकवत असतो, तसं हे डर्टीही चुकवायला हवं...गटारीत लोळणाऱ्या डुकराशी झुंज
द्यायची म्हटलं की स्वतः गटारीत उतरावं लागतं आणि जेवढी डुकराशी झुंज देऊ
गटारीत राहू, तेवढं डुकरालाच बरं वाटतं... आणि आपलं सारं खराब व्हायला
लागतं... डर्टीबरोबर झुंजायचं तर डर्टी व्हावं लागतं... आपण स्पर्श कुणाला
करणार आहोत? चंदनाला की डुकराला, हे ठरवायचा अधिकार तर आपल्यालाच आहे...

अलीकडं पंधरा-वीस दिवसांपासून टीव्हीचं बटण ऑन करताना थोडी धास्तीच वाटते.
त्याचं कारणही आहे. कोणता तरी एक सिनेमा झळकलाय. त्यानं बॉक्‍स ऑफिसवर धंदाही
केलाय. या सिनेमाची एक जाहिरात बहुतेक चॅनेलवर झळकतेय. मीही एकदा ती पाहिली
आणि धक्काच बसला. बी डर्टी... अशी जाहिरात आहे. हे वाक्‍य वारंवार येतंय आणि
जणू हात जोडून विनंती केल्याप्रमाणे बोलतंय- "भाईयो, बहनों और बच्चे लोग, बी
डर्टी...' बाप रे बाप! हे कसं काय वाचायचं?... घाणेरडे बना असा संदेश
जाहिरातीसाठी तयार केला गेलाय... मुळातच आपण पर्यावरणात तयार होत असलेल्या...
मूल्य आणि संस्कार यांच्या ऱ्हासातून तयार होत असलेल्या घाणीत अडकतोय की काय,
असं वाटत असतानाच ही जाहिरात झळकतेय... बी डर्टी... बी डर्टी आणि बी डर्टी...
काही वर्षांपूर्वी "जागते रहो'सारखे संदेश मिळायचे, स्वच्छ राहा, असे संदेश
मिळायचे आणि आता एकदम यू टर्न... स्वच्छतेकडून घाणीकडे... घाणेरडे बना... आता
घाणेरडं बनायचं तर वर्तन, व्यवहार तसा करायचा किंवा दारात अनियमित येणाऱ्या
घंटागाडीत लोळायचं... एकीकडं सरकारी चॅनेलमधून स्वच्छतेचा मंत्र आळवला
जातोय... दिवसातून किमान आठ-दहा वेळा तरी हात स्वच्छ केले पाहिजेत, अशा
सांगणाऱ्या जाहिराती आहेत... न धुतलेल्या हाताच्या एका रंध्रावर लाखो जिवाणू
बसतात, असं सांगितलं जातंय... तात्पर्य, जो वारंवार हात धुवत नाही तो
असंस्कृत... स्वच्छता हा सुंदर संस्कार. स्वच्छतेमुळे आरोग्य लाभते आणि
आरोग्यामुळे आयुष्य लाभते. स्वच्छतापुराण जसं ताणू तसं हॅंड लिक्विडच्या खपाचे
आकडेच्या आकडे दिसतील. स्वच्छतेमुळे प्रतिष्ठाही लाभते. नॅपकिनही खपतात.
शरीरालाही ते चांगलं असतं. एकीकडे स्वच्छतेसाठी प्रचार, प्रयोग चालू आहेत...
ग्रामपंचायतीपासून ते थेट जगाची कचेरी असलेल्या युनोपर्यंत... पण मध्येच हा
सिनेमा आला आणि एकदम या स्वच्छतापुराणाची वाटच लागली... घाणेरडे बना! खरं तर
आपण स्वतः जमेल त्या मार्गानं स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करीत असतो...
स्वच्छतेमुळे सौंदर्य लाभतं, सौंदर्याला देवत्व लाभतं, काय काय करून आपण
स्वतःसह सारा समाज स्वच्छतेकडं नेत होतो आणि एकदम घाणेरडं होण्याचा मंत्र
कोणीतरी पडद्यावरून देऊ लागलं... हा सिनेमा पाहून आलेल्या तरुणांच्या
प्रतिक्रियाही ऐकण्यासारख्या आहेत. "अरे मैंने डर्टी देख लिया। बहुत अच्छा
है... डर्टी देखो यार' वगैरे वगैरे...' एके काळी डर्टी शब्द उच्चारताना संकोच
वाटायचा आणि आता हा शब्द जणू समाजमान्य आणि संस्कारमान्य बनवला जातोय...
निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडं जाण्याऐवजी निगेटिव्हकडून निगेटिव्हकडं जाण्याचा
म्हणजेच घाणीकडून घाणीकडं जाण्याचाच हा प्रकार आहे... जाहिरातीचं एक जबरदस्त
तंत्र आहे. लोकांना स्वच्छ व्हा, असं सांगितलं की ते कदाचित ऐकणार नाहीत; पण
घाणेरडं व्हा म्हटलं, की त्यांना स्वच्छतेची जाण येईल... स्वच्छ व्हायचं याचाच
अर्थ घाणमुक्त व्हायचं... स्वच्छता तेव्हाच कळते, जेव्हा पाचों उंगलियां घाणीत
अडकतात... खोटं बोला असं शिकवलं, की लोकांना खऱ्याचं महत्त्व कळू लागेल, चोरी
करा असं सांगितलं, की कष्टाचं महत्त्व कळलं आणि खून करा म्हटलं की जगण्याचं
महत्त्व कळेल... वा रे वा! काय भारी सिद्धान्त आहे, नाही? त्याचा संबंध
मूल्याशी नाही तर गल्ल्याशी आहे. गल्ला म्हणजे पैसे ठेवण्याची किंवा
वाढविण्याची जागा... गल्ला वाढविण्यासाठी मूल्यं नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे
का, असं जर कोणी विचारलं की उत्तर येईल, "काहीतरी संपल्याशिवाय काहीतरी
निर्माण होत नाही.' आपण काय संपवायला निघालो आहोत? काय शिकवायला निघालो आहोत?
उजेडाचा तिरस्कार, स्वच्छतेचा तिरस्कार, सत्याचा, मूल्याचा तिरस्कार तरी शिकवत
नाही आहोत? कोणतं हे मार्केट तयार होतंय, की जेथे डर्टी सजवून ठेवलं जातंय आणि
स्वच्छतेला लाथ घातली जातेय... एकदा कपड्यांच्या दुकानात गेलो होतो. थोड्या
वेळानं एक कुटुंब तिथं आलं. सेल्समन काय पाहिजे विचारू लागला. कुटुंबानं
आपल्यातल्या लहान मुलाला प्रथम विचारलं, ""बेटा, तुला काय हवंय?''

बेटा हसत म्हणाला, ""पप्पा, मम्मी, ये अंदर की बात है...''

त्याला अंडरवेअर हवी होती. कोठून तरी म्हणण्यापेक्षा कुठल्या तरी छोट्या
पडद्यावर त्यानं हे वाक्‍य ऐकलं असावं... पाहिलं असावं. त्याच्या उत्तरावर
सारं दुकान हसलं. आई-वडिलांना राग नाही आला. उलट "किस का बेटा है' अशा एका
स्वाभिमानी भावनेनं ते आपल्या मुलाकडे बघू लागले... त्याच्या डोक्‍यावरून हात
फिरवू लागले.

कितीतरी अशा गोष्टी सांगता येतील... प्रत्येकाकडे यापैकी काही ना काही अनुभव
असेल... कोणी बोलतं, कोणी बोलत नाही...

छोटा पडदा नुसताच बोलत नाही, तर काही गोष्टी पाठ करून घेतो... पाठ होईपर्यंत
आपला मूळ मेंदू सपाट करू लागतो. मग कधी डाग अच्छे लगते है म्हणत डागाचे, तर
कधी डर्टीचे उंचवटे मेंदूत तयार करू लागतो....सगळंच उलटं वाटू
लागलंय...ज्यांना उलटं वाटतं किंवा प्रसंगी उलट्याच होतात, तेव्हा त्यांना
घाणीचं समर्थन करणारी व्यवस्था कालबाह्य ठरवते. कुणा खानाचा डायलॉग मारते, "अब
सब डर्टी है... दुनिया डर्टी है... जिंदगी भी तो एक डर्टी है, रास्ता डर्टी
है, आदमी डर्टी है वगैरे वगैरे...' डाग ही घालवायची किंवा संपवायची गोष्ट
होती; पण ती मिरवायची झाली... "डर्टी' ही गोष्टही संपवायची होती ती आता
सजवायची झाली आहे. या सगळ्या व्यवहारातून जन्माला येणारी भाषाही मोठी मजेशीर
असते. माझा पोरगा म्हणाला, ""अरे, दोनशे रुपये दे पप्पा. थोडं डर्टी बघून
येतो...''

त्याचं ऐकून शुगर एकदम टॉपला जाण्याची वेळ आली. त्यातूनही मी म्हणालो, ""अरे,
त्याला ए सर्टिफिकेट आहे.''
यावर तो म्हणाला, ""मी एटीन प्लस आहे...''
एकूण काय, तर डर्टी पाहण्यासाठीची पात्रताही त्यानं मिळवलेली असावी.

काळ बदलतोय... पण कोणत्या अंगानं, ते महत्त्वाचं आहे. मला तर नेहमीच वाटत
आलंय, की आपण अतिशय कष्टानं जपलेलं, उपाशीपोटीही जपलेलं असं काहीतरी तो काळ
ओढून घेतोय... हिसकावून घेतोय... गमावतोय आपण काहीतरी... प्रतिकार कसा
करायचा?... एखाद्यानं एखाद्याला सांगितलं, की अमुक अमुक गोष्ट वाईट आहे, ती
बघू नकोस. तर उत्तर मिळतं, की ठीकंय. वाईट कशी आहे ती बघून घेतो. नंतर बघत
नाही. पण वाईट सारं अनुभवातूनच समजून घ्यायचं का?...

गेल्या आठवड्यात मी "एसबीआय'च्या एका ए.टी.एम.समोर उभा होतो. रांगेत उभा होतो.
आत एक परदेशी नागरिक होता. तो बाहेर आला आणि म्हणाला, ""एटीएममध्ये पैसे
नाहीत. तशी स्लिप बाहेर पडतेय. कृपा करून जाऊ नका... वेळ वाया घालवू नका.''

रांगेतल्यांनी ते ऐकलं आणि तरी ते आत निघाले ते पैसे कसे येत नाहीत, हे
पाहायला...

वाईट आपला पाठलाग करत राहणार, सावलीसारखं मागं राहणार, यात शंका नाही. प्रश्‍न
आहे तो आपण त्याला चुकवू शकतो की नाही? मला वाटतं चुकवू
*जे आवडत असत
ते कधी मिळत नसत
हिसकावून घेऊन ते आपल कधी होत नसत
प्रयत्न केला मागण्याचा पण यश मागून मिळत नसत
शेवटी नशिबात आहे तेच होते म्हणून नशीब खोटे आहे असे माणूस म्हणत नसतो
जिंकण्यासाठी प्रयत्न प्रत्तेकाकडे असतो
म्हणून प्रयत्न तो कधी सोडत नसतो .*

मैत्री म्हणजे काय असतं ?

मैत्री म्हणजे काय असतं ?

मैत्री म्हणजे ,
मनाला जोडणारी Wire असतं,

अंधारात प्रकाश देणारा Light असतं.

हृदयातलं ऐकवणारा Receiver असतं,

संकटकाळी मदतीच Transmitter असतं……….

मैत्री म्हणजे ,
वार्‍यावर डूलणारा Rose असतं,

गीटारीची सुंदर Tune असतं.

जीवनाच्या प्रवासातील Mentor असतं,

योग्य वाटेवर आणणारं Steering असतं………

मैत्री म्हणजे,
विचारांच्या धाग्यांच Blanket असतं,

रंग वेगवेगळे तरी Picture एकच असतं.

जिथे रक्ताच Relation ही परकं असतं,

आणि नेहमीच बोलकं Heart असतं.…… ♥

Friday, December 2, 2011

प्रेम आणि वेडेपणा

खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे. जगाची उत्पती त्यावेळी झाली नव्हती आणि मानवाने
या जगात आपले पाऊल रोवले नव्हते. त्यावेळी सगळे सद्गुण आणि दुर्गुण इकडे तिकडे
फिरत होते. काय करावे हे न कळल्याने कंटाळले होते.

एक दिवस ते सगळे एकत्र जमून काय करावं याचा विचार करू लागले. त्यांना खूपच
कंटाळा आला होता. इतक्यात 'कल्पकते' ला एक कल्पना सुचली. ती म्हणाली, "आपण
सगळे लपंडाव खेळूया का?" सर्वाना ती कल्पना एकदम आवडली. लगेच वेडा असणारा
'वेडेपणा' ओरडला, "मी आकडे मोजतो". या वेडेपणाच्या मागे लागण्या एवढं कुणी
वेडं नसल्याने सर्वांनी त्याच्या म्हणण्याला मान्यता दिली. 'वेडेपणा' एका
झाडाला रेलून उभा राहिला आणि मोजू लागला,........ एक, दोन, तीन..............

वेडेपणाने आकडे मोजायला सुरुवात करताच सर्व सद्गुण व दुर्गुण लपायला गेले.
'कोमलता' चंद्रकोरीच्या टोकांवर जाऊन बसली. 'देशद्रोह' कचऱ्याच्या ढिगात लपला.
'आपुलकी' नं स्वताला ढगांमध्ये गुंडाळल. 'खोटेपणा' म्हणाला कि 'मी दगडाखाली
लपेन'. पण त्याचं सांगणं खोटंच होतं. प्रत्यक्ष तो एका तळ्याच्या तळाशी लपला.
'वासना' पृथ्वीच्या मध्यभागी लपली. 'लोभ' एका पोत्यात शिरू लागला आणि शेवटी ते
पोतं त्यानं फाडला. वेडेपणा आकडे मोजतच होता...... ७९, ८०, ८१, ८२......

बहुतेक सगळे सद्गुण, दुर्गुण वेगवेगळ्या ठिकाणी लपले होते. अजून 'प्रेम' मात्र
कुठे लपाव याचा निर्णय न घेता आल्याने लपू शकलं नव्हतं. अर्थात आपल्याला याचं
आश्चर्य वाटायला नको. कारण आपल्याला माहित आहे कि, 'प्रेम' लपवता येतचं नाही.
'वेडेपणा' आकडे मोजत होताच... ९५, ९६, ९७.... शेवटी शंभरावा आकडा उच्चारण्याची
वेळ आली तेव्हा घाईघाईने 'प्रेमा' ने एका गुलाबच्या झाडत उडी मारून स्वताला
लपवलं. वेडेपणा ओरडला. "मी येतोय! मी येतोय!"

'वेडेपणा' न सर्वांना शोधायला सुरुवात करताच आधी लगेच त्याच्या पायाशीच त्याला
'आळशीपणा' सापडला. कारण स्वताला लपवण्या एवढा उत्साह आणि शक्ती त्याच्यात
नव्हती. नंतर त्याला चंद्रकोरीवरची 'कोमलता' दिसली. तळ्याच्या तळातून त्याने
'खोटेपणा' ला शोधले. पृथ्वीच्या मध्यभागातून 'वासना' शोधून काढली. एकापाठोपाठ
एक सगळे शोधले, पण त्याला एकाचा शोध लागेना. त्या एकाला शोधता येईना म्हणून
'वेडेपणा' निराश झाला. तेवढ्यात 'मत्सरा' ने, त्याला शोधता येत नाही या
मत्सराने ग्रस्त होऊन त्या 'वेडेपणा' ला म्हटले, "अरे, तुला 'प्रेम' सापडत
नाहीये. ते त्या गुलाबाच्या झुडुपामागे लपलंय". 'वेडेपणा' ने एक लाकडाचा
धारदार ढलपा घेतला आणि गुलाबाच्या झुडुपात तो भोसकला. एकदा..... दोनदा....
अनेकदा. शेवटी एक हृदयद्रावक किंकाळी ऐकू आली तेव्हा तो थांबला. त्या
किंकाळीनंतर आपल्या चेहऱ्यावर हाथ झाकीत 'प्रेम' बाहेर आलं. त्याच्या
बोटांच्या फटीतून रक्त ओघळत होतं. प्रेमाला शोधण्याच्या अधिर्तेमुळे 'वेडेपणा'
ने त्या लाकडी ढलप्यान प्रेमाच्या डोळ्यांवर वर केले होते. वेडेपणा आक्रोश करू
लागला, "अरेरे! मी हे काय केलं? काय केलं मी? मी तुला आंधळा करून टाकलं. आता
मी याची भरपाई कशी करू? तुझे डोळे आता पूर्वीसारखे कसे करू?

प्रेम म्हणाले, "तू काही माझे डोळे परत देऊ शकणार नाहीस. पण तुला जर
माझ्यासाठी काही करायचंच असेल तर तू माझा मार्गदर्शक हो. मला रस्ता दाखव."

तेव्हापासून प्रेम आंधळ झालं आणि वेडेपणा त्याचा नेहमीचा सोबती झाला
 

सांग ना ..

सांग ना ..
समुद्रात तळाशी रंगीबेरंगी मासे
सुखनैव तरंगतात
तसं तुझं असणं माझ्या मनातले
न्याहाळत बसते मी ....
म्हणून ओठांवर नकळतपणे
फुलणारं हसू मात्र
कुणापासून कसं लपवावं
समजेनासे होते कितीदा...
आणि ओठांवरचे हसू
लपवून ठेवावं तर
डोळ्यात तरी ते उमटतेच आणि..
...अशावेळी काय करायचे असतं?
एवढंच नव्हे तर मनात उमटलेला
हा रोमांच त्याचं काही कराव तर ..
गालावर उमटलेल्या
गुलाबी रंगाचा काय रे?...
तुझ्या विरहाच्या गुलाबी काट्याने
घायाळ तरारलेला रक्तबिंदू
त्याची लाली तरी किती अन
सांग ना कशी झाकायची.....
 

आकाशातला एक तारा आपला असावा

*आकाशातला एक तारा आपला असावा,
थकलेले डोळे उघडताच चमकुन दिसावा,
एक छोटे जग प्रत्येका जवळ असावे,
जगाच्या या गर्दित कुणीच एकटे नसावे.....
क्षितीजापलीकडॆ पाहण्याची दॄष्टी असेल,
तर क्षितीज नक्की गाठता यॆत.

आपल्या रक्तातच धमक असॆल,
तर जगंही जिंकता यॆत.

आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं,
त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं.

असतॆ आपल्या रक्तात जिद्द व ताकद,
त्या ताकदीला एकदातरी अनुभवायचं असतं
उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी
नजरेत सदा नवी दिशा असावी
घरट्याचे काय आहे बांधता येईल केव्हा ही
क्षितीजांच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी *
*

गुगल वर शोधताना




गुगल.कॉमवर आपण बर्‍याचवेळा निरनिराळ्याप्रकारची माहिती शोधतो आणि
आपल्याला हव्या असलेल्या माहितीसाठी गुगल.कॉमवर अनेक (हजारो) वेबसाईटची
यादी समोर येते. अशावेळी कुठल्या वेबसाईटवर आपणास अचूक माहिती मिळेल हे



सांगणे कठिण जाते आणि प्रत्येक वेबसाईट उघडून पाहण्याशिवाय पर्याय नसतो.
मग विनाकारण खुप वेळ वाया जातो. अशावेळी गुगलचा कंटाळा येतो.

कधीकधी
गुगल.कॉमचा हाच स्वभाव अनेकांना आवडत नाही. विचारलेल्या माहितीची असंख्य
पाने दाखविल्यावर त्यांना राग येतो. यावेळी गुगल.कॉमला नावे ठेवण्यापेक्षा


आपणच जर आपली माहिती शोधण्याची पद्धत बदलली तर योग्य ती माहिती लवकर
शोधायला गुगल.कॉमला मदत होते आणि परीणामी आपला वेळही वाचतो.

गुगल.कॉमवर माहिती शोधताना कि-बोर्डवरील काही विशिष्ट चिन्हांचा वापर केल्यास गुगलला आपला प्रश्न व्यवस्थित कळतो.




१. आपल्या प्रश्नामध्ये ' + ' चिन्हाचा वापर करावा : समजा गुगल.कॉमवर
आपणास मोबाईलची हिस्ट्री (म्हणजेच मोबाईलचा इतिहास) शोधायचे असल्यास
गुगल.कॉम ' Mobile + History ' असे सर्च केल्यास गुगल.कॉम
हे दोन्ही शब्द असलेलीच पाने समोर दाखवितो.



२. आपल्या प्रश्नामध्ये ' - ' चिन्हाचा वापर करावा : समजा जर आपणास
गुगल.कॉमवर 'sachin' असे शोधायचे असेल. पण येणार्‍या यादीमध्ये 'sachin
tendukar' च्या माहितीची पाने सहाजिकच जास्त असतील.
अशावेळी गुगल.कॉमला खास एखादा शब्द शोधू नकोस असे जर सांगायचे असेल, तर


'sachin -tendukar' असे टाईप करुन सर्च करावे. म्हणजे मग गुगल.कॉम
येणार्‍या उत्तरामध्ये 'tendukar'' हे नाव नसलेल्याच वेबसाईटची यादी
दाखवेल.

३.
आपल्या प्रश्नामध्ये ' ~ ' चिन्हाचा वापर करावा : गुगल.कॉमवर एखादी माहिती
शोधताना येणार्‍या उत्तरामध्ये त्या शब्दाचा समानार्थी शब्द असल्यास ती
पाने देखिल गुगल.कॉम दाखवितो.



४. एखाद्या ठराविक वेबसाईटवर शोधायचे असल्यास : सध्या बर्‍याच
वेबसाईटवर सर्चची सेवा उपलब्ध असते तरीह एखाद्या वेबसाईटवर सर्च करण्याची
सोय उपलब्ध नसल्यास गुगल.कॉमवर त्या वेबसाईटचे नाव आणि
आपणास शोधायची माहिती दिल्यास गुगल.कॉम फक्त त्याच वेबसाईटवर ती माहिती


शोधून उत्तर देतो. उदा. ' site:www.abc.com mobile ' असे दिल्यास गुगल.कॉम
फक्त http://www.abc.com/ वर mobile हा शब्द शोधेल.


५.
एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचे असल्यास : आपणास जर फक्त एखाद्या शब्दाचा
अर्थ हवा असल्यास गुगल.कॉम त्या शब्दाच्या आधी ' define: ' असे दिल्यास
गुगल.कॉम त्या शब्दाची माहिती असलेल्याच


वेबसाईटची यादी दाखवितो. उदा. ' define:Computer ' असे शोधल्यास गुगल.कॉम
' Computer ' या शब्दाचा अर्थ सांगणार्‍या वेबसाईटची यादी देईल.

६.
मिळती-जुळती वेबसाईट शोधण्यासाठी : बर्‍याच वेळेस आपणास एखादी वेबसाईट
त्यावरील छान आणि उपयोगी माहितीमूळे आवडते. परंतू त्या वेबसाईट प्रमाणेच
इतरही त्या विषयीच्या आणि त्याच


प्रकारची माहिती असलेल्या वेबसाईट आहेत का? ते शोधण्यासाठी ' related: '
या शब्दाचा उपयोग करावा. उदा. ' related:http://www.xyz. com/ ' असे
शोधल्यास गुगल.कॉम ' http://www.xyz.com/ ' प्रमाणेच माहिती असणार्‍या वेबसाईटची



यादी देईल.

७. जसाच्यातसा शब्ध शोधायचा असल्यास : जर एखादा शब्द
गुगल.कॉमवर जसाच्यातसा शोधायचा असल्यास असल्यास त्या शब्दाच्या पुढे आणि
मागे अवतरण चिन्हाचा (Double Inverted Commas) म्हणजेच
" " याचा वापर करावा. उदा. गुगल.कॉमवर "contact us" असे शोधल्यास ज्या


पानावर हे दोन्ही शब्द एखत्र असतील त्याच पानांची यादी समोर देईल.

८.
आपल्या प्रश्नामध्ये ' * ' चिन्हाचा वापर करावा : गुगल.कॉमवर एखादा शब्द
शोधताना तो शब्द पुर्ण माहित नसल्यास अथवा त्या शब्दाच्या संबंधीत इतरही
शब्द सापडल्यास ती देखिल दाखवावी असे आपणास


जेव्हा हवे असेल तेव्हा ' * ' चिन्हाचा वापर करावा. उदा. गुगल.कॉमवर '
friend* ' असे शोधल्यास friend ह्या शब्दासोबत friends , friendship या
त्याच शब्दाशी संबंधीत शब्दांचा देखिल उत्तरामध्ये विचार करतो.




९. आपल्या प्रश्नामध्ये ' ? ' चिन्हाचा वापर करावा : एखाद्या शब्दाची
पुर्ण स्पेलिंग माहित नसल्यास ' ? ' चिन्हाचा वापर करावा. उदा. ' fri??d '
असे सर्च केल्यास गुगल.कॉम त्या प्रश्नचिन्हाच्या
जागी योग्यती अक्षरे घेवून त्या माहितीची पाने दाखवितो.



१०. आपल्या प्रश्नामध्ये ' AND अथवा OR ' शब्दाचा वापर करावा : एखाद्या
वेळेस जर आपणास दोन शब्दाना मिळून एकत्रिच सर्च करायचे असते त्या वेळी '
AND अथवा OR ' शब्दाचा वापर करावा. उदा. जर गुगल.कॉम मध्ये सर्च


करताना ' Mobile or Books ' सर्च केल्यास गुगल.कॉम ज्या पानावर या दोन्ही
शब्दांपैकी एखादा जरी शब्द असल्यास ती पाने दाखवितो तर या उलट ' AND '
शब्दाचा वापर केल्यास ती दोन्ही शब्द असलेलीच पाने दाखवितो.

Sunday, October 23, 2011

फक्त माझ्या आईसाठी...

फक्त माझ्या आईसाठी...
ही कविता फक्त माझ्या आईसाठी
अग कस सहन केल असशील
मल नऊ महिने घेउन जगण??
तुला रात्रभर जराही झोपू न देता
तुझ्या मांडीवर माझ ते रडण??

आई, आज मला तुझी खूप् आठवण येतेय
कारण आज मी सपशेल हारलोय
म्हणून परत तुझ्या त्या लढवय्या जीवनाची
स्वत:ला आठवण करुन देतोय
माझ्याकडे जे काही आहे ते फक्त
आणि फक्त तुझच आहे...
आत्मा आणि ईश्वर यांचा मेळ म्हणजे आई
हे म्हणतात ते खरच आहे....

मला अजूनही आठवतय
तू मला वीरांची गाथा सांगायचीस
आता वाटतय खरोखर
तोच तू वीर असायचीस

आई तू माझी आजिबात काळजी करु नकोस
आज पडलोय, उद्या उठीन
तूझ्या गोष्टीतल्या त्या वीरासारखा
आणि तू शिकवल्यासारखा फक्त लढीन

तू म्हणायचीस आयुष्यात आधी लढायच
असत आणि मग जिंकायच असत
तू घडविलेला , तुझा हा वीर
तुझी ही शिकवण वाया जाऊ देणार नाही...
 

* **तमसो मा ज्योतीर्गमय।*

शुभंकरोती कल्याणम आरोग्यं धनसंपदा।

शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते।।

दीप ज्योती: परब्रम्हा दीपज्योतीजनार्दन:।

दीपो हस्तु में पापं दीपज्योतीर्नमोऽस्तुते।।

‘हे दीप ज्योती! तू जगाचे कल्याण, आरोग्य व धनसंपदा आणि वाईट विचारांचा सर्वनाश
करणारी आहेस. मी तुला नमस्कार करतो! हे दीप ज्योती! तू आमच्यासाठी परब्रह्म,
जनार्दन आणि पापे दूर करणारी आहेस. तुला माझा नमस्कार!’

अंधार असलेल्या ठिकाणी प्रकाशाचे आगमन होते तेव्हा अंधार दूर होतो. अंधार दूर
झाल्यानंतर तेथे मांगल्य, शुभ, आरोग्य व धनसंपदा निवास करते. वाईट विचार करत
असलेल्या शत्रुची बुद्धी कुंठीत करण्याचे काम प्रकाश करतो. मनुष्याच्या जीवनात
काम, क्रोध, लोभ, मत्सर, मोह, मद या गोष्टींनी आपले घर पक्के केले आहे.
मनुष्याच्या जीवनात प्रकाश असल्यावर ज्ञानरूपी दिवे प्रकटतात आणि ते सर्व
संकटाना दूर करतात. मनुष्याचे अज्ञान हे त्याच्या पापाचे मुख्य कारण असून
त्याला दूर करण्याचे काम दीपक करतो. आपले जीवन प्रकाशमय करून अंधकारमय अज्ञान
दूर करतो.

आजच्या विज्ञान युगात विद्युत शक्तीने प्रकाश निर्माण केला आहे. त्यामुळे
एखाद्या सुशिक्षित व्यक्तीला दिवा लावून त्याला नमस्कार करणे म्हणजे हास्यास्पद
असल्याचे वाटते. पुराणकाळात विजेचा अभाव असल्यामुळे दिवा प्रज्वलित करून त्याला
स्थिर ठेवण्यासाठी प्रार्थना केली जात असे. कारण दिवा विझून गेला तर चालू
असलेले कार्य मध्येच बंद पडण्याची भीती लोकांना वाटत असे. परंतु, आज त्या
परिस्थितीमध्ये आमुलाग्र बदल झाला आहे. विज्ञानामुळे मानव भौतिक विकासाच्या
शिखरावर जाऊन बसला आहे. म्हणून त्याला दिव्याची प्रशंसा करण्याची गरज वाटत
नाही. उजव्या पायाच्या अंगठ्याने बटण दाबल्याबरोबर प्रकाश पडतो मग दिव्याला
नमस्कार का म्हणून करायचा? असा विचार मनुष्य करू लागला आहे. परंतु, अशी कल्पना
बाळगणे चुकीचे आहे.
 
आपल्या पूर्वजांनी दीपदर्शनाला प्राधान्य दिलेले आहे, त्यामागे कृतज्ञतेची
भावना आहे. विजेच्या या युगात तुपाने भरलेला दिवा लावून त्याला नमस्कार
करण्याचीही तेवढीच आवश्यकता आहे. दिवा अंधाराभोवती तेजाचे वलय निर्माण करतो.
याउलट विजेच्या अधिक प्रकाशामुळे मनुष्याचे डोळे दिपतात. दिवा मानवाला आपल्या
मंद प्रकाशाने आत्मज्योतीचे मार्गदर्शन करतो. त्यामुळे मनुष्य अंतर्मुख बनतो.
तर विजेचा प्रकाश बाह्य विश्वाला प्रकाशित करून मानवाला बहिर्मुख बनवून
त्याच्या अशांतीचे कारण सांगतो. एक दिवा हजारो दिव्यांना प्रकाशित करू शकतो. एक
विजेचा दिवा दुसर्‍या विजेच्या दिव्याला प्रज्वलित करू शकत नाही. म्हणून ‍दिवा
आणि त्याच्या ज्योतीचे विशेष महत्त्व आहे.

आपण स्वत: प्रकाशित होऊन दुसर्‍यालाही प्रकाश देण्याची प्रेरणा मनुष्‍याने
दिव्यापासून घ्यावी. त्याने जगाला अज्ञानापासून दूर ठेवण्यासाठी आणि दैवी
विचारांचा प्रचारासाठी सदैव प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. अखंड दिव्याप्रमाणे
प्रभू कार्यात मग्न राहावे. सूर्यास्तानंतर पडणार्‍या अंधारापासून पृथ्वीला
कोणीही वाचवू शकत नाही. सूर्याची जागाही कोणीच घेऊ शकत नाही. सूर्याप्रमाणे
नेहमी जळत राहून सर्वांना प्रकाश देण्याचे काम कोणीच करू शकणार नाही.



अंधार दूर करणार्‍या दोन रूपयाच्या पणतीच्या दिव्याला मी का नमस्कार करू नये?
जो दिवा मला अंधारात धडकण्यापासून वाचवतो, जीवनाचा रस्ता दाखवितो, त्याला मी
नमस्कार करू नये? तो लहानसा दिवाही मला प्रेरणा देतो.त्याचे मूल्य दोन रूपये
असले तरीही हिम्मत आणि प्रकाश देण्याची प्रेरणा त्याच्याजवळ आहे. मला प्रेरणा
देणार्‍या या दिव्याला मी जर नमस्कार केला नाही तर माझ्यासारखा कृतघ्न दुसरा
कोणीच नसेल? म्हणूनच उपनिषदात ऋषींनी देवांची प्रार्थना करताना म्हटले आहे की,

‘असतो मा सत् गमय। तमसो मा ज्योतीर्गमय।

मृत्योर्माऽमृतं गमय।।’

असी ही दिवाळी....!

*दिन दिन दिवाळी.....*

* *

*असी ही दिवाळी *

*दसरा झाला की पाठोपाठ*

* हजेरी लावते ही दिवाळी*

*आनंदाची मुक्तहस्तपणे*

* उधळण* *करते ही दिवाळी*

*आप्तजणांच्या गाठीभेटी*

* घडवून आणते ही दिवाळी*

*सर्वाना एकत्र जमवून*

* प्रेम वाढवते ही दिवाळी*

*ईवल्या ईवल्या पणत्यांनी*

* उजळून टाकते ही दिवाळी*

*सुंदर सुंदर आकाशदिव्यानी*

* प्रकाशमय करते ही दिवाळी*

*लहानांसाठी मजाच मजा*

* घेऊन येते ही दिवाळी*

*खमंग फराळाचा आस्वाद*

* घ्यायला देते ही दिवाळी*

*भेटवस्तू आणि भेटकार्डांची*

* देवाणघेवाण घडवते ही दिवाळी*

*अशी सर्वांचा आनंद*

* द्विगुणीत करते ही दिवाळी*

*तेव्हा माझ्याकडून सुद्धा सर्वांना*

* आनंदी दिवाळी*

* **तमसो मा ज्योतीर्गमय।*

शुभ दीपावली.... नवल शिंदे, आकार आटर्स् अँन्ड क्रिएशन, अकलूज.

Monday, September 5, 2011

गणपती...एक सांस्कृतिक प्रवास

लोकप्रिय देवतांमध्ये गणपतीचं स्थान सगळ्यात वरचं आहे. विविध रूपांत भक्तांना भुरळ घालणाऱ्या गणपतीच्या सांस्कृतिक प्रवासाचा घेतलेला वेध.
.........

आज गणपती ही चौदा विद्या आणि चौसष्ट कलांची अधिष्ठात्री देवता आहे. गणेशपूजन केल्याशिवाय कुठल्याही कार्याची सुरुवात होत नाही; अगदी आधुनिक जीवनसरणी अनुसरणारेदेखील लॅपटॉपवर आधी गणेशप्रतिमा झळकवतात. एवढी गणपती ही देवता आज सर्वसामान्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाच्या केंद्रस्थानी आहे. मात्र काळाचं थोडं उत्खनन केलं, तर या देवतेचा इथपर्यंत झालेला धार्मिक- सांस्कृतिक प्रवास, हा एका मोठ्या सामाजिक अभिसरणाचा भाग असल्याचं उघड होतं. आणि हे अभिसरण समाज बदलतो, तसं दैवतांचं स्वरूप कसं बदलतं, हेच दर्शवणारं आहे. किंबहुना एखाद्या समाजाचा घडता इतिहास हा एखाद्या दैवताचाही इतिहास कसा असतो, ते गणपती या देवतेच्या विकसनप्रक्रियेतून सिध्द होतं.

सर्वसाधारणपणे कुठल्याही दैवताच्या विकसन प्रक्रियेकडे समाजाचं लक्ष नसतं. देवता मग ती शंकर-विष्णू असो, विठोबा असो अथवा खंडोबा. लहानपणापासून थोर मंडळी जे सांगतात, तेच भाविकपणे-भाबडेपणे स्वीकारण्याचं काम समाज करत असतो. परंतु इतिहाससंशोधक, समाजशास्त्रज्ञ, मानववंशास्त्रज्ञ, पुरातत्त्वज्ञ, लोकसाहित्यज्ञ ही मंडळी देव असो वा माणूस वा एखादा समाज, त्याचा सांस्कृतिक-सामाजिक-धार्मिक असा आडवा-उभा छेद घेत असतात. या विच्छेदनानंतर त्यांच्या हाताला गवसलेलं सत्य काही भन्नाटच असतं. क्वचितकधी सर्वसामान्यांच्या बुद्धीला, भावनेला न झेपणारं. आज सर्व हिंदुधर्मीयांचं महत्त्वाचं दैवत असलेल्या गणपतीची पुरातत्त्वीय, दैवतशास्त्रीय किंवा ऐतिहासिक छाननीही अशीच आहे. एखादं गूढ उकलत जावं, तसा गणपतीचा हा प्रवास आकळत जातो. आणि तो जसा आकळत जातो, गणपतीच्या विविध प्रतिमा या उत्खननातून हाती लागतात. मग कधी तो गणनायक असतो, कधी तंत्रमार्गी असतो, कधी तो विघ्नकर्ता असतो, तर कधी आजचा सुखकर्ता-दु:खहर्ता.

प्रसिद्ध दिवंगत विचारवंत स. रा. गाडगीळ यांनी आपल्या 'लोकायत' पुस्तकात या संपूर्ण विकसन प्रक्रियेचा सविस्तर लेखाजोखा मांडलेला आहे. गणपती या देवतेचा वैदिक काळातील गणदेवता म्हणून सुरू झालेला प्रवास आजच्या 'इष्टदेवता' रूपापर्यंत कसा येऊन पोचला, त्याचा अतिशय मार्मिक वेध गाडगीळांनी घेतला आहे. पण 'गणदेवता' आणि 'इष्टदेवता' या दरम्यान गणपती देवतेचं रुप 'विघ्नहर्ता' ऐवजी 'विघ्नकर्ता' कसं होतं, ते पाहणं अधिक औत्सुक्याचं ठरेल. मात्र गणदेवता असो वा इष्टदेवता-विघ्नदेवता... गणपती दैवताच्या एकूणच विकसनाचा माग घेतला की, त्या-त्या काळातील बुद्धिवंत मातीचा गणपती किंवा गणपतीची माती कशी करू शकतात, ते उमगतं. गणपती या देवतेला या संपूर्ण प्रक्रियेतून जावं लागलं आहे.

वास्तविक वैदिककाळात गणप्रधान समाज असल्यामुळे आणि वैदिक ऋषी स्वत: त्या गणपप्रधान समाजात राहात असल्यामुळे त्यांनी गणसमाजाचा नायक असलेल्या गणपतीला हरकत घेतलेली नाही. किंबहुना ऋग्वेदात 'गणानाम् त्वां गणपती हवामहे...' अशा शब्दात गणपतीची स्तुती केली आहे. मात्र वेदकालीन गणपती गजशीर्ष नव्हता, असं स.रा.गाडगीळ म्हणतात. 'लोकायत' पुस्तकात ते म्हणतात-'वैदिक ऋषींनी अगदी मुक्तकंठाने गणांचे महात्म्य वर्णिले आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून गणपती हा विघ्नकर्ताही नाही आणि विघ्नहर्ताही. किंबहुना त्यांना गजमुखी गणपतीच अज्ञात आहे.'

म्हणजेच आज लोकप्रिय असलेला हस्तिमुख गणपती तेव्हा अस्तित्त्वात नव्हता. तेव्हा गणांचा नायक तो गणपती याच अर्थाने 'गणपती' ही संज्ञा वापरली जायची. गणनायकाला हस्तिमुख मागाहून चिकटलेलं दिसतं. मूळच्या गण 'नायकाला' हत्तीचं तोंड कुठे चिकटलं त्याचा शोध मानववंशशास्त्रज्ञांनी कुललक्षण-कुलचिन्हाचा (टोटेमिझम) सिध्दान्त वापरुन स्पष्ट केलं आहे. त्यांच्या मतानुसार, ज्या गणसमाजाचं टोटेम म्हणजे गणचिन्ह हत्ती होता, असा गणसमाज कालांतराने नावारुपाला आला आणि साहजिकच त्या गणसमाजाचं चिन्ह असलेला हत्ती देवतारूप म्हणून समोर आला.

परंतु शेवटी गणसमूह म्हणजे लोकसमूहच. मग लोकसमूह किंवा त्या समूहाच्या देवतेची प्रगती तत्कालीन उच्चवणीर्यांना कशी सहन होणार? त्यातूनच वेदोत्तर काळात लिहिल्या गेलेल्या मानवगृह्यसूत्र, याज्ञवल्क्यस्मृती, मनुस्मृती यांसारख्या स्मृतींनी गणपती देवतेची निंदा करायला सुरुवात केली. स्मृतिकारांनी गणपतीला थेट 'विघ्नकर्ता' ठरवून टाकलं. याज्ञवल्क्याने तर, रुद्राने गणपतीची योजनाच संकटांच्या निर्मितीसाठी केली असल्याचं म्हटलं आहे. याज्ञवल्क्य स्मृतीत गणपतीसाठी 'विनायक' हे संबोधन वापरलेलं आढळतं. आज हे संबोधन चांगल्या अर्थाने वापरलं जातं. परंतु याज्ञवल्क्य स्मृतीत मात्र ते वाईट अर्थानेच वापरलेलं होतं आणि त्यासाठी याज्ञवल्क्याने 'विनायक: कर्मविघ्नसिध्यर्थ विनियोजित:' असं म्हटलं आहे. याच पद्धतीने मनुस्मृतीनेही गणपतीची निंदा केलेली आहे. आणि या निंदेचं कारण म्हणजे तेव्हा 'लोकायत' म्हणजे तत्कालीन बहुजन समाजात गणपती देवतेला प्राप्त झालेलं वलय.

मात्र स्मृतिकारांनी गणपतीला 'विघ्नकर्ता' ठरवलं, तरी इसवीसनोत्तर पाचव्या शतकात म्हणजे गुप्तकाळात गणपती या देवतेचा पुन्हा उत्कर्षकाळ सुरू झाला. कारण गुप्तकाळात सर्व पुराणग्रंथांना नवा उजाळा मिळाल्याचं स.रा. गाडगीळ म्हणतात. या काळात गणपती या देवतेला एकदम महत्त्व प्रापप्त झालेलं दिसतं. एवढंच नव्हे, तर स्कंदपुराण, गणेशपुराण, गणेश उपनिषद, असे गणपतीची स्तुती करणारे ग्रंथ निर्माण झाले. याचदरम्यान गणपतीच्या जन्मासंबंधी-निर्मितीसंबंधीच्या अनेक पुराणकथा निर्माण झाल्या.

गणपतीच्या या वेगवेगळ्या अवस्थांतरांची स.रा. गाडगीळ तीन टप्प्यात विभागणी करतात. पहिला टप्पा वैदकालीन गणगौरव रूपातील गणपतीचा, दुसरा टप्पा स्मृतिकालीन गणपतीचा, तर तिसरा टप्पा नव्याने महत्ता प्राप्त झालेल्या गणपतीचा. तसंच गणेशदेवतेचा हा प्रवास म्हणजे गणसमाजाच्या विकासक्रमाचे तीन टप्पे असल्याचंही सांगतात.

गणपतीची ही तीन अवस्थांतरं एकूणच उच्च वणिर्यांच्या मानसिकेतवर प्रकाश टाकणारी आहेत. म्हणजे सर्वप्रथम बहुजनसमाजातील एखादा नावारूपाला येत असेल, तर त्याची निंदा करायची. त्या निंदेचा काही परिणाम झाला नाही, तर त्याचा गुणगौरव करुन त्याला आपल्या टोळक्यात घ्यायचं आणि संपवून टाकायचं. म्हणूनच मूळचा गणसमाजातील लोकदेवतास्वरूप असलेला गणपती आता एकप्रकारे उच्चवणीर्य वेदकालीन देव झाला आहे आणि सर्व कला-विद्यांच्या महत्तम स्थानी येऊन बसला आहे.

परंतु यापलीकडेही गणेश या देवतेची पुरातत्त्वज्ञ अजून एक विकासावस्था दाखवतात. कारण पुराणकथा या पुरातत्त्वज्ञांच्या दृष्टिकोनातून भाकडकथाच. त्यांच्या मते पुराणकथांनी एखाद्या देवतेची प्रभावळ निर्माण करता येते, तिची विकासावस्था दाखवता येत नाही. याच दृष्टिकोनातून प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ डॉ. मधुकर ढवळीकर यांनी गणपती या देवतेची पुरातत्त्वीय मांडणी केली आहे. पाचव्या शतकाच्या आधी म्हणजे ख्रिस्तपूर्व काळात गणेशोपासना नव्हती, असं एक मत आहे. पण ढवळीकर यांनी ते खोडून काढलंय. ते म्हणतात-,'गुप्तकाळापूर्वीचं प्रसिद्ध राजकुल म्हणजे कुशाणांचं. त्यांचं राज्य अफगाणिस्तानपर्यंत पसरलेलं होतं. पुरातत्त्वीय उत्खननात

Tuesday, August 2, 2011

एक प्रवास मैत्रीचा

*एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..

एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..



एक प्रवास शुन्याचा
जणु हीमालयाशी भिडण्याचा
शुन्यातुन नवे जग साकारणारा
अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..

एक प्रवास जगण्याचा
क्शणा क्शणाला माणुस घडवण्याचा
हसता हसता रडवणारा
अन रडवुन हळुच हसवणारा..

एक प्रवास प्रेमाचा
भुरभुरणार-या दोन जिवांचा
जिंकलो तर संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..

एक प्रवास प्रयत-नांचा
सुख़ दुख़ातील नाजुक क्शणांचा
अखंड घडवणार-या माणुसकीचा
अन नवी उमेद देणार-या घडींचा..

एक प्रवास..
तुमच्या आमच्या आवडीचा
साठवु म्हंटले तर साठवणींचा
आठवु म्हंटले तर आठवणींचा.*

Sunday, July 31, 2011

जमेल का पून्हा लहान व्हायला..?

 
जमेल का पून्हा लहान व्हायला..?


जमेल का पून्हा लहान व्हायला..?

"क्षणात घेतात कट्टी
अन क्षणात घेतात बट्टी
आवडते त्यांना शाळा
जर असेल तर सूट्टी ...

कोणाच काही न ऐकनारा
स्वभाव त्यांचा हट्टी
धाक दाखवायला घ्यावी लागते
हातामध्ये पट्टी ..

अभ्यासाचा वेळी यांना
खेळ भारी सुचतो
क्लासमध्ये बसल्या बसल्या
बाजुवाल्याला पेन्सीलच टोचतो ..

छडीसारखे प्रसाद तर
यांना रोजचेच भेटतात
दप्तर फ़ेकून घरात
खेळायला पळतच सुटतात ..

अभ्यासात नेमके यांचे
पाढेच कसे चुकतात
गणित सोडवायला घेतल की
हातचे एकच हुकतात ..

चित्र काढतांना मात्र
चित्रामध्येच घुसतात
ओरडा खाऊन मोठ्यांचा
कोपर्‍यात जाऊन बसतात ..

अस हे लहाणपन पून्हा कधीच
वाट्याला कुणाच्या येत नाही
लहान मुलांबरोबर खेळतांना
ठरवूनही मन लहान होत नाही.....!!!!!..
 

Friday, July 22, 2011

या मातीतुन जन्मलो

*या मातीतुन जन्मलो
या मातीतच मी संपणार

येतानाही जवळ नव्हते काही
जातानाही काहीच बरोबर नाही मी नेणार

परमेश्वरांन दिलेल आयुष्य
प्रत्येक क्षण क्षण मी जगणार

दु:खाला सुखाचा सोबती करुन
संकटाशी हितगुज मी करणार

जितके जमेल तितके हासु वाटत
सर्वांचे अश्रु विकत मी घेणार

तु दिलेले जीवन
तुझ्याच कार्यास बहाल मी करणार
या मातीतुन जन्मलो
या मातीतच मी संपणार
दु:खी कष्टी न राहो कोणी
यासाठी सद्येव मी झिजणार
अन्यायाशी लढा देत
प्रामाणिकपणा मी जपणार
सतत कष्टत राहुन
माझ्या घामाचे चित करणार
या मातीतुन जन्मलो
या मातीतच मी संपणार
शेवटी मरण येईल तेव्हा
मुखी तुझेच नाम घेणार
जाता जाता हे जीवन
ईतरांच्यासाठी सार्थकी मी लावणार
या मातीतुन जन्मलो
या मातीतच मी संपणार*
 

फळांचे औषधी उपयोग Fruits as Medicine

फळांचे औषधी उपयोग Fruits as Medicine
आंबा :
[image: Mango]

आंबा हा फळांचा राजा तो फक्त वैशाख व ज्येष्ठ महिन्यातच खावा, असे
आयुर्वेदाच्या अभ्यासकांचे सांगणे आहे. हे फळ शक्तिवर्धक आहे. अन्नाबद्दल रूचि
उत्पन्न करणे व भूक वाढविणे हे त्याचे प्रमुख गुण होत तसेच शरीराची आग होत
असल्यास आंबा उपयुक्त ठरतो. यावरून उन्हाळ्यात आंबा खाणे योग्य आहे. हे दिसून
येते. अतिसार म्हणजे वारंवार शौचास होणे. या व्याधीवर आंब्याची साल व कोय
उपयुक्त आहे. साल ठेवून तिचा काढा तयार करून घेतात. तसेच कोय भाजून तिचे चूर्ण
करून मधातून दिल्यास विशेषतः लहान मुलांचा अतिसर दूर होतो.

अंजीर :
[image: Anjeer]

अंजीर ह्या फळाचा उल्लेख पुरातन ग्रंथात तसेच बायबलमध्ये उन्हाळा व पावसाळा या
दोन्ही ऋतुत अंजीराचा सीझन असतो. उन्हाळ्यात येणारे अंजीर गोड असते. अंजीरातून
शरीराला लोह, व्हिटॅमिन्स ए. बी. सी बऱ्याच प्रमाणात मिळते. तसेच शर्करा भरपूर
प्रमाणात मिळते. अंजीर खायला थंड व पचायला जड असतात. यांच्या सेवनाने गॅससेची
तक्रार दूर होते. तसेच पित्त विकार, रक्तविकार, व वात विकार यातील औषधी
गुणधर्मामुळे दूर होतात.

अपचन ऍसिडीटी, गॅसेसचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी दररोज सकाळ-संध्याकाळ १ ते २
अंजीर खावीत किंवा याचा रस प्यावा. वरील त्रासापासून आराम मिळेल. अंजीर
खाल्यानी बौद्धिक व शारिरीक थकवा दूर होण्यास मदत होते. लघवीचा त्रास होत
असल्यास दिवसातून तीन-चार अंजीर नियमितपणे खावीत यामुळे मुत्रविकार दूर होतात.
अशक्त व्यक्तींनी अंजिराचे रस अथवा खाल्याने गुणकारी परिणाम होतात. त्वचा
विकार, त्वचेची आग होणे व कांजण्या या आजारात आराम पडण्यासाठी अंजीर खावीत.
दररोज कोणतेही एक फळ खाल्याने शरीर निरोगी नक्कीच बनते.

अंजीर खाल्ल्याने अजीर्णाचा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे पोटात केस गेल्यावर
अंजीर खाल्यामुळे त्याचे पाणी होते, असे म्हणतात. अंजीर शक्तीवर्धक आहे. तसेच
ते सारकही आहे. म्हणजे ओली किंवा सुकी दोन अंजिरे झोपण्याच्या वेळी खाऊन थोडे
पाणि प्यावे. थोड्याच दिवसात तक्रार दूर होते.
आवळा :
[image: Awala]

आवळा हे फळ हे फळ बहुगुणी आहे. हे मुख्यतः पित्तशामक आहे. आवळ्याचा चमचाभर रस,
जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास आम्लपित्त
कमी होते. पित्तामुळे भोवळे येणे कमी होते. लघवीच्या विकारांवर हे परिणामकारक
औषध आहे. आवळा व खडीसाखर घेतल्याने लघवीला साफ होते आणि लघवीच्या वेळी आग होणे
किंवा लघवी कमी होणे या तक्रारी दूर होतात. आवळा उपलब्ध नसल्यास त्या पासून
तयार केलेली आवळकंठी वापरतात येते. याशिवाय अंगावर खरका किंवा कोरडी खरूज
उठल्यास आवळकंठी पाण्यात भिजवून अंगास लावावी. आवळ्यापासून तयार केलेला मोरावळा
हा तर पित्तावर उत्तम आहे. रोज परसाकडेला साफ होत नाही, पोट जड वाटते, भूक लागत
नाही, मन प्रसन्न राहत नाही, आजारी असल्यासारखे वाटते अशा तक्रारींवर मोरावळा
रामबाण आहे. रोज नियमाने मोरावळ्यातले दोन आवळे खाण्यामुळे, ही नेहमी दिसून
येणारी तक्रार दूर होते. आवळ्यापासून बनविलेले तेल डोके थंड राखण्यासाठी
उपयुक्त आहे.
ऊस :
[image: Sugar Cane]

ऊस खाण्यामुळे लघवी साफ होते. तसेच लघवीच्या वेळी आग होत असल्यासही तो उपयुक्त
ठरतो. कावीळ झालेल्या रोग्यास तर ऊसासारखे दुसरे औषध नाही. काविळीचे रोग्याने
रोज दोन वेळा जेवणापूर्वी ऊस खावा. चार पाच दिवसात प्रकृतीत सुधारणा होते. ऊस
हा थंड आहे. त्यामुळे उन्हाळ्यात घेतल्यास उपकारक ठरतो. त्याचप्रमाणे कलिंगड हे
एक थंड फळ आहे. त्याबद्दल एकच काळजी घेणे आवश्यक आहे. रस्त्यात गाडीवर
मिळणाऱ्या उघड्या फोडी खाल्यामुळे एखाद्या वेळी अपाय होण्याचा संभव असतो. कारण
त्याच्यावर माशा बसून व रस्त्यातील धूळ उडून त्या दूषित झाल्या असण्याचा संभव
असतो.
द्राक्षे :
[image: Grapes]

द्राक्षे हे मलावरोधावर उत्तम औषध आहे. तसेच त्यापासून तयार केलेला मनुकाही एक
चांगले टॉनिक आहे. पचनाच्या सर्व विकारांवर द्राक्षे उपयोगी आहेत. घसा जळजळणे,
घशाशी येणे, पोटदुखी, आंबट ढेकरा, उलटी या अपचन व आम्ल पित्ताच्या लक्षणावर
द्राक्षे खावी. मूठभर द्राक्षे व मूठभर बडीशेप ठेचून कपभर पाण्यात रात्री भिजत
घालून ठेवावी व सकाली कुसकरून थोडी खडीसाखर घालून सेवन केल्याने वरील सर्व
तक्रारी दूर होतात. मोठ्या तापानंतर आलेल्या अशक्ततेवर मनुका मनुका उपयुक्त
आहेत. रोज सकाळी १०-१५ मनुका बिया काढुन खाव्या आणि त्यावर १-१.५ कप दूध
घ्यावे. त्यामुळे भूक वाढते. अन्न पचन होते व शक्ति येते. घसा बसणे, कावीळ व
अन्नाबद्दल रूचिहीन वाटणे या विविध विकारांमध्ये मनुका खाण्याने फायदा होतो.
मनुका तुपावर परतून व त्यात चवीपुरते सैंधव घालून खाल्याने चक्कर येण्याचे
थांबते. मनुका, जेष्ठमध व गुळवेल समप्रमाणात एकत्र करून तयार केलेला काढा
पित्तावर उपयुक्त ठरतो. क्षय इत्यादी छातीच्या विकारांत खोकल्याबरोबर रक्त
पडते, त्या वेळी हा काढा घ्यावा क्षयरोगांमध्ये येणारी अशक्तता मनुक खाण्यामुळे
कमी होते.
पपई े :
[image: Papaya]

पपई हे फार मोठे औषध आहे. रोज नियमाने खाल्ल्यास भूक उत्तम लागते व अन्न पचते.
पपईचा चीक गजकर्ण, खरूज, नायटा या त्वचारोगावर लावल्यास उपयुक्त ठरतो. जंतावर
हे एक चांगले औषध आहे. हा चीक व मध दोन दोन चमचे एकत्र घोटावा. त्यात दुपट्ट
गरम पाणी घालून थंड झाल्यावर लहान मुलांना अर्धा चमचाभर ओळीने तीन दिवस द्यावा.
जंत पडून जाताट. गर्भवती स्त्रियांनी पपई खाऊ नये. त्यांना ती अपायकारक असते.
लिंबु :
[image: Lime]

लिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत. लिंबु उभे कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास
ओकारी थांबते. पोटदुखी थांबण्यास आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा.
अजीर्णावर लिंबू फार उपयुक्त आहे. ते आडवे कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव (मीठ)
घालून निखाऱ्यावर गरम करावे आणि वारंवार चोखावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी,
पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो. पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत घ्यावे.
त्याने भूक वाढते. अन्न पचते व शौचास साफ होते. मेदवृद्धि म्हणजे लठ्ठपणा कमी
करण्यासाठीही रोज लिंबाचा रस उन पाण्यात घालुन घेतल्याने उपयोत होतो. वाळलेले
लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच ओकारी थांबण्यास मदत होते.
अंगाला कंड सुटत असल्यास लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून अंगास चोळावा व ऊन
पाण्याने स्नान करावे. कंड कमी होतो. नायटे व डोक्यातील खवडे यावरही लिंबाचा रस
चोळल्याने चांगला परिणाम होतो.
जांभूळ :
[image: Jamun]

जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. तसेच ते अतिसार थांबविणारे औषध आहे. जांभळीच्या
पानांचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो.
जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम औषध आहे. परंतु ते तज्ञांच्या
सल्ल्यानेच घ्यावे.

जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. शौचास साफ होत नसेल तर त्यावर जांभळीची साल देतात.
ही साल चांगली तीन तोळे ठेवून पाण्यात एक अष्टमांश काढा करावा. व त्यात अर्धा
तोळे तूप, ३ मासे दूध व पैसाभर खडीसाखर घालून घ्यावा. दिवसातून दोन वेळा असा
घेतल्यास पाच-सात दिवसांत अतिसार व आव थांबते. स्त्रियांच्या अंगावर जाणारे
पाणीदेखील वरील काढ्याने थांबते. चांगल्या पिकलेल्या जांभळाच रस काढून बरणीत
भरून ठेवता व एक वर्ष जाऊ द्यावे. अशा रसाला जांभळाचा शिरका, जांभळाची आंब,
खाटी किंवा जांभळाचे आसव असे म्हणतात. जांभळाचे आसव तर वेळेव अर्धा तोळा चौपट
पाणी घालून

Thursday, July 21, 2011

ते बाबा असतात...

आपले चिमुकले हाथ धरून जे आपल्याला चालायला शिकवतात.... ते बाबा असतात..... आपण काही चांगले केल्यावर जे अभिमानाने सगळ्याना सांगतात..... ते बाबा असतात.... माझ्या लेकराला काही कमी पडू नए या साठी जे घाम गाळतात..... ......ते बाबा असतात.... आयुष्याच्या रस्त्यावर चालताना जे आपल्याला चुकताना सावरतात.... ते बाबा असतात... आपल्या लेकराच्या सुखा साठी जे आपला देह ही अर्पण करतात...... ते बाबा असतात...

अविचाराने किंवा अधाशीपणाने मनुष्य संकटात सापडतो

एक खूप अशक्त उंदीर होता. एकदा त्याला खूप भूक लागली म्हणून एका धान्याच्या
कणगीच्या भोकातून तो आत शिरला आणि तेथे बरेच दिवस राहून त्याने मनसोक्त खाऊन
घेतले.
खाऊन खाऊन तो इतका धष्टपुष्ट झाला की, त्याला त्या भोकातून बाहेर येता येईना.
तो तेथेच धडपडत होता.
ते पाहून एक चिचुंद्री त्याला म्हणाली, "मित्रा, ह्या भोकातून बाहेर पडायचं
असेल तर तुला परत पहिल्यासारखं बारीक व्हायला पाहिजे.

तात्पर्य - अविचाराने किंवा अधाशीपणाने मनुष्य संकटात सापडतो

आयुष्यात जिंकाल तेव्हा

"आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू विजयाची सवयच आहे, हराल तेव्हा असे
हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे...."

अ‍ॅन्ड्रॉइड’चा धुमाकूळ!

‘अ‍ॅन्ड्रॉइड’चा धुमाकूळ!

गेल्या काही वर्षांपासून बाजारात अ‍ॅन्ड्रॉईड मोबाइल फोन्सची चलती
आहे. आयफोन चांगला की अ‍ॅन्ड्रॉइड यावर अनेकांच्या रंगलेल्या चर्चाही आपण
ऐकल्या असतील. पण ‘अ‍ॅन्ड्रॉइड’ म्हणजे नेमके काय? त्याचा उपयोग, त्याची
वैशिष्टय़े आदी प्रश्न अनुत्तरितच आहेत. त्याच प्रश्नांची उत्तरे देणारा हा
लेख.

अ‍ॅन्ड्रॉइड म्हणजे नेमक काय? अ‍ॅन्ड्रॉइड फोन्स हा शब्द सारखा
कानावर पडल्याने अ‍ॅन्ड्रॉइड हा एखाद्या कंपनीचा फोन आहे असा अनेकांचा गैरसमज
असतो, खरं तर अ‍ॅन्ड्रॉइड हा कोणताही फोन नसून ती एक ऑपरेटिंग सिस्टम आहे.
ज्याप्रमाणे कॉम्प्युटर, लॅपटॉप चालविण्यासाठी विंडोज ७, विन्डोज एक्स पी या
ऑपरेटिंग सिस्टम्स असतात, तसेच मोबाईल चालविण्यासाठी गुगल या कंपनीने
अ‍ॅन्ड्रॉइड नामक ऑपरेटिंग सिस्टम विकसित केली. ‘अ‍ॅपल’ने डिझाइन केलेल्या
आयफोन्सना बाजारात टक्कर देण्यासाठी अ‍ॅन्ड्रॉइडची निर्मिती करण्यात आली होती
आणि त्यानेही आपले काम चोख बजावले.

अ‍ॅन्ड्रॉइड ही एक ओपन सोर्स सिस्टम आहे. आपल्या ताकद व गरजेनुसार
अ‍ॅन्ड्रॉइडच्या रूपात बदल करून त्याद्वारे आपण आपला फोन विकसित करू शकतो.
अगदी याच कारणामुळे डबघाईला आलेली अनेक कंपन्यांची दुकाने पुन्हा एकदा चालू
लागली आहेत. बाजारात नजर टाकली असता एचटीसी, मोटोरोला, सोनी एरेक्सन, सॅमसंग या
साऱ्या कंपन्यांनी अ‍ॅन्ड्रॉइड फोन्स डेव्हलप करण्यावरच भर दिल्याचे दिसून
येते.

काहीही असले तरी ‘एचटीसी’ हाच अ‍ॅन्ड्रॉइडचा जिवाभावाचा मित्र मानला
जातो, कारण ‘एचटीसी’नेच ‘ड्रीम’ हा पहिला अ‍ॅन्ड्रॉइड फोन बनविला, मग पुढे
आयफोनला टक्कर देण्यासाठी एचटीसीने अ‍ॅन्ड्रॉइडला सोबत घेऊन कधी ‘हीरो’, तर कधी
‘लिजेण्ड’ला बाजारात आणला. आता अ‍ॅन्ड्रॉइडला सर्व ऑपरेटिंग सिस्टमपेक्षा हटके
आणि बेस्ट बनविणाऱ्या त्याच्या फिचर्सबद्दल जाणून घेऊ या. सर्वात महत्त्वाचे
वैशिष्टय़े म्हणजे अ‍ॅन्ड्रॉइड फोन सर्वसामान्यांच्या खिशालाही सहज परवडतो.
अगदी किफायतशीर किमतीत हे फोन्स उपलब्ध होतात. तुम्ही 7 हजारांपासून पुढे
कोणताही महागडा फोन घेऊ शकता.

सर्वात जमेची बाजू म्हणजे अ‍ॅन्ड्रॉइडच्या डोक्यावर गुगल बाबांचा हात
आहे. त्यामुळे गुगलच्या सर्वच सव्‍‌र्हिसेस (यू टय़ुब, गुगल मॅप्स इत्यादी)
अ‍ॅन्ड्रॉइडवर वरदान म्हणून उपलब्ध होतात. तसेच अ‍ॅन्ड्रॉइड फोन्स फ्लॅश
सपोर्टेड असतात, त्यामुळे वेब पेजेसचा ले आऊट अगदी लॅपटॉपइतकाच चांगला दिसतो.
सध्या तरुणाईचे सर्वस्व झालेल्या सोशल नेटवर्किंगसाठी त्याचा चांगला उपयोग
होतो. फेसबुक, ट्वीटरसाठी वेगवेगळे अ‍ॅप्स वापरण्यापेक्षा फक्त कॉन्टॅक्ट नेमवर
क्लिक केले असता साऱ्या अपडेट्स एकाच ठिकाणी पाहता येतात.

अ‍ॅन्ड्रॉइडमध्ये सगळा डाटा क्लाऊडवर म्हणजे दूर असलेल्या
सव्‍‌र्हरवर सेव्ह होतो. त्यामुळे आपल्याला अनलिमिटेड फोन मेमरी व अनलिमिटेड
कॉलहिस्टरी लिस्ट मिळते. त्याशिवाय अ‍ॅन्ड्रॉइड ओपन सोर्स असल्याने आपणही
आपल्या गरजेनुसार अ‍ॅप्स बनवता येऊ शकतात. अशाप्रकारे अनेकांकडून डिझाइन केल्या
गेलेल्या उपलब्ध असणाऱ्या अ‍ॅप्लिकेशन्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

टेक्नोसॅव्ही लोकांच्या हातात अ‍ॅन्ड्रॉइडच नवीन व्हर्जन येते,
तोपर्यंत ते जुने झालेले असते. म्हणजेच अ‍ॅन्ड्रॉइड एकानंतर एक असे अनेक
सर्वोत्तम व्हर्जन्स बाजारात आणते, त्यांची नावेही जिभेला पाणी आणणारी असतात.
अ‍ॅन्ड्रॉइड१.५- कप केक, अ‍ॅन्ड्रॉइड१.६ डोनट, अ‍ॅन्ड्रॉइड २.० एक्लेअर इ.. आता
अ‍ॅन्ड्रॉइड हनिकॉम्ब व जिंजरब्रेड यांच संकरित रूप असलेल
‘अ‍ॅन्ड्रॉइड-आईस्क्रीम सॅण्डविच’ हे नवीन व्हर्जन लवकरच बाजारात आणणार आहे.

एकूणच दिवसागणिक अधिक शक्तिशाली होत जाणाऱ्या अ‍ॅन्ड्रॉइडने सध्या
साऱ्या बाजारात धुमाकूळ घातला आहे.

Friday, July 15, 2011

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ...............

आज गुरू पूर्णिमा. भगवान विष्णूचे अवतार मानले जाणारे महर्षी व्यास यांनी
आजच्या दिवशी बह्मसूत्रे लिहावयास प्रारंभ केला असे मानले जाते.महर्षी
व्यासांना आद्यगुरू म्हटले जाते.आपण त्यांना ओळखतो ते महाभारताचे लेखक म्हणून.
परन्तु सार्‍या जगाला त्यांनी अनेकोविध धर्मग्रन्थ उपलब्ध करून दिले म्हणूनच हा
दिवस गुरु पूर्णिमा म्हणून ओळखला जातो.
आर्यावर्तातले सर्व ॠषीमुनी ह्या दिवशी चातुर्मास पाळण्यासाठी वनात जात .आजही
दिनदर्शिकेत ह्या दिवसाची नोंद सन्यासी जनांचा चातुर्मास अशी आहे.

आर्यावर्तात वेदातील ऋचा विखुरलेल्या अवस्थेत होत्या,त्या सर्व संकलित करून
त्यांची चार वेदात विभागणी करण्याचे महान कार्य त्यांनी केले. यामुळे सर्व
सामान्य जनांनाही वेदांचा ठाव लागला.यापूर्वी हे सनातन धर्माचे ज्ञान, मौखिक
परंपरेने गुरुकडून शिष्याला प्राप्त व्हायचे. त्या काळातील हा सर्वात मोठा
उद्योग असला पाहिजे.

भगवान व्यासांनी अठरा पुराणेही लिहिली. धर्मग्रंथांचे सार सूत्ररूपाने सांगून
ते शिष्याकडून पाठ करून घ्यायचे अशी त्यावेळी पद्धत होती. त्यामुळे मूळ
ग्रंथातील विचार कायम रहात असे. भागवत धर्मातील नारद भक्तीसूत्र तसेच
शांडिल्यसूत्र तसेच शटदर्शनांची न्यायसूत्रे, वैशेषिक सूत्रे, योगसूत्रे ही
त्यांची काही उदाहरणे. व्यासगुरुंनी ब्रह्मसूत्रे लिहिली असा सार्वत्रिक समज
आहे. ह्याच ब्रह्मसूत्रांना वेदांतसूत्रेही म्हणतात्.कारण वेदांचे संपूर्ण
ज्ञान ह्यात सामावले आहे. सर्व सूत्रांच्यात ती सर्वात प्रसिद्ध आहेत. ही
ब्रह्मसूत्रे ५५५ असून त्यांचे चार अध्यायात वर्गीकरण केले आहे. समन्वय,
अविरोध, साधना आणी फल.या चार विभागात अनेक पाद आहेत आणी अनेक अधिकरणे.परंतु ती
फार क्लिष्ट आहेत. त्यामुळे वेदान्तावरील भाष्याच्या शिवाय त्याचा अर्थ समजणे
कठीण आहे. उदाहरणार्थ प्रथमाध्यायात जिज्ञासाधिकरणात पहिले सूत्र आहे "अथातो
ब्रह्मजिज्ञासा."म्हणून ब्रह्माबद्दल जिज्ञासा " हे सूत्र समजण्यासाठी
जिज्ञासूला प्राथमिक माहिती असली पाहिजे. जसे नित्य अनित्य विवेक, फलत्याग्,
शट्सम्पत इत्यादी. हे लिहिण्याचे कारण एवढेच की थोडक्या शब्दात गर्भित अर्थ
किती आहे.

महर्षी व्यासांना कॄष्णद्वैपायन व्यास असेही त्यांच्या वर्णावरून ओळखले
जाते.तसेच त्यांचा जन्म बदरिकावनात झाला म्हणून त्यांना बादरायणही म्हणतात.
आद्य शंकराचार्य त्यांच्या शांकरभाष्यात महर्षी व्यासांना महाभारतकार तसेच
गीतेचे जनिते मानतात पण ब्रह्मसूत्रे बादरायणांची असे मानतात. मात्र त्यांचे
शिष्य ब्रह्मसूत्रांचे श्रेय व्यासांनाच देतात. ही ब्रह्मसूत्रे वेदांच्या आणी
उपनिषदांच्या तसेच भगवतगीतेतील भासमान विरोधाभासाचा अन्वयार्थ लावून त्यांना
योग्य त्या सन्दर्भात स्थान देऊन सर्व धर्मग्रन्थातील तत्वे एका छत्राखाली
आणण्यास यशस्वी झाली आहेत असे मानण्यास प्रत्यावाय नाही.

व्यासोच्छिष्ट्म जगत्रयम असे म्हणतात ते याच कारणासाठी तर नाहे?

गुरु ब्रम्हा! गुरु विष्णू! गुरु देवो महेश्वरा!

गुरु साक्षात परब्रमः! तस्मैश्री गुरुदेव नमः ..

"सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!

"जन्म देणारी माता मुल पोटात असताना नऊ महिने नऊ दिवस कधी होतील आणि केव्हा पोट
हलके होईल ह्याची वाट पहाते. चार दिवस अधिक गेले तर कधी बालंतीन होणार म्हणून
डॉक्टरांना विचारते. मुलगी असेल तर ती उपवर होताच जावयच्या हातात देऊन मोकळी
होते, आणि मुलगा असल्यास तो शिक्षण संपवून नोकरी करू लागला कि त्याला सुनेच्या
ताब्यात देऊन मोकळी होते, पण गुरुमाता मात्र आपले अनंत अपराध पोटात घालून, नाना
प्रकारे बोध करून जन्मजन्मांतरीचे संस्कार नाहीसे करते आणि भवबंधनातून सोडवून
आपणांस कायमचे सुखी करते"
आपण "माणूस जन्म - प्राणी जन्म - माणूस जन्म " अश्या भवचक्रात सापडून दुखं,
संकटे व त्रास भोगत आहोत, अश्या ह्या बिकट भवचक्रातून सुटण्यासाठी आपण फक्त आणि
फक्त मनुष्य जन्मातच देवाची कृपा संपादन करू शकतो, आणि देवाची हि कृपा संपादन
करून देण्यासाठी केवळ गुरु हे एकच समर्थ आहेत. आपण मनुष्यच काय तर, साक्षात
देवाने सुद्धा मानव अवतारात गुरु करून घेतले होते, आणि गुरुचे महत्व पटवून दिले
होते , जसे कि ....
श्री रामाचे गुरु वशिष्ठ
श्री कृष्णाचे गुरु सांदीपन
मग आपण तर फार साधी माणसे आहोत, आपल्यासाठी गुरु करून घेणे किती महत्वाचे आहे
नाहीका ? ह्यावरून सुखी जीवन जगण्यासाठी व मुक्ती मिळवून ह्या भवचक्रातून
कायमचे सुटण्यासाठी गुरुंच्या सहाय्याची, मार्गदर्शनाची फार जरुरी आहे हे कळून
येते.
" अश्या बिकट भवचक्रातून आपली सुटका व्हावी हि इच्हा "


"सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

गुरूंच्या आज्ञेपुढे स्वत:ला झोकून देणारा शिष्य अरुणी ! - गुरु पोर्णिमा

पूर्वी धौम्य नावाच्या मुनींचा एक आश्रम होता. तेथे त्यांचे पुष्कळ शिष्य
विद्याभ्यासासाठी रहात. त्यात अरुणी नावाचा एक शिष्य होता. एकदा जोराचा पाऊस
पडू लागला. जवळील ओढ्याचे पाणी शेतात जाऊ नये; म्हणून तेथे एक बांध घातला होता.
त्या बांधालाही पाण्याच्या जोराने भेगा पडू लागल्या. तेव्हा गुरुदेवांनी काही
शिष्यांना सांगितले, ''पाणी शेतात येऊ देऊ नका आणि पाणी आडवा.''

अरुणी आणि काही शिष्य बांधाजवळ आले. बांधाला पडलेल्या भेगा
मिटवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले; पण पाण्याचा जोर जास्त असल्याने सर्व
प्रयत्न व्यर्थ गेले. बांधाचा मधला थोडासा भाग फुटू लागला आणि पाणी हळूहळू
शेतात येऊ लागले. तेव्हा रात्र झालेली होती. आता काही उपयोग नाही; म्हणून सर्व
शिष्य परत आले. दिवसभर कष्ट केल्यामुळे दमलेले सर्व जण गाढ झोपी गेले.
सकाळपर्यंत पाऊस थांबला. तेव्हा सर्वांच्या लक्षात आले. अरुणी कोठेही नाही.
सगळया आश्रमात शोधून शेवटी ते गुरुदेवांकडे गेले आणि म्हणाले, ''गुरुदेव, अरुणी
हरवला.'' गुरुदेव म्हणाले, ''आपण शेतात जाऊन बघूया.'' सर्व शिष्य आणि धौम्यऋषी
शेतात जातात. पहातात तर काय ? फुटलेल्या बांधाच्या मध्ये पाणी अडवण्यासाठी
स्वत: अरुणीच तेथे आडवा झोपलेला त्यांना दिसला. हे पाहून सर्व जण थक्क झाले.
रात्रभर पावसात न जेवता झोपलेल्या अरुणीविषयी सर्वांच्या मनामध्ये प्रेम
निर्माण झाले. पाणी तर केव्हाच ओसरलेले होते; पण अरुणीला तेथे झोप लागलेली
होती. सर्वांनी त्याच्याजवळ जाऊन त्याला उठवले. गुरुदेवांनी त्याला जवळ घेऊन
प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. हे पाहून सर्व शिष्यांच्या डोळयांत
पाणी आले.

मुलांनो, अरुणीकडून आपण काय शिकायचे ? तर गुरूंचे आज्ञापालन करण्याची
तीव्र तळमळ. गुरूंचे आज्ञापालन करण्यासाठी अरुणीने स्वत:चा विचार केला नाही;
म्हणूनच तो गुरूंचा आवडता शिष्य बनला. यासाठी आपणही आपल्या गुरूंच्या चरणी
प्रार्थना करूया, 'हे गुरुदेवा, आमच्यामध्येही शिष्याचा 'आज्ञापालन' हा गुण
निर्माण होऊ दे.'

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Thursday, July 14, 2011

मुंबई बॉम्ब स्पोट

गप्प बसलोत तर ...नंबरतो सबका आये गा.......
आज नाही.....आत्ता नाही........तर पुन्हा कदीच नाही.....
प्रत्येक गोष्टीची वेळ असते
  तेव्हाच ती घडायला हवी
  वेळ निघून जाण्यापूर्वीच
   तिची किंमत कळायला हवी.....!
मुंबई बॉम्ब स्पोटात मरण पावलेल्या सर्व भारतीयांना भावपूर्ण श्रध्दांजली.....

माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढीच माणसं दूर जातात..?

माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढीच माणसं दूर जातात..?
फुलांना जास्त कवटाळल्यावर पाकळ्याही गळून पडतात
ज्याला मनापासुन आपलं मानल तिच आपल्याला विसरून जातात
फुले गळु लागली की फुलपाखरेदेखील सोडून जातात
आपन जे मागितले तेच मिळत नाही बहूतेक आशेवर जगणं यालाच खरं जगणं म्हणतात..

Tuesday, July 12, 2011

SOLVE THE MYSTERY 64=65

 
 

परीस ( पारस ) - Nice Marathi Bodh katha

एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला.... त्यासाठी रस्त्यात जो दगड
येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा
दिनक्रम सुरू झाला दिवस गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... पण
त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग
तो फेकून द्यायचा....
शेवटी तो माणूस म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणि
तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या
गळ्यातील साखळीकडे गेले...
ती साखळी सोन्याची झाली होती.....
दगड
घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे
लक्षच गेले नाही....

तात्पर्य:
प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी
परीस येत असतो...कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या
नात्याने...तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने .....तर कधी
प्रेयसीच्या नात्याने..... कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत
असतो... आणि आपल्यातल्या
लोखंडाचे सोने करीत असतो...... आपण जे काही
असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो .......
पण फार कमी
लोक या परीसाला ओळखू शकतात .......

गजानन अष्टक

गजानन अष्टक


गजानना गुना गारा परम मंगल पावना
अशी अवघे हरी, दुरित तेची दुर्वासना
नसे त्रिभुवना मध्ये तुझ विन आम्हा आसरा
करी पदानता वरी बहु दया न रोषा धरा ||१||

निरालस पणे नसे घडली अल्प सेवा करी
तुझी पती पावना भटकलो वृथा भू वरी
विसंबत न गाय ती अपुल्या कधी वासरा
करी पदानता वरी बहु दया न रोषा धरा ||२||

आलास जगी लावन्या परतुनी सु वाटे जन
समर्थ गुरु राज भूषवी नाम नारायण
म्हणून तुझ प्रार्थना सतत जोडूनिया करा
करी पदानता वरी बहु दया न रोषा धरा ||३||

क्षणात जल आणिले नसून थेंब त्या वापी ला
क्षणात गमानाप्रती करिसी इच्ह्चीलेल्या स्थळा
क्षणात स्वरूपे किती विविध धरिसी धीवरा
करी पदानता वरी बहु दया न रोषा धरा ||४||

अगाध करनी तुझी गुरुवरा न कोणा कळे
तुला त्यजुनी व्यर्थ ते अचरितात नाना खुळे
कृपा उदक मागती त्यजुनी गौतमी च्या तीरा
करी पदानता वरी बहु दया न रोषा धरा ||५||

समर्थ स्वरूप प्रती धरून साच बाळापुरी
तुम्ही प्रगत जाहला सुशील बाळकृष्णा घरी
हरी स्वरूप घेउन दिधली भेट भीमा तीरा
करी पदनतावरी बहु दया न रोषा धारा ||६||

स-छिद्र नौके प्रती त्वदीय पाया हे लागता
जलात बुडता तरी त्यासी नर्मदा दे हाता
अश्या तुजसी वागण्या न च समर्थ माझी गिरा
करी पदनतावरी बहु दया न रोषा धारा ||७||

आता न बहु बोलता तव पदाम्बुजा वंदितो
पडो विसर न कदा मदीय हे ची मी मागतो
तुम्ही वरद आपुला कर धारा गानू च्या शिरा
करी पदनतावरी बहु दया न रोषा धारा |८||

Monday, July 11, 2011

रडवणं असतं अगदी सोपं

रडवणं असतं अगदी सोपं
बघा जरा कुणाला हसवुन
टाके घालायला वेळ लागतो
सहज टाकता येतं उसवुन

निर्धार पाळायला निश्चय हवा
कारण नाही लागत मोडायला
क्षणार्धातच रेघ मारता येते
वेळ लागतो ती नीट खोडायला

नाकारणं एक पळवाट असते
सामोरं जाउनच होतो स्विकार
कर्तव्यासाठी लागतोच त्याग
हक्क करतात नुसती तक्रार

एकदा पाडुन फोडलेले कप
कधिच सांधता येत नाहीत
एकदा दुरावलेली मने मग
पहील्यासारखी होत नाहीत

*माणूस म्हणून जगताना*

*माणूस म्हणून जगताना*
*हा एक हिशोब करुन तर बघा!*

*“किती जगलो” याऐवजी “कसे जगलो”?*

*हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!*

*कधी असेही जगून बघा…..*



*कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी*

*समोरच्याचा विचार करुन तर बघा!*

*तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी*

*न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!*

*कधी असेही जगून बघा…..*



*संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात*

*कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!*

*स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण*

*कधीतरी बुडत्या्साठी काठीचा आधार होउन तर बघा!*

*कधी असेही जगून बघा…..*



*वर्तमान आणि भवि्ष्याची चिंता तर सदाचीच असते*

*कधीतरी भूतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा!*

*काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले?*

*आधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा!*

*कधी असेही जगून बघा…..*



*प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी?*

*एखाद्यावर जिवापाड,निर्मळ,एकतर्फी प्रेम करुन तर बघा!*

*ज्या प्रेमाबद्दल सर्व जग कुतूहल करते*

*त्या अथांग भावनेची व्याख्या करुन तर बघा!*

*कधी असेही जगून बघा…..*



*अतिसामान्य जीवन नशीबी असले म्हणून काय झाले?*

*कधीतरी सामान्यातले असामान्य होण्याची जिद्द दाखवून तर बघा!*

*चिमणीसारखा जन्म मिळाला असला तर काय झाले?*

*आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करुन तर बघा!*

*कधी असेही जगून बघा…..*



*आयुष्य रोजच वेगवेगळे रंग उधळते*

*त्या रंगांमधे आनंदाने रंगून तर बघा!*

*तसे जगायला काय?कुत्रे-मांजरीही जगतात हो*

*कधीतरी माणूस म्हणुन स्वतःच्या जगण्याचा उद्देश शोधून तर बघा!*

*कधी असेही जगून बघा…..*

विठ्ठल हा कितवा अवतार ?

विठ्ठल हा कितवा
अवतार ?

 विष्णुभगवानांनी घेतलेल्या दशावतारांची नांवे सर्वांनाच
तोंडपाठ असतात. त्यामधील मत्स्य, कूर्म आणि वराह हे पहिले तीन अवतार
प्राणीवर्गांत घेतलेले आहेत. त्यांच्याबद्दल सुसंगत अशी फारशी माहिती सर्वांना
ठाऊक नसते. भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी नरसिंह अवतार धारण करून त्याने
हिरण्यकश्यपु राक्षसाला ठार मारले आणि बटु वामनाच्या वेषात येऊन महाबळीराजाला
पाताळात गाडले. एवढी कामे करण्यापुरतेच श्रीविष्णूने हे दोन अवतार घेतले आणि
कार्यभाग संपताच ते पुन्हा अदृष्य होऊन गेले. अशा रीतीने त्यांच्या पहिल्या
पांच अवतारांमधील संपूर्ण जीवनाची कथा सामान्यांना ज्ञात नसते. त्यानंतरचे
परशुराम, रामचंद्र आणि श्रीकृष्ण या तीन अवतारांबद्दल अनेक आख्याने ऐकलेली
असतात. या अवतारांमधील त्यांचे आईवडील कोण होते, त्यांचे बालपण कसे गेले, मोठे
झाल्यावर त्यांनी कोणते जीवितकार्य केले वगैरेची मात्र खूप सविस्तर माहिती
बहुतेक लोकांना ठाऊक असते. शेवटचे दोन अवतार बुद्ध आणि कल्की यांच्याबद्दल
मात्र थोडा संभ्रम आहे.

दहावा कल्की अवतार कधी होणार आहे कोणास ठाऊक? तो होऊन गेला आहे असेही कांही लोक
समजतात, पण ‘विष्णूचा अवतार’ म्हणून ओळखला जावा एवढा मोठा महापुरुष कांही
अलीकडच्या काळात होऊन गेलेला दिसत नाही. सर्वसाधारणपणे गौतम बुद्धालाच
‘विष्णूचा नववा अवतार’ मानले जाते. पण पंढरपूरचा विठ्ठल हाच ‘बुद्ध’ नांवाचा
नववा अवतार आहे असे समजणारे अनेक लोक महाराष्ट्रात आहेत. हा समज कधी आणि कुठे
निर्माण झाला आणि कोठपर्यंत पसरला ते माहीत नाही, पण मी तो लहानपणीच ऐकला होता
आणि इतिहासाच्या पुस्तकातून गौतमबुद्धाची ओळख होण्यापूर्वी मी ही तसेच समजत
होतो. सह्याद्री वाहिनीवरील विठ्ठलाची माहिती देणारा एक बोधपट काल पाहिला
त्यांतसुद्धा असेच विधान केलेले दिसले. त्याबद्दल थोडे स्पष्टीकरणसुद्धा दिले
गेले.



भक्त पुंडलीकावर प्रसन्न होऊन भगवान विष्णु त्याला भेटायला त्याच्या पंढरपूर
येथील जागी आले. नेमका त्या वेळेस तो आपल्या आईवडिलांच्या सेवेत गर्क होता,
म्हणून त्याने विष्णूच्या दिशेने एक वीट भिरकावून देऊन तिच्यावर थोचा वेळ उभे
रहायला सांगितले. पुंडलीकाला पुरसत मिळताच त्याने विष्णूला वंदन करून त्याची
क्षमा मागितली आणि त्याने कशासाठी येणे केले ते विचारले. विष्णूने आपण
त्याच्यावर प्रसन्न झालो असल्याचे सांगून कोणतेही वरदान मागायला सांगितले, पण
“आपण आपल्या मातापितरांच्या सेवेत पूर्णपणे संतुष्ट आहोत, आपल्याला आणखी कांही
नको” असे पुंडलीकाने सांगितले. “स्वतःसाठी कांही नको असल्यास इतरांसाठी माग”
असे म्हणताच “देवाने आपला पुढील अवतार सुजनांच्या कल्याणासाठी घ्यावा” असे
मागणे त्याने मागितले आणि देवाने “तथास्तु” म्हंटले. तोच त्याचा पुढचा अवतार
समजायचा कां नाही यावर दुमत होऊ शकते.

‘अवतरणे’ म्हणजे वरून खाली येणे एवढा अर्थ घेतला तर विठ्ठल हा सुद्धा एक
‘अवतार’ ठरू शकतो, पण या अवतारात त्याने त्यापूर्वीच्या परशुराम, रामचंद्र व
श्रीकृष्ण यांच्यातल्याप्रमाणे मानवी मातापित्यांच्या घरी जन्म घेतलेला नाही.
गौतमबुद्धाने मात्र ‘सिद्धार्थ’ या नांवाने मनुष्यजन्म घेतला होता हा एक फरक
आहे. विठ्ठलाच्या नांवाला बहुधा शास्त्रपुराणांचा आधार नसावा. विष्णूच्या
दशावतारांच्या यादीत त्याचे नांव नाही तसेच केशव, नारायण, माधव इत्यादी
त्याच्या ज्या चोवीस नांवांना पूजाविधीमध्ये सारखा नमस्कार केला जातो त्यातही
विठ्ठल हे नांव नाही. इतकेच नव्हे तर विष्णूसहस्रनामांत देखील त्याचा समावेश
नाही. गौतमबुद्धाचा आहे की नाही ते माहीत नाही, पण विठ्ठलाच्या नांवाला
शास्त्रपुराणांची मान्यता मिळालेली होती असे दिसत नाही.

विठ्ठल आणि गौतमबुद्ध या दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे दोघांनीही
कुठल्या दैत्याचा संहार वगैरेसारखी हिंसा केलेली नाही. विष्णूच्या हातात नेहमी
सुदर्शनचक्र, शंकराकडे त्रिशूळ किंवा श्रीरामाकडे धनुष्यबाण असतात, पण
पांडुरंगाच्या हातात कोणतेही शस्त्र नसते. दोन्ही हात कंबरेवर ठेऊन तो शांत
मुद्रेने उभा असतो. गौतमबुद्धाने तर क्षत्रियधर्माचा त्याग करून अरण्यवास
पत्करला आणि विश्वबंधुत्वाचा उपदेश जगाला केला. विठ्ठलाच्या भक्तांनी म्हणजेच
सर्व संतांनीसुद्धा आपसातील प्रेम वाढवण्याचाच संदेश सगळ्या लोकांना दिला.
विठ्ठलाने त्यांना परोक्ष अपरोक्ष रूपाने सतत सहाय्य केले असल्याच्या आख्यायिका
आहेत. “देवाने आपला पुढील अवतार सुजनांच्या कल्याणासाठी घ्यावा” ही मागणी अशा
रीतीने पूर्ण होतांना दिसते.

आजच्या काळातील बौद्धधर्मीय लोक आपला ‘धम्म’च वेगळा मानतात आणि चीन, जपान,
श्रीलंका यासारख्या परदेशातून आलेले भिख्खू त्यांच्या धार्मिक विधींचे संचलन
करतांना दिसतात. गौतमबुद्धाला श्रीविष्णूचा अवतार मानणे या धम्मपंडितांना कितपत
मान्य आहे कोणास ठाऊक? तसे नसेल तर कदाचित आणखी कांही वर्षांनी तरी विष्णूच्या
दशावतारातील नवव्या अवताराची वेगळी ओळख करावीच लागेल.

Thursday, July 7, 2011

निस्वार्थ मैत्री

*कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते
निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच
अडखळला, मित्र या शब्दाचा अर्थ
तो दूर गेल्यावर कळला.*


*हिरव्या श्रावणात हातावर रंगलेल्या ... मेंदी सारखी....
आयुश्यभर आठवत रहाते....

मैत्री म्हणजे एकमेकांना समजणं.. आणि समजावणं असतं.....
मैत्री म्हणजे... कधी कधी स्वताःलाच आजमावणं असतं .....

घट्ट लावलेलं मनाचं दार.. मैत्रीत अलगद उघड्तं....
हळव्या मनात जपलेलं 'अलगुज' अवचित ओठांवर येतं......

मैत्री मधुनच जन्म घेतं.. निखळ प्रेमाचं रोपटं.....
प्रेम ! परमेश्वरानं माणसाला दिलेली... सर्वात सुंदर गोश्ट !......

मित्राचा 'सखा' आणि मैत्रीणीची 'सखी'......
मैत्रीतुनच फ़ुलतात नाती.... फ़ुलपाखरासारखी........

इन्द्रधनुश्यी रंग लेवुन.. फ़ुलपाखरु आकाशात झेपावते.....
हिरव्या श्रावणातली मेंदी.. आणखीनच रंगत जाते.....!!*
--
*

मैत्री करण्यासाठी ....

मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर

काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते
निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच
अडखळला, मित्र या शब्दाचा अर्थ
तो दूर गेल्यावर कळला.

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
*--

101 ways to make other people smile

I have already started putting some of these into practice and note that the results are absolutely phenomenal.


01. Call an old friend, just to say hi.
02. Hold a door open for a stranger.
03. Invite someone to lunch.
04. Compliment someone on his or her appearance.
05. Ask a coworker for their opinion on a project.
06. Bring cookies to work.
07. Let someone cut in during rush hour traffic.
08. Leave a waitress or waiter a big tip.
09. Tell a cashier to have a nice day.
10. Call your parents.
11. Let someone know you miss them.
12. Treat someone to a movie.
13. Let a person know you really appreciate them.
14. Visit a retirement center.
15. Take a child to the zoo.
16. Fill up your spouse’s car with gas.
17. Surprise someone with a small gift.
18. Leave a thank-you note for the cleaning staff at work.
19. Write a letter to a distant relative.
20. Tell someone you thought about them the other day.
21. Put a dime in a stranger’s parking meter before the time expires.
22. Bake a cake for a neighbor.
23. Send someone flowers to where they work.
24. Invite a friend to tea.
25. Recommend a good book to someone.
26. Donate clothing to a charity.
27. Offer an elderly person a ride to where they need to go.
28. Bag your own groceries at the checkout counter.
29. Give blood.
30. Offer free baby-sitting to a friend who’s really busy or just needs a break.
31. Help your neighbor rake leaves or shovel snow.
32. Offer your seat to someone when there aren’t any left.
33. Help someone with a heavy load.
34. Ask to see a store’s manager and comment on the great service.
35. Give your place in line at the grocery store to someone who has only a few items.
36. Hug someone in your family for no reason.
37. Wave to a child in the car next to you.
38. Send a thank-you note to your doctor.
39. Repeat something nice you heard about someone else.
40. Leave a joke on someone’s answering machine.
41. Be a mentor or coach to someone.
42. Forgive a loan.
43. Fill up the copier machine with paper after you’re done using it.
44. Tell someone you believe in them.
45. Share your umbrella on a rainy day.
46. Welcome new neighbors with flowers or a plant.
47. Offer to watch a friend’s home while they’re away.
48. Ask someone if they need you to pick up anything while you’re out shopping.
49. Ask a child to play a board game, and let them win.
50. Ask an elderly person to tell you about the good old days.
51. During bad weather, plan an indoor picnic with the family.
52. Buy someone a goldfish and bowl.
53. Compliment someone on their cooking and politely ask for a second helping.
54. Dance with someone who hasn’t been asked.
55. Tell someone you mentioned them in your prayers.
56. Give children’s clothes to another family when your kids outgrow them.
57. Deliver extra vegetables from your garden to the whole neighborhood.
58. Call your spouse just to say, I love you.
59. Call someone’s attention to a rainbow or beautiful sunset.
60. Invite someone to go bowling.
61. Figure out someone’s half-birthday by adding 182 days, and surprise them with a cake.
62. Ask someone about their children.
63. Tell someone which quality you like most about them.
64. Brush the snow off of the car next to yours.
65. Return your shopping cart to the front of the store.
66. Encourage someone’s dream, no matter how big or small it is.
67. Pay for a stranger’s cup of coffee without them knowing it.
68. Leave a love letter where your partner will find it.
69. Ask an older person for their advice.
70. Offer to take care of someone’s pet while they’re away.
71. Tell a child you’re proud of them.
72. Visit a sick person, or send them a care package.
73. Join a Big Brother or Sister program.
74. Leave a piece of candy on a coworker’s desk.
75. Bring your child to work with you for the afternoon.
76. Give someone a recording of their favorite music.
77. Email a friend some information about a topic they are especially interested in.
78. Give someone a homemade gift.
79. Write a poem for someone.
80. Bake some cookies for your local fire or police department
81. Organize a neighborhood cleanup and have a barbecue afterwards.
82. Help a child build a birdhouse or similar project.
83. Check in on an old person, just to see if they’re okay.
84. Ask for the recipe after you eat over at someone’s house.
85. Personally welcome a new employee at work and offer to take them out for lunch.
86. While in a car, ask everyone to buckle up because they are important to you.
87. Let someone else eat the last slice of cake or pizza.
88. Stop and buy a drink from a kid’s lemonade stand.
89. Forgive someone when they apologize.
90. Wave to someone looking for a parking space when you’re about to leave a shopping center.
91. Send a copy of an old photograph to a childhood friend.
92. Leave a pint of your spouse’s favorite flavor of ice cream in the freezer with a bow on it.
93. Do a household chore that is usually done by someone else in the family.
94. Be especially happy for someone when they tell you their good news.
95. Compliment a coworker on their role in a successful project.
96. Give your spouse a spontaneous back rub at the end of the day.
97. Serve someone in your family breakfast in bed.
98. Ask someone if they’ve lost weight.
99. Make a donation to a charity in someone’s honor.
100. Take a child to a ballgame.
101. Share this list to 10 of your favorite people

काही आठवणी विसरता येत नाहीत




काही आठवणी विसरता येत नाहीत
काही नाती तोडता येत नाहीत....

मानस दुरावली तरी मन नाही दुरावत
चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत

वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत
पावल अडखलली तरी चालण नाही थांबत

अंतर वाढल म्हणून प्रेम नाही आटत
बोलण नाही झाल तरी आठवण नाही थांबत

गाठी नाही बांधल्या म्हणून बंध नाही तुटत
परके झाले तरी आपलेपण नाही सरत

नवीन नाती जोडली तरी जुनी नाती नाही तुटत
रक्ताची नसली तरी.....काही नाती नाही तुटत

एकही मित्र नाही असा माणूस कुठेच नसेल
थोड्या पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल

शरीरात रक्त नसेल तरी चालेल पण आयुष्यात मैत्री ही हवीच
कितीही जुनी झाली तरी ती नेहमी वाटते नवीच

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते
कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते.

मैत्री म्हणजे त्याग आहे मैत्री म्हणजे विश्वास आहे
हवा फक्त नावापुरती तर मैत्री खरा श्वास आहे

मैत्रीच्या या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे
खरे नात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे...

नातं.....!

नातं

या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर
मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं.

अस नातं गुंफ़ता गुंफ़ता
स्वत:सोबत स्वत:चेच एक नाते
नकळतं गुंफ़ले जात असते...

कितीतरी खोल द-या, उंचच सुळक्यांचे डोंगर
अन काटेरी झुडपांचे रस्ते पार करतांना,
नात्याला धक्का न लागू देण्याची ती असोशी....

जगण्याचे सगळे संदर्भ त्या नात्यात एकवटून यावेत
अन जगता जगता ते नातंच एकाएकी गवसेनासं व्हावं..

रिकाम्या ओंजळीनेच मग
जगण्याचे सगळे धडे भरभरुन द्यावे.....

असं नातं जसं समृध्द करतं.... तसच वाताहातही करतं...

तरीही,

या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर
मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं.

मैत्री म्हणजे

*मैत्री म्हणजे विश्वास
मैत्री म्हणजे अभिमान
मैत्री म्हणजे जीवनातील
जगण्याचा स्वाभीमान

मैत्री म्हणजे प्रेम
मैत्री म्हणजे जाणीव
मैत्री शिवाय जीवनात
आधाराची उणीव

मैत्री म्हणजे विश्व
मैत्री म्हणजे आकाश
मैत्री म्हणजे तिमिरात
वाट दावणारा प्रकाश

मैत्री म्हणजे सुख दु:ख
मैत्री म्हणजे हर्श
मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा
हळुवार स्पर्श

मैत्री म्हणजे रान
मैत्री म्हणजे कोवळे उन
मैत्री म्हणजे जीव जडणारी
सुमधुर वार्याची धुन

मैत्री म्हणजे खेड
मैत्री म्हणजे पायवाट
मैत्री म्हणजे पिकाला
पाणी पाजणारा मळ्यातील पाट

मैत्री म्हणजे तेज
मैत्री म्हणजे तारा
मैत्री म्हणजे प्रत्येकाला
हवा असणारा मोहक वारा

मैत्री म्हणजे दिलेला शब्द
मैत्री म्हणजे आन
मैत्री म्हणजे घातलेली शपथ
मैत्री म्हणजे प्राण

मैत्री म्हणजे ओढ
मैत्री म्हणजे आठवण
मैत्री म्हणजे आयुश्यातील
न सम्पणारी साठवण

मैत्री म्हणजे मस्करी
मैत्री म्हण्जे राग
तरीही आपल्या जीवनातील
हा एक अविभाज्य भाग

काही मजेशीर व्याख्या,

काही मजेशीर व्याख्या,काही कधीतरी वाचलेल्या, तर काही रचलेल्या.
बघा आवड्तायेत का?

अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका

मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो

शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो

सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा

वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे

लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा

फ्याशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका

पासबुक/ब्यांक्बुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव (जर भरपूर ब्यालेंस
असेल तर)

ग्यालरी- मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा

लेखणी - एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन

छत्री - एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ

कॉलेज - शाळा आणि लग्न यामधील काळ घालवण्याचे मुलींचे एक साधन

परीक्षा - ज्ञान तपासून घेण्याचे एक 'हातयंत्र'

परीक्षा - पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ

विश्वशांती - दोन महायुद्धांच्या मधला काळ

दाढी - 'कुरुपपणा' लपवण्याचे' रुबाबदार' साधन

थाप - आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात

काटकसर - कंजूषपणाचे एक 'गोंडस' नाव

नृत्य - पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला

घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री
घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी

मन - साली नेहमी चोरीस जाणारी वस्तू

ब्रह्मचर्य - कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग

विवाहित माणूस - जन्मठेपेचा कैदी

विधुर - जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी

श्रीमंत नवरा - चालतं बोलतं atm कार्ड

श्रीमंत बायको - अचानक लागलेली लॉटरी

IT वाला - सतत काहीतरी काम करण्याचे सोंग करणारा इसम

IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री

बुद्धिवादी - ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा

नवरात्र - कंडोमचा खप वाढणारा काळ

स्कार्फ - बॉयफ्रेंड बरोबर बाईक वरून फिरताना कोणी ओळखू नये म्हणून थोबाड
लपवायचे मुलींचे एक साधन

चुंबन - रेशनकार्डाशिवाय मिळणारी साखर

लग्नाचा हॉल - दोन जिवांच वेल्डिंग करणारा कारखाना

मिसळपाव.कॉम - जगातील सर्व 'नमुन्यांचे' एकत्रित पणे टेस्टिंग करणारी
प्रयोगशाळा

आई फ़क्त तुझ्यासाठी.......

बांधून मनाशी खुणगाठी
निघालो धावत स्वप्नांपाठी
कचरते मन, अडखळते पाउल
आई फ़क्त तुझ्यासाठी.......
कशी राहशील सोडून मला
सतावेल आठवण क्षणाक्षणा
रडन्यासाठी तुला आता
न लागेल कांद्याचा बहाणा
बस stop वर तुझा हात सोडवताना
माझं उसणं अवसाण...गळून गेलं होतं
शेवटच्या क्षणी जर बाबांनी तुला माघे खेचलं नसतं...
त्या बस च  एक सीट नक्कीच रिकामं गेलं असतं...
प्रत्येक वेळी तुला फोनवर बोलताना
गळा अगदी दाटून येतो.....
थांबवून हुंदका कसाबसा मी..
balance संपल्याचा बहाणा करतो..
कळुन ही न कळल्यासारखी तू..
मग माझंच सांत्वन करतेस...
पण मलाही माहित आहे आई..
फोन ठेवताच तू रडतेस...
इथे रोज pizza आणि burger खाताना...
तुझ्या भाकर भाजीची आठवण येते..
अशी तुझी आठवण काढून जेवताना मग..
का कुणास ठावूक..प्रत्येक गोष्ट खारटचं लागते...
ऑफिसातुन थकुन घरी आल्या नंतर, तोंडातून
"आई चहा दे गं " अगदी सहज निघून जातं
आणि तू इथे नसल्याचं लक्षात येताच...
घर अगदी भकास भकास वाटू लागतं...
चहा पिण्याची इच्छा जाते मरून...
शरीर बोजड अन मन खिन्न खिन्न होतं.....
थकलेलं माझं शरीर, लगेचच...
स्वताःला निद्रेच्या ताबी देतं...
सताड जागं माझ मन मात्र, तुझा ..
केसांतून फिरणारा...गोंजारणारा हात शोधत राहतं...
सकाळी उठल्यानंतर पुन्हा मगं
माझी रोजचीच धावपळं सुरू होते...
आणि मग मनात विचार येतो...
तू असलीस की सर्व कसे सुरळीत होते...
अशा या माझ्या busy दिनचर्येत...
तुझी उणीव जाणवत राही क्षणोक्षणी
धावत येईन परत तुझ्यापाशी आई,
पहिली संधी मला मिळता क्षणी....
सरतील दिवस बघता बघता
परत येईन मी तुझ्याचपाशी...
ठेवून पायावर डोई, मागेन तुझी माफ़ी
सोडून तुला नाही जाणार.मी .पुन्हा कधीही  ....

****** *सुविचार स॑ग्रह ***********

*सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे.*
ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत
उभीच राहू शकत नाही.
आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू
शकत नाही.
जीवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग
येतात.
पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.
आपल्या भौतिक गरजा मर्यादीत ठेवून ध्येयपूर्तीसाठी धडपडणं अयोग्य नाही.
पण असं धडपडूनही अपेक्षित यश लाभलं नाही तर नियती देईल ते आनंदान स्विकारता
यायला हवं.
आयुष्यात कुटुंब, कामाचं ठिकाण, नातेवाईक, समाज अशा अनेक ठिकाणी संकटं येतात.
संकटं टाळता येणं शक्य नाही, पण...पण, दु:ख टाळता येणं शक्य आहे
एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलता येते आणि तीच ताकद विचारांमध्ये
असते.
कारण कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणूश यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या
प्रत्येकाने हे वाचायला हवं
नव्हे, अगदी १००% आचरणात आणायला हवं !

**************************************************
१) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
२) आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान
४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.
५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.
९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
१०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
१२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
१३) आपण जे पेरतो तेच उगवतं.
१४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
१५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.
१६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
१७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.
१८) आधी विचार करा; मग कृती करा.
१९) आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका,
२०) फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर
जगलास !
२१) एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
२२) अतिथी देवो भव ॥
२३) अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.
२४) दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.
२५) आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.
२६) निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.
२७) खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं
काहीतरी शिकण्याची संधी असते.
२८) उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.
२९) चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.
३०) नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
३१) माणसाची चौथी मूलभूत गरज म्हण्जे पुस्तक.
३२) सत्याने मिळतं तेच टिकतं.
३३) जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.
३४) परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.
n
३५) हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे; मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची
!
३६) स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.
३७) प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.
३८) खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची
३९) तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.
४०) वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस
!!
४१) जो गुरुला वंदन करत नाही; त्याला आभाळाची उंची लाभत नाही.
४२) गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.
४३) झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.
४४) माणसाचा सगळ्यात मोठा सदगुण म्हणजे त्याची माणुसकी
४५) क्रांती हळूहळू घडते; एका क्षणात नाही.
४६) सहल म्हणजे माणसिक आनंदाची सामुहिक क्रिडा
४७) मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.
४८) आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.
४९) बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.
५०) मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते
५१) तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
५२) शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.
५३) मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत
नाही.
५४) आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.
५५) एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
५६) परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !
५७) खिडकी म्हणजे आकाश नसतं.
५८) जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फ़ुलण्यात आहे
५९) वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.
६०) भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते.
६१) कविता म्हणजे भावनांचं चित्र!
६२) संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
६३) तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव
तुम्हाला देईल.
६४) ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !
६५) स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा वापर
कुणाला करु देऊ नका.
६६) अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.
६७) तुलना करावी पण अवहेलना करू नये.
६८) समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
६९) आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
७०) मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.
७१) चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.
७२) व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा.
७३) आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
७४) तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
७५) अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.
७६) विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
७७) मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.
७८) आयुष्यात प्रेम कारा ; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
७९) आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
८०) प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही.
८१) तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.
८२) सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.
८३) काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं.
८४) लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.
८५) चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.
८६) तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.
८७) भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद
देतो
पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.
८८) चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
८९) आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.
९०) उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही
९१) पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.
९२) अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
९३) मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
९४) रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय - मौन !
९५) अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.
९६) अंथरूण बघून पाय पसरा.
९७) कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात.
९८) तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची
माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.
९९) अतिशहाणा त्याचा बैल

फुले शिकवतात......,

फुले शिकवतात......,
गुलाब सांगतो,
येता जाता रडायचं नसतं,
काट्यात सुध्दा हसायचं असतं;

रात राणी म्हणते,
अंधाराला घाबरायचं नसतं,
काळोखात ही फुलायचं असतं;

सदाफुली सांगते,
रुसुन रुसुन रहायचं नसतं,
हसुन हसुन हसायचं असतं;

बकुळी म्हणते,
सावळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं,
गुणाच्या गंधाने जिंकायचं असतं;

मोगरा म्हणतो,
स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो,
सदगुणा॑चा सुगंध मैलवरुन ही येतो;

कमळ म्हणतो,
संकटाच्या चिखलात बुडायचं नसतं,

मैत्रीचा प्रवास

मनुष्य येतो जन्माला , भेटतो रक्ताच्या नात्यांना
ओळख होतांना जगाची, दिसते वाट मैत्रीची

जीवनाच्या वाटेवर..
मित्रांच्या सायकलीवर , 'डबलसीट', सुरु होतो मैत्रीचा प्रवास..

धावतात चिमुरडी पावलं आनंदाने
लपाछपी खेळतांना सापडतात गडी नवे
रुसवा फुगवा,देवघेव,दुखणे खुपणे
शाळा,छंदवर्ग अनेक मित्र-मैत्रिणी जोडे

महाविद्यालय जेव्हा दिसे कोप-यावरी
बेभान वा-यापरी मैत्री तेव्हा मनाला खुणवी
कँटीन,कट्ट्यांवर जरी होई उनाडकी
दोस्तांसवे अभ्यास भावी जीवनाचा पाया रची

ढिली होते पकड दोस्तीची, हाती पदवी पकडतांना
राहतात जुने दोस्त मागे , पोटापाण्यासाठी पळतांना
जुळतात मैत्रीचे बंध नवे , नोकरीत स्थिरावतांना
भेटते मैत्री अनोखी , ऑफिसात ओर्कुटींग करतांना

सावकाश , निवॄत्तीचा नारळ जेव्हा हातात पडतो
मॉर्निंगवॉक मित्रमंडळ तेव्हा साथ करतो
उगवता सूर्य बालपणीच्या मैत्रीची आठवण देतो
मावळतांना तारुण्यातल्या मैत्रीची हुरहुर लावतो

प्रकटतो मग, जन्मापासूनचा ' मित्र '..

अनंताच्या वाटेवर..
यमाच्या रेड्यावर ,'डबलसीट', सुरु होतो 'परत' मैत्रीचा प्रवास

कधी असेही जगून बघा…..

माणूस म्हणून जगताना
हा एक हिशोब करुन तर बघा!
“किती जगलो” याऐवजी “कसे जगलो”?
हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात
कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!
स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण
कधीतरी बुडत्या्साठी काठीचा आधार होउन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

वर्तमान आणि भवि्ष्याची चिंता तर सदाचीच असते
कधीतरी भूतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा!
काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले?
आधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी?
एखाद्यावर जिवापाड,निर्मळ,एकतर्फी प्रेम करुन तर बघा!
ज्या प्रेमाबद्दल सर्व जग कुतूहल करते
त्या अथांग भावनेची व्याख्या करुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

अतिसामान्य जीवन नशीबी असले म्हणून काय झाले?
कधीतरी सामान्यातले असामान्य होण्याची जिद्द दाखवून तर बघा!
चिमणीसारखा जन्म मिळाला असला तर काय झाले?
आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

आयुष्य रोजच वेगवेगळे रंग उधळते
त्या रंगांमधे आनंदाने रंगून तर बघा!
तसे जगायला काय?कुत्रे-मांजरीही जगतात हो
कधीतरी माणूस म्हणुन स्वतःच्या जगण्याचा उद्देश शोधून तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

"डोळ्यात तुझ्या पाहू दे"

 
तो तिला म्हणाला "डोळ्यात तुझ्या पाहू दे"
ती म्हणाली "पोळी करपेल, थांब जरा राहू दे"
तो म्हणाला "काय बिघडेल स्वयपांक नाही केला तर ?"
ती म्हणाली " आई रागावतील, दुध उतू गेल तर !"
"ठीक आहे मग दुपारी फिरून येवू, खाऊ भेळ"
..."पिल्लू येईल शाळेतून, पाणी यायची तीच वेळ"
"बर मग संध्याकाळी आपण दोघेच picture ला जाऊ"
"नको आज काकू यायच्यात, सगळेजण घरीच जेवू"

"तुझ्यामुळे गेली माझी चांगली सुट्टी फुकट"
"बघ तुझ्या नादामध्ये भाजी झाली तिखट"
आता मात्र तो हिरमुसला, केली थोडी धुसफूस
ऐकू आली त्याला सुधा माजघरातून मुसमुस
सिगारेट पेटवत, एकटाच तो निघून गेला चिडून
डोळे भरून बघत राहिली, ती त्याला खिडकी आडून
दमला भागाला दिवस संपला तरी अबोला संपेना
सुरुवात नक्की करावी कुठून दोघानाही कळेना
नीट असलेली चादर त्याने उगीच पुन्हा नीट केली
अमृतांजन ची बाटली तिच्या उशाजवळ ठेवून दिली.
तिनेच शेवटी धीर करून अबोला संपवला
"रागावलास न माझ्यावर" आणि तो विरघळला
"थोडासा........
.." त्याने सुधा कबूल केला आपला राग
ती म्हणाली " बाहेर जाऊन किती सिगारेट्स ओढल्यास सांग?"
"माझी सिगारेट जळताना तुझ जळन आठवल
अपेक्षांचं ओझ तू किती सहज पेललस
सगळ्याच सुख दुख तळहातावर झेललस......
तुला नाही का वाटत कधी मोकळ मोकळ व्हावसं
झटकून सगळी ओझी पुन्हा तुझ्या जगात जावसं?"
बोललास हेच पुरेस झाल.... एकाच फक्त विसरलास....
माप ओलांडून आले होते, "मी-तू" पण तेव्हाच गळल
माझ जग तुझ्या जगात तेव्हाच नाही का विरघळल?"..

चांगले मित्र मिळवायला फार मोठे भाग्य लागतं

चांगले मित्र मिळवायला फार मोठे भाग्य लागतं .
तसंच भाग्य मला लाभलं असं मला वाटत असतं ,

मित्र अनेक असतात ,
 पण काही मोजकेच जीवनात येऊन जातात .
चांगल्या क्षणांची सांगडसुद्धा तेच घालून जातात .

भांडण झालं की थोडा वेळ त्यांच्यावर रुसायचं असतं .
कारण शेवटी त्यांच्यातच जाऊन मिसळायचं असतं.

प्रयत्न केला दूर जायचा तरी त्यांच्याच जवळ रडायचं असतं .
एकमेकांचं अश्रू झेलून , हसत पुढे जायचं असतं .

कोणाशी काही बिनसलं तेव्हाच मैत्रीचं खरं रुप पाहायचं असतं ,
संकटकाळी एकमेकांचा हात घट्ट धरुन चालायचं असतं .

एखादं पाऊल डगमगलं तर ते पुन्हा वाटेवर आणायचं असतं .
चिमुकल्या गोष्टीने मैत्रीचे वैरात रुपांतर करायचं नसतं .

पण मैत्रीत हे एकच लक्षात ठेवायचं असतं .
विश्वास ज्याच्यावर टाकला त्याच्याशी प्रामाणिक रहायचं असतं

काहितरी वेगळ करायचय........

काहितरी वेगळ करायचय........
ढगातुन थेंबाच्या सोबत बरसायचय
पाणवठा जरी गढुळ असला तरी
पुन्हा पाणवठयात येवून नहायचय.

काहितरी वेगळ करायचय........
आसमंतात वा-यासारख झाडांना झोंबायचाय
पानांच्या जाळीवर बसुन उडायचय
मिटलेल्या श्वासांना आता
अस्तित्वातात आणायचय.

काहितरी वेगळ करायचय........
स्वप्नांच्या देशात भटकायचय
प्रयोगानिशी शोधायचय
भवनेच्या पंखात बळ घेऊन
पुन्हा मायदेशी परतायचय.

काहितरी वेगळ करायचय........
चिखलातल्या कमळाला फुलवायचय
सुकलेल्या फुलांना जगवायचय
माती रुक्ष असलि तरी
मातीतल्या माणसांसाठी जगायचय.

काहितरी वेगळ करायचय........
एक स्वप्न उराशी बाळगायचय
काहि वेगळ करता नाहि आलं तरि
माणसातल्या माणूसकीला मात्र जपायचय...................

वडिल......

वडिल......आई घराच मांगल्य असते तर बाप घराच अस्तित्व असतो. पण घराच्या या अस्तित्वालाखरच आम्ही कधी समजून घेतलेले आहे का ? वडिलांना महत्व असूनही त्यांच्या विषयी जास्त लिहिलं जात नाही, बोललं जात नाही.कोणताही व्याख्याता आई विषयी बोलत राहतो. संत महात्म्यानीही आईचचं महत्व अधिकसांगितलं आहे. देवदिकांनीही आईचेच गोडवे गायले आहेत.. लेखकांनी कवींनी आईचंतोंड भरून कौतुक केलं आहे. चांगल्या गोष्टींना आईचीच उपमा दिली जाते पण बापविषयी कुठेच फारसं बोललं जात नाही. काही लोकांनी बाप रेखाटला पण तोहीतापट, व्यसनी, मारझोड करणाराच. समाजात एक दोन टक्के बाप असतीलही पण चांगल्या वडिलांबद्दल काय?     आईकडे अश्रूंचे पाट असतात तर बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होतेपण सान्त्वन वडिलांनाच करावं लागतं आणि रडणार्यापेक्षा सान्त्वन करणार्‍या वरच जास्त ताण पडतो कारणज्योतीपेक्षा समईच जास्त तापते ना ! पण श्रेय नेहमी ज्योतिलाच मिळत राहतं !रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरिचिसोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो. सर्वासमोर आई मोकळेपणाने रडू शकते, पण रात्री उशित तोंड खुपसुन मुसमुसतो तोबाप असतो . आई रडते वडिलांना रडता येत नाही, स्वतः चा बाप वारला तरीही त्याला रडता येतनाही, कारण छोट्या भावंडांना जपायचा असतं. आई गेली तरीही रडता येत नाही, कारणबहिनिंचा आधार व्हायचं असतं. पत्नी अर्ध्यावर सोडून गेली तरी पॉरांसाठी अश्रूंना आवर घालावा लागतो.     जिजाबाईंनी शिवाजी घडविला अस अवश्य म्हणावं पण त्याचवेळी शहाजी राजांची ओढतानसुद्धा ध्यानात घ्यावी. देवकीच, यशोदेच कौतुक अवश्य करावं पण पुरातून पोराला डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेव सुद्धा लक्षात ठेवावा. राम हा कौसल्येचा पुत्र अवश्य असेल पण पुत्रवीयोगाने तडफडून मरण पावला तो पिता दशरथ होता.
वडिलांच्या टाचा झिजलेल्या चप्लांकडे बघितलं की त्यांच प्रेम कळते. त्यांचेफाटके बॅनियान बघितलं की कळतं "आमच्या नशीबाची भोक
त्यांच्या बॅनियानला पडलीत".त्यांचा दाढी वाढवलेला चेहरा त्यांची काटकसरदाखवितो. मुलीला गाऊन घेतील, मुलाला लुंगी घेतील पण स्वतः
मात्र जुनी पॅंटच वापरतील.मुलगा सलुन मध्ये वीस पंचवीस रुपये खर्च करतो, मुलगीपार्लर मध्ये खर्च करते, पण त्याच घरात बाप दाढीचा साबण संपला म्हणूनआंघोळीच्या साबणाने दाढी करतो.अनेकदा नुसतं पाणी लावून दाढी करतो.बाप आजारीपडला तरी लगेच दावाखान्यात जात नाही, तो
आजारपनाला घाबरत नाही पण डॉक्टर एखादा महिना आराम करायला लावतील याची त्यालाभीती वाटते कारण पोरिच लग्न, पोरांच शिक्षण बाकी असतं, घरात उत्पन्नाच दुसरंसाधन नसतं.ऐपत नसते तरीही मुलाला मेडिकल, इंजिनियरिंग ला प्रवेश मिळवून दिलाजातो, ओढतान सहन करून मुलाला दरमहिन्याला पैसे पाठविले जातात. पण सर्वच नसलीतरीही काही मुलं अशीही असतात की जे तारखेला पैसे येताच मित्रांना परमिट रूममध्ये पार्ट्या देतात आणि
ज्या बापानी पैसे पाठविले त्याच बापाची टिंगल करतात.
आई घराचं मांगल्य असेल तर बाप घराचं अस्तित्व असतो. ज्या घरात बाप आहे त्याघराकडे वाईट नजरेने कोणीही बघू शकत नाही. कारण घरातला कर्ताजिवंत असतो, तो जरी काहीही करत नसला तरीही तो त्या पदावर असतो आणि घरच्यांचकर्म बघत असतो, सांभाळत असतो.कोणाचा मुलगा होणं टाळता येत नाही पण बाप होणंटाळता येतं, पण बाप कधीच बाप होण्याचं टाळत नाही. आईच्या असण्याला अथवा आई
होण्याला बापामुळे अर्थ असतो.
कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते कारण ती जवळ घेते, कवटाळते,कौतुक करते, पण गुपचुप जाऊन पेढ्यांचा पुडा आणणारा बाप कोणाच्याच लक्षात राहतनाही. पाहितलकरणीच खूप कौतुक होतं पण हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थपणे वावरणार्‍या त्या बाळाच्या बापची कोणीही दाखल घेत नाही.
चटका बसला, ठेच लागली, फटका बसला तर 'आई गं' हा शब्द बाहेर पडतो. पण रस्ता पारकरताना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक लावतो तेव्हा 'बाप रे' हाच शब्द बाहेर पडतो.छोट्या संकटासाठी आई चालते पण मोठमोठी वादळं पेलताना बापच आठवतो. काय पटतय ना?
कोणत्याही मंगल प्रसंगी घरातील सर्वजण जातात, पण मयताच्या प्रसंगी बापलाच जावंलागतं. कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नसतो,पण गरीब लेकीच्या घरी उभ्या उभ्या का होईना चक्कर मारतो. तरुण मुलगा ऊशिरा घरीयेतो तेव्हा बापच जागा असतो. मुलाच्या नोकरीसाठी साहेबापुढेलाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळासाठी उम्बर्ठे झिजवणारा बाप, घरच्यांसाठीस्वतः च्या व्यथा दडपणारा बाप, खरच किती ग्रेट असतो ना?
वडिलांचं महत्व कोणाला कळतं ? लहानपणीच वडील गेल्यावर अनेक जबाबदर्या खूपलवकर पेलाव्य लागतात, त्यांना एकेका वस्तुसठी तरसावं लागतं. वडिलांना खर्याअर्थाने समजून घेते ती म्हणजे त्या घरातील मुलगी. सासरी गेलेल्या अथवा घरापासूनदूर असलेल्या मुलीला फोनवर
बोलताना बापाचा बदललेला आवाज एका क्षणात कळतो, ती अनेक प्रश्न विचारते.कोणतीही मुलगी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेऊन बाप म्हणेल तेव्हा विवाहाच्याबोहल्यावर चढते. मुलगी बापाला जाणते, जपते. इतरांनी सुद्धा असच आपल्यालाजाणावं हीच बापची किमान अपेक्षा असते.