Monday, April 2, 2012

बोट...

बोट...

ती जोपर्यंत जमिनीवर असते तोपर्यंत ती अशीच निश्चल पडून असते...
पण जेंव्हा ती पाण्यात उतरते तेंव्हा ती तरंगायला लागते...
हळूहळू का होईना पण प्रवाहाच्या दिशेने वाहायला लागते...

आयुष्यात पण आपल्याला दोन प्रकारची माणसं भेटतात...
पहिली त्या जमिनीसारखी असतात...
ती आपल्या आयुष्यात येतात... त्यांच्या सहवासात, दिवस, महिने, वर्ष सरत जातात
पण आपण जिथल्या तिथेच असतो..

अन दुसरे.. दुसरे त्या पाण्यासारखे असतात...
आपल्याला स्वतःच्या प्रवाहात वाहून घेणारे...
त्यांच्या सहवासात आपण डुलत राहतो, तरंगत राहतो...
एक वेगळीच आशा असते त्यांच्या सहवासात... कुठल्यातरी नवीन किनाऱ्यावर
पोहोचण्याची...

पण कधी कधी परिस्थिती आपली ताकद दाखवते...
वातावरण बदलते... एक भलं मोठं वादळ येतं... अन सगळं काही अस्ताव्यस्त होऊन
जातं...
अश्या वेळी दोनच गोष्टी होतात...
एक तर आपण पूर्णतः बुडून जातो...
आणि जर वाचलोच तर वादळी प्रवाह आपल्याला एखाद्या अज्ञात, अनोळखी बेटावर वाहून
नेतो...

"अन तिथून परत येणं हे जवळ जवळ अशक्यच असतं..."

No comments:

Post a Comment