Monday, April 30, 2012

स्वतःला जाणून घ्या


[शरीर आणि मन ]

कुठल्याही कामासाठी पुढचे पाऊल उचलण्या आधी आपण स्वतःला जाणून घ्यायला
हवे . कारण खूप वेळा असे होते कि आपली इच्छा काही तरी वेगळेच करायची असते
, पण आपल्या शरीराची ती कुवत नसते . अशावेळी एकतर आपल्या जवळ खूप जबरदस्त
इच्छा शक्ती असायला हवी किंवा आपण आपले मन अशा कामात गुंतवायला हवे जिथे
आपली शारीरिक कुवत कमी पडणार नाही . मी लोकांना खुपदा म्हणतांना बघितले
आहे ,'' मी माझ्या स्वतःला खूप चांगल्याने जाणतो . तुम्ही कोण मला
माझ्याविषयी ज्ञान देणारे ?'' माझा त्यांना एकच सवाल आहे ,
'' एवढ्या चांगल्या रीतीने स्वतःला जाणता , मग स्वतःला झेपत नाहीत ती
कामं करून स्वतःचेच हसू का उडवण्याची इतरांना संधी का देता ?''
कसे ? एका उदाहरणाने समजावते , एक एकवीस वर्षांची मुलगी आहे . तिचा हट्ट
आहे विश्व सुंदरी बनण्याचा . पण तिची उंची फक्त पाच फुट आहे आणि इथे तर
प्रवेश पात्रतेत पाच फुट पाच इंच एवढी उंची हवी आहे . असे असतांना तिचा
हट्ट हा मूर्खपणाच समजावा लागेल कि नाही ? तिचे स्वतःच्या शरीराला ,
उंचीला दोष देणे अयोग्यच म्हणावे लागेल ना ?
हे झाले शारीरिक कुवतीचे . आता मानसिक कुवत बघू . म्हणजे आपले मन ! जे
मनाने कच्चे असतील , खूप भावूक असतील त्यांना मी एकाच सल्ला देईल , तो
असा कि त्यांनी चुकूनही वकील , डॉक्टर किंवा पोलीस बनू नये . अन
राजकारणाचा तर विचारही करू नये . कारण हि चार हि क्षेत्र अशी आहेत कि इथे
तुमचे मन खंबीर असणे खूप गरजेचे आहे . नाहीतर तुमचा या क्षेत्रात टिकाव
लागणार नाही . आणि तुम्ही स्वतःच , स्वतःच्या असफलतेचे कारण व्हाल .
तेव्हा आपण शरीराने तसेच मनाने काय आहोत ? आपल्याला काय झेपेल आणि आपण
कोणते कार्य अगदी चोखपणे पूर्ण करू शकू ? ह्याचा अभ्यास करून , मगच योग्य
तो निर्णय घ्यावा . प्रत्येक दिवशी , प्रत्येक क्षणी , प्रत्येक कार्य
करतांना स्वतःला विचारावे ,' मी काय आहे ? मी हे कार्य करण्याच्या योग्य
आहे ना ? मला हे झेपेल ना ?' स्वतःचा , आपल्यातील स्व चा अभ्यास करायची
सवय करा . म्हणजे तुम्हाला नक्की कशाची गरज आहे ह्याची प्रचीती तुम्हाला
येईल .
शारीरिक आणि मानसिक फरक - आपले शरीर हे आपले सर्वांना दिसणारे , दृश्य
असे बाह्य रूप आहे , तर आपले मन हे आपले अदृश्य असे आंतर रूप आहे . शरीर
आपली शारीरिक , म्हणजे दृश्य स्वरूपातील कुवत ठरवते . तर त्याच वेळी मन
आपली मानसिक , म्हणजे अदृश्य स्वरूपातील क्षमता ठरवते . शेवटी तुमच्या
सर्व शारीरिक कृती ह्या तुमच्या मानसिकतेतूनच जन्मलेल्या असतात .
अशाप्रकारे एकदा का तुम्ही तुमच्या स्वतःला समजून घेतले तर तुम्हाला फक्त
तुमच्या शारीरिक हजेरीचेच ज्ञान होणार नाही , तर तुमच्या मनाबद्दल सुद्धा
तुम्ही जागृत राहाल . तुमचे मन काय विचार करतेय ? त्याची भावूकतेची पातळी
काय आहे ? तुमचे मनाचा कल कुठे आहे ? ह्याची माहिती आपल्याला आपोआप होईल
.
 

Tuesday, April 24, 2012

इंग्रजीतून मराठी

इंटरनेटचा मामला म्हणजे इंग्रजी भाषा गरजेची. आपल्याला ती काही जमत नाही
म्हणजे इंटरनेट..इ-मेल हा आपला प्रांत नव्हे; असं मानून मागे का राहायचं?
इंटरनेटवर असे पर्याय आहेत ज्याद्वारे तुम्ही नुसता इ-मेल नव्हे, तर एक
अख्खा लेख मराठीत टाइप करू शकता.
इंटरनेट वापरातला सगळ्यात कटकटीचा विषय असतो तो म्हणजे इंग्रजी. म्हणजे
होतं काय की आपल्याला इंग्रजी येत नसतं, असं काही नाही. आपल्याला इंग्रजी
चित्रपट कळतात. बातम्या कळतात. वेळप्रसंगी आपण गरजेपुरतं बोलूही शकतो; पण
इंग्रजीत लिहिण्याची आपल्याला सवय असतेच असं नाही. आता माझ्या आईचंच बघा
ना, तिला इंग्रजी येतं अगदी व्यवस्थित, पण या विलायती भाषेबद्दल ती नको
इतकी कॉन्शस आहे. म्हणजे येत असूनही अनेकदा निव्वळ त्या भाषेच्या अनामिक
भीतीमुळे ती चुका करते.
मला ना माझ्या शाळेचे दिवस आठवतात. म्हणजे, मी ना हमखास गणिताच्या पेपरात
चुका करायचे.
आणि त्या चुका कशा असायच्या माहिते?
मला प्रश्नच दिसायचे नाहीत किंवा सगळा प्रश्न सोडवल्यावर उत्तर लिहायचीच
मी विसरून जायचे. किंवा भूमितीतलं एखादं प्रमेय येत असूनही आयत्यावेळी
काहीतरी घोळ घालायचे. त्यामुळे ते चुकायचं..आता जेव्हा मी विचार करते की
असं का व्हायचं, तर मला वाटतं ते माझ्या मनातल्या गणिताच्या भीतीमुळे
व्हायचं. सगळं येत असूनही आपल्याला येणारच नाही किंवा आपण जे काही लिहू
ते चुकेलच या भीतीतून मला जे यायचं त्यातही मी चुका करायचे.
माझ्या आईचं किंवा तुमच्यापैकी अनेकींचंही असंच काहीतरी होत असणार.
इंग्रजीची भीती उगीचच असते मनात. ती कमी करायचा प्रयत्न केलाच पाहिजे. पण
त्याचबरोबर आता इंटरनेटवर तुम्ही आरामात मराठीत लिहू शकता. मराठीतून
लिहिण्याची सुरुवात आपण इ-मेलपासून करूयात. ‘जी-मेल’ आणि
‘रेडिफ-मेल’सारख्या किंवा इतरही अनेक इ-मेल सेवा देणार्‍या कंपन्यांनी
त्यांच्या सेवांमध्ये आता मराठीतून लिहिण्याची सोय उपलब्ध करून दिलेली
आहे. उदाहरणाखातर आपण ‘जी-मेल’द्वारे मराठीतून मेल पाठवायची कशी ते
बघूयात.
‘जी-मेल‘च्या तुमच्या अकाउंटला तुम्ही लॉग इन झाल्यानंतर डाव्या बाजूला
सगळ्यात पहिले तुम्हाला एक लिंक दिसेल, कम्पोज मेल. या बटणावर क्लिक केलं
की जी मेल लिहायची आहे त्यासाठीचा कोरा कागद किंवा रिकामी जागा समोर
येईल. तुमच्या समोरच्या विन्डोमध्ये, टू, सीसी, बीसीसी, सब्जेक्ट असे
ऑप्शन्स तुम्हाला दिसतील. त्याखाली काही चिन्ह दिसतील. त्यात अ हे चिन्ह
असेल. त्यावर क्लिक करायचं. म्हणजे मराठीतून लिहिण्यासाठी तुम्ही सज्ज
होता.
आता प्रत्यक्ष लिहायचं कसं? ते तर अगदीच सोपं आहे. आपण रोमन मराठीत
लिहितो. उदा. चरश पर्रीं ीरीळज्ञरर. मराठी शब्द लिहिताना अक्षरं मात्र
इंग्रजी वापरायची. याला म्हणतात ‘फोनेटिक’ लिपी. तर अ वर क्लिक
केल्यानंतर खालच्या मोकळ्या जागेत तुम्हाला जे काही लिहायचं आहे ते मराठी
शब्द इंग्रजी अक्षरं वापरून लिहायचे.
प्रत्येक शब्द लिहून झाला की स्पेसचं बटण दाबा. ते दाबल्याबरोबर तुमच्या
समोरची इंग्रजी अक्षरं जाऊन मराठी शब्द उमटेल. अशा प्रकारे तुम्ही
तुम्हाला जे काही पत्र लिहायचं असेल ते संपूर्ण पत्र इंग्रजीत लिहू शकता.
यात काही वेळा निराळंच अक्षर किंवा अशुद्ध अक्षर उमटलं तर पुढे न जाता
की-बोर्डवरचं बॅकस्पेसचं बटण दाबायचं की तुम्हाला काही पर्यायी शब्द
विचारले जातील. त्यातला जो योग्य शब्द असेल त्याची निवड करायची. अशा
प्रकारे तुम्ही कितीही मोठं पत्र, लेख जी-मेलच्या माध्यमातून लिहू शकता.
या फोनेटिक लिपीचा फॉण्ट असतो युनिकोड. त्यामुळे तुम्ही लिहिलेला मराठी
मजकूर तुम्ही ज्यांना कुणाला पाठवणार आहात ते तो सहजपणे वाचू शकतात.
आता तुमचा मजकूर लिहून झाल्यावर, टू मध्ये ज्यांना इ-मेल पाठवायची आहे
त्यांचा इ-मेल आयडी टाका, एकापेक्षा जास्त लोकांना तीच इ-मेल पाठवायची
असेल तर इतरांचे इ-मेल आयडीज् सीसी मध्ये टाका. आणि अजूनही कुणाला
पाठवायची असेल पण इतरांना ते समजू नये अशी तुमची अपेक्षा असेल तर त्या
व्यक्तींचे इ-मेल आयडीच बीसीसी मध्ये टाका. ज्या विषयावरचं पत्र असेल तो
विषय सब्जेक्ट मध्ये लिहा. आणि इ-मेल सेंड करा. तुम्ही टाकलेल्या इ-मेल
आयडीवर मेल गेली की युवर मेल हॅज बिन सेंट, असा संदेश तुमच्या स्क्रीनवर
तुम्हाला वाचायला मिळेल.
इंटरनेट ही तशी सोपी भानगड असते. तुम्ही तुमच्या इ-मेल अकाउंटला गेला की,
तिथे असणार्‍या वेगवेगळ्या लिंक्स उघडून बघा. वापरून बघा. त्यातून तुम्ही
आपोआप असंख्य गोष्टी शिकाल. लहान मुलाला कसं एखादं नवं खेळणं आणून दिलं
की तो ते उघडतो. आपल्याला म्हणजे मोठय़ांना वाटतं, पोरानं खेळणं तोडलं,
पण खरं तर तो त्याची उत्सुकता शमवण्याचा प्रयत्न करत असतो. इंटरनेटच्या
बाबतीत आपलं वय कितीही असलं तरी नवं खेळणं मिळालेल्या लहान मुलाप्रमाणे
आपण वागलं पाहिजे. न घाबरता बिनधास्त ते वापरायला शिकलंच पाहिजे.

जे नाहीयेय आणि ते हवंय त्याला 'अपेक्षा' म्हणतात.....
जे हवंय आणि नाही मिळतंय त्याला 'उपेक्षा' म्हणतात.....
मग जे आधीपासून जवळ आहे ते काय आहे?......'निरर्थक'?????....
जे नाहीयेय ते मिळाले नाही कि दु:ख करत बसताना खरी उपेक्षा कोणाची होते?
ज्याला काही मिळाले नाही त्याची.....?
... कि जे आधीच मिळालेय आणि दुर्लक्षित केलं जातंय त्याची??????
आपण कुणाच्या तरी आयुष्यात असूनही समोरच्याच्या नजरेतला शोध नाही थांबला
कि 'अवहेलना' आणि 'तूच्छ' या शब्दांचा खरा अर्थ कळतो आणि अनुभव येतो....
आणि सगळ्याच जखमांना औषध नसतं....अवहेलनेला तर नाहीच नाही.....
त्याहून मोठी गळचेपी अशी कि.....अपेक्षांना अंत नसतो....
आयुष्याच्या बाबतीत "१००%" हि संख्या काल्पनिक आहे...

Saturday, April 21, 2012

या जगाची रीतच निराळी आहे...

पतंग जेंव्हा आकाशात उंच भरारी घेतो तेंव्हा त्याचं सगळं श्रेय पतंगाची दोर
ज्याच्या हातात आहे त्यालाच जातं...
पतंग उडवणाऱ्याला पण ते श्रेय ढगात नेऊन पोहोचवत... त्यालापण खरतर तेच हवं
असतं...

पण त्या पतंगाला खरी भरारी देणारा तो वारा... त्याचं काय...!!!
तो यथेच्छ दुर्लक्षिला जातो... कारण तो वारा कुठलाही जाब विचारत नाही की
कुठलीही बढाई मारत नाही...
तो अगदी मुकाट्याने आपलं काम करतो... तो पतंगाला तर आकाशात उंच भरारी घेऊन
देतोच पण पतंग उडवणाऱ्याला सुद्धा पतंग 'आपल्या' कौशल्या मुळे उडतोय हा भाबडा
भास ही देऊन जातो... तेच त्या वाऱ्याच खरं सामर्थ्य...

आयुष्यं पण तसं काही वेगळं नाही... इथे काही लोकं अशी भेटतात जी तुमच्या
सफलतेत फक्त दोरीला झटके मारायचं काम करतात, अन तुम्हाला सफलतेच्या शिखरावर
पोहोचवण्याच संपूर्ण श्रेय ते घेऊन जातात... अगदी काहीच न करता सुद्धा... कारण
त्या गगनभरारी मागे खरं कर्म असतं वाऱ्याएवढा अर्पनभाव असणाऱ्या काही
लोकांचं.. ही लोकं शांतपणे आपलं काम करतात... तुमचं सुखं कशात आहे हे ते
ओळखतात, अन मग तुमच्या नकळत, स्वतःवर दुखं ओढवूनही, ते तुम्हाला तुमची ती
गगनभरारी घ्यायला मदत करतात... पण त्या वाऱ्या सारखीच ही मंडळी सुद्धा यथेच्छ
दुर्लक्षिली जातात... कारण ती जाब मागत नाहीत... त्यांना श्रेय नको असतं...
त्यांना हवी असते तुमची ख़ुशी... त्यातच ते आनंद मानतात... पण अश्या लोकांना
ओळखण्यातच आपण बहुतेक वेळा चूक करतो...*

Friday, April 20, 2012

आयुष्य खूप सुंदर आहे,

*आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज
घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते.........
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा......*

जिवनातले तीन छोटे नियम...


१ . तुम्हा जे हवं आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही जर प्रयत्नचं केले नाही तर ते
तुम्हालाकधेचं मिळणार नाही.....!!!

२ . तुमच्या मनात असलेले तुम्ही जर कधी विचारले नाही किंवा बोलले नाही तर
त्याचे उत्तरनेहमीचं " नाही " असेचं असेल ......!!!

३ . जर तुम्ही पुढे जाण्यासाठी पाउल उचललेचं नाही तर तुम्ही जागेवरचं
रहाणार.....!!!

खास माणसं

*जि माणसं आपल्या खांद्यावर हात टाकतात;*

*अन आपल्या बेसावध क्षणी आपल्याला;*

*स्वतःचा खांदाच देऊन टाकतात;*

*अशी ही माणसं जरा खासच असतात.*

*अशी माणसं आयुष्यभर आपल्याला;*

*काही न काही देतच राहतात;*

*स्वतःची ओंजळ रिकामी झाली तरी;*

*जन्मभर पुरेल इतकं प्रेम मात्र देतात.*

*वेदना कुठे आपल्याला झाली तर;*

*अश्रू त्यांच्या डोळ्यात येतात;*

*चुकलोच आयुष्याच्या वळणावर कधी;*

*तर आरशाप्रमाणे प्रामाणिक राहतात.*

*आयुष्यात कधी आलाच दाटून अंधार;*

*तर खास माणसांच्या पाऊलखुणा शोधायच्या;*

*आपण फक्त त्यावर आपली पावलं ठेवायची;*

*वाटा आपोआप सापडायच्या.*

*अशा या खास माणसासाठीचं फक्त;*

*आयुष्य पुन्हा जगावंस वाटत;*

*त्यांनी दिलेलं भरभरून प्रेम;*

*मनाच्या कप्प्यात जपावंस वाटत.*

जे अशक्य वाटतय ते स्वप्न मला पहाचय..

*जे अशक्य वाटतय ते स्वप्न मला पहाचय..

*
*ज्या शञुचा कोणी पराभव करु शकत नाही त्याला मला हरवाचय..

कोणालाही सहन होत नाही अस दुःख मला सहन कराचय..

ज्या ठिकाणी धाडसी माणस जाण्यासधाडस करत

*
*नाही त्या ठिकाणी मला जाऊन धावाचय..

ज्या वेळी माझे भाऊ थकलेत पाय थकलेत
हात थकलेत शरीर थकलय
त्या वेळेस मला समोर मला "एव्हरेस्ट" दिसतय त्या वेळी मला माझे एक एक पाऊल
त्या "एव्हरेस्ट" च्या दिशेने टाकाचय..
तो " स्टार " मला गाठाचाय
मला "सत्यासाठी" झगडाचय संघर्ष कराचाय..

कुठलाही प्रश्न त्यासाठी विचरायचा नाही थांबा घ्यायचा नाही..

माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे पण त्याला कारण "स्वर्गीय" असलं पाहिजे..*

Tuesday, April 17, 2012

आठवण

प्रत्येकाच्या मनात दडलेली अबोल भावना*
*आठवून देते कधी व्यक्ति,कधी जागा,*
*
कधी क्षण तर कधी आठवण
सोडून भान जागेच तोडून बंधन वेलेच,
ओलांडून सीमा जीवनाच्या
येते बरोबर ती आठवण
विनामुल्य मनाची साठवां म्हणजे आठवण
*

आई-बाप

*"आई-बाप; आई-बाप, म्हणजे नक्की काय असतं? आयुष्य जगण्यासाठी; देवाने दिलेलं,
एडव्हान्स पाठबळ असतं तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलंस्वप्न पाहिलेलं
असतं तुमच्या जन्मापासून; त्यांच्यामरणापर्यंत, त्यांनी आपल आयुष्यखर्चलेल
असतं आई; तुमच्या आयुष्याच्या, गाडीच; योग्य दिशा देणारस्टीअरींग असतं अचानक
आलेल्या संकटात सावरायला, बाप म्हणजे “अर्जंट ब्रेक” चा पर्याय असतं आईच प्रेम
हे; रोजच्याआयुष्यात, कामाला येणार बँकबॅलन्स असतं बाप म्हणजे; गरजेच्या
वेळीमिळणारा, तुमचा बोनस किंवावेरीएबल पेमेंट असतं आई म्हणजे; तुम्हाला सतत
जोडणार, मोबाईलच नेटवर्क असतं कधी नेटवर्क थकले; तर बाप, अर्जंट “एस.एम.एस”
असतं आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं, “अँटी व्हायरस " असतं शोधून काढलेले
व्हायरस संपवायचं, बाप हे"क्वारनटाईन" बटण असतं आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं,
शिक्षणाचं विद्यापीठ असते बाप म्हणजे चालती बोलती,अनुभवाचीफॅकटरी असते आई
म्हणजे तुमच्या आयुष्यातली, साठवलेली पुण्याई असते बाप म्हणजे कर्म करून,
आयुष्यभरमिळवलेली कमाईअसते आई म्हणजे तुमच्या आयुष्यातला, मार्गदर्शक गुरु
असतो दाखवलेल्या वाटेवर, बाप हा जवळचामित्र असतो आई म्हणजे साक्षात, भगवंत;
परमेश्वर असतो त्या परमेश्वरापर्यंत, पोचवणारा बापएक संत असतो आई म्हणजे;
तुमचे शरीर, मेंदू; हृदय; अन् मनअसतं बाप म्हणजे; भक्कम ठेवणारा, पाठीचा कणा
आणिशरीरातलं हाड अन् हाड असतं कधीही वेदना झाली कि, तोंडात वाक्य "आईगं SSS”
असतं आणि भले मोठे संकट आले, कि उच्चारात "बापरे बाप" असतं परमेश्वर समोर आला
तरी, उभे राहायलावीट फेकलेल; पुंडलिकाच मन असतं त्याच्या आई-बापाच्या रुपात,
विठ्ठलाने; स्वत:लाच तिथे पाहिलेलं असतं म्हणूनच म्हणतो, परमेश्वर; अध्यात्म;
भगवंत हे सगळ, अजब गणित असतं त्या सगळ्यापर्यंत पोचवणारं, आई-बाप हेकनेक्शन
असतं आई-बाप म्हणजे नकळत मागे असलेली, मायेची सावली असतं उगाच नाही ते;
आपल्यासंस्कृतीत, "मातृ देवो भव- पितृदेवो भव" म्हणलेलं असतं ...".*

Tuesday, April 10, 2012

हरवलेल्या संवेदना...


पैसा खुळखुळतोय, पण माणुसकी हरवत चालली आहे. वाटेल तशी वाहने धावत आहेत
आणि अपघात वाढत आहेत; पण जखमींना मदत करण्याची प्रवृत्ती संपत चालली आहे.
समृद्धी येऊनही आपल्या संवेदना, भावना जणू गोठल्या आहेत. कधी जागं होणार
आपल्यातलं "माणूसपण'?

"जखमी तरुणाला लोटले मृत्यूच्या खाईत' ही बातमी वाचली आणि मन सुन्न झाले.
मनात विचार आला, 23 वर्षांचा तरुण मुलगा गेला. त्याच्या कुटुंबीयांवर
आकाशच कोसळले असेल. त्याच्या आई-वडिलांची काय अवस्था झाली असेल? जी मुलं
गाडी चालवीत होती, ती नक्कीच धुंदीत असतील. त्यांच्याच वयाच्या एका
मुलाच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याचं त्यांना काहीच वाटलं नसेल का?
बिचारा जखमी अवस्थेतही त्या मुलांजवळ मदत मागत होता, आपल्या आईला फोन
करायला सांगत होता; तरीही त्या निष्ठुरांना त्याची कीव आली नाही. "या
जागी आपण असतो तर!' असा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही. निष्ठुरपणे
त्याला जखमी अवस्थेत निर्जन ठिकाणी सोडून सर्व जण पसार झाले.

अशा तऱ्हेच्या घटना अनेक ठिकाणी अनेक वेळा घडत असतात. त्या वेळी
प्रत्येकाच्या मनात चीड निर्माण झालेली असते; पण नंतर त्यांचा शोध,
चौकशी, पुरावे यामध्ये वेळ जातो, तोवर लोकं विसरून जातात. मग वाटतं, या
अशा गुन्हेगारांना कधी शिक्षा होणारच नाही. स्वत:ला आधुनिक म्हणविणाऱ्या
लोकांमध्ये संवेदना, माणुसकी हरवत चालली आहे, फसवणूक लुबाडणूक वाढत आहे.
माणसाकडे भरपूर पैसा आहे. त्यामुळे लहान वयातच गाड्या चालवणे, व्यसनाच्या
आहारी जाणे, नियमांचे उल्लंघन करणे या गोष्टी अफाट वाढल्या आहेत. धुंदीत
गाड्या चालवून दुसऱ्यांचे जीव घेतात, मदतीसाठी कुणी हाका मारल्या तर
दुर्लक्ष करतात, त्यामुळे कित्येक जीव उपचाराअभावी मृत्यू पावतात. काही
बातम्या वाचून अंगावर शहारे येतात. छोटी छोटी मुलं गाडीच्या चाकाखाली
चिरडली जातात, ज्येष्ठ नागरिक ठोकरले जातात. गाडी चालविणाऱ्या
प्रत्येकाच्या मनात ही भावना निर्माण झाली पाहिजे, की या मुलांच्या जागी
उद्या आपली मुलंही असू शकतील, या वृद्धांच्या जागी आपले आई-वडील असू
शकतील. वाहन चालविणाऱ्या प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे, की
प्रत्येकाचीच कुणीतरी घरी वाट पाहत असतं त्यामुळे प्रत्येकानेच सावधानता
बाळगायला पाहिजे. पण असं होत नाही. आपण "माणूस' आहोत, हेच सर्व जण विसरत
चालले आहेत. आपल्यापेक्षा पशुपक्षी बरे! त्यांना भावना आहेत. एखादा पक्षी
मेला तर त्याचे नातलग एकमेकांना हाका मारून लगोलग भोवती गोळा होतात. जखमी
असेल तर काळजी घेतात; पण आपण माणसे आहोत याची जाणीवही उरली नाही. पूर्वी
असं नव्हतं. दुसऱ्याच्या जाण्यानंही, दुःखानंही डोळे पाणावत असत; पण आज
सगळंच हरवलंय. हीच का आमची आधुनिकता?

आज प्रत्येक माणसागणिक घरात वाहन आहे. ही चैन नसून, गरज आहे. पण या अशा
बेफाम गाड्या चालविणाऱ्यांचाही सुळसुळाट वाढला आहे. आज मला वाटतं,
प्रत्येक घरात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, की संध्याकाळी सर्व जण
घरात सुखरूप परत आले की आजचा दिवस पार पडला म्हणून परमेश्‍वराचे आभार
मानत असतील. स्त्री ही ममतेचा सागर असते असं म्हणतात. तीच स्त्री आज
मुलीचा गर्भ आहे म्हणून तिला जन्माला येण्यापूर्वीच मारून टाकत आहे, मग
कुठं हरवली संवेदना?

म्हणून माणसांप्रमाणे संवेदना जागृत ठेवा; व्यावहारिक न होता भावनिक होऊन
जागा. आज गरज आहे संवेदना जपण्याची... माणुसकी जपण्याची...

Sunday, April 8, 2012

दोन मनांतील अंतर.....


एकदा एका साधुने त्याच्या शिष्यांना विचारले, " आपण रागात असताना जोरात
ओरडतो किंवा कोणाशी भांडण झाले असल्यास आपोआप आपला आवाज वाढतो, असेका?".
सर्व शिष्य विचार करु लागले. एक शिष्याने उत्तर दीले, "रागावलेले असताना
आपण स्वतःवरचे नियंत्रण हरवुन बसतो, आणि म्हणुनच कदाचीत ओरडून बोलतो."
यावर साधुमहाराज म्हणाले, " पण ज्या व्यक्तीवर आपण रागावलेले असतो ती
समोरच असते तरी सुध्दा आपण ओरडतो।जरी सौम्य आणि मृदु आवाजात बोलणे शक्य
असले तरी देखील रागात आपण चढ्या आवाजातच बोलतो". यावर सर्व शिष्यांनी
विचार केला आणि आपापल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र
कोणत्याच उत्तराने साधुचे समाधान झाले नाही. शेवटी साधुमहाराजांनी स्वतःच
उत्तर दीले. ते म्हणाले, " जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर रागावलेल्या
असतात तेव्हा त्यांच्या मनांमध्ये अंतर वाढलेले असते आणि हेच अंतर भरुन
काढण्याकरीता ते चढया आवाजात बोलतात."
"आता मला सांगा की जेव्हा दोन व्यक्ती परस्परांच्या प्रेमात असतात तेव्हा
अतीशय हळू आणि शांतपणे बोलतात, असे का?" असा प्रश्न विचारुन मग स्वतःच
उत्तर देत ते म्हणाले," कारण त्यांची मनं जवळ आलेली असतात. दोन मनांतील
अंतर कमी झालेले असते.
आणि जसजसे दोन व्यक्ती मधील प्रेम वाढु लागते तसतसे त्यांच्यातील संवाद
इतका सुलभ होउन जातो की सर्वच गोष्टी बोलण्याची देखील आवश्यकताच भासत
नाही. फक्त नजरेतुनच किंवा देहबोलीतुनच ते आपल्या साथीदाराला काय
म्हणायचे आहे ते ओळखतात.

(शिकवण- परस्परांत वाद विवाद आणि भांडण तंटे होतच राहतात मात्र कीतीही
वादविवाद असला तरी मनामनातील अंतर वाढु देउ नका।तसे होउ दील्यास दोन
व्यक्तींमधील दरी इतकी मोठी होइल की पुन्हा ती मिटवणे कधीच शक्य होणार
नाही.)
 

क्षमा मागितल्याने कोणीही लहान होत नाही


क्षमा मागितल्याने कोणीही लहान होत नाही आपले बोलणे व वर्तनामुळे कुणाची भावना
दुखावत असेल, तर त्याची जाणीव होताच क्षमा मागितली पाहिजे. तणाव दूर करण्याचा
हा हमखास उपाय आहे. वेळीच क्षमायाचना केली नाही, तर तणाव निर्माण होऊ शकतो.
संबंधांचे गणित असेच काम करते.

दोन व्यक्तींमध्ये वितुष्ट असेल तर त्यांच्यातील संवाद हाच वाद संपवण्याच्या
दिशेने सार्थक होऊ शकतो. उत्तम संवादाची सुरुवात आपल्या कृत्याबद्दल क्षमा
मागून केली जाऊ शकते. माफी मागून बोलणे यापेक्षा दुसरी चांगली पद्धत नाही.
मात्र, लोक माफी मागत नाहीत. ते आपली चूकच कबूल करत नाहीत.
...
आपण आपल्या चुकांतून बोध घेत पुढे जायला हवे. आपले जीवन व कार्याप्रती
उत्तरदायी असण्याची हीच एक चांगली पद्धत आहे. मात्र, या मार्गात ‘अहं’ हा
सर्वात अडथळा ठरतो, जो नेहमी आपण व आपल्या चूक स्वीकारण्यात आडवा येतो.
त्यामुळे आपण चूक आहोत, हे माहीत असूनही व्यक्ती ती कबूल करत नाही आणि माफीही
मागत नाही.

ज्याप्रकारे क्षमा मागणे कठीण वाटते, त्याचप्रमाणे क्षमा करणेही अवघड आहे.
अनेक इतक्या रागीट स्वभावाचे असतात की, एखाद्याची चूक झाल्यास ते त्याला
सहजासहजी माफ करण्यास तयार होत नाहीत. हेही चुकीचे आहे. माफी न मागणा-या व माफ
न करणा-या, दोन्ही -ºहेच्या व्यक्तींनी हे कधीही विसरू नये की, जीवनात कोणतीही
व्यक्ती चूक केल्याशिवाय राहू शकत नाही. त्यासाठी आपल्या चुकांतून बोध घ्यायला
हवा. असे न केल्यास तुम्ही आणखी एक संधी गमावत आहात. चुका व संभाव्य चुकीच्या
पावलांचे सतत मूल्यांकन करत राहावे. त्यातून काही शिकण्याच्या वा चुका पुन्हा
न होऊ देण्याच्या उत्तम व व्यवहार्य पद्धती सापडू शकतात.

- तात्पर्य क्षमा मागितल्याने कोणीही लहान होत नाही, उलट त्यातून नात्यांतील
दुरावा कमी होऊन जवळीक निर्माण होऊ शकते.
 
" ओठांवर हास्य, बगलेत सुरी, नजरेत आपलेपणा, काळजात विष, विंचवाच्या
नांगीत विष तर सापाच्या डोक्यात विष.......!!! जनावरांच्या बाबतीत पटकन
सांगता तरी येत.......!!! 'माणूस' हा एकच असा प्राणी आहे की त्याच 'विषाच
मर्मस्थान' सापडलेल नाही........"

कोटेबल कोट्‌स


-
*जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून
ठेवावेत. *
*- नारायण मूर्ती *

*यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू शकणार नाही. पण स्वतःला
ओळखून स्वतःला, स्वतःसाठी, स्वतःकडून नेमके काय हवे आहे; हे शोधणे म्हणजेच
यशाच्या जवळ जाणे होय.*
*- विश्‍वनाथन आनंद*
*
**नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्‍य आहे.** *
*- धीरूभाई अंबानी *

*पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत
करतो. *
*- जे. आर. डी. टाटा *

*फोटोग्राफरच्या एका "क्‍लिक'मुळे जगणे चिरकाल होते.** *
*- रघू राय *

*चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम
चांगला होतो.*
*- बिल गेट्‌स *

*मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा; कारण
तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता. *
*- कल्पना चावला *

*कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा
भाग व्हा.*
*- बराक ओबामा *

*माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ मी कुणी वेगळा, हुशार आहे
असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा
जरा जास्त होती इतकेच. *
*- आयझॅक न्यूटन *

*मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार
आणि मानवाचा "माणूस' होणे; हे त्याचे यश आहे.*
-* सर्वपल्ली राधाकृष्ण*न

ऐकायला शिका...!!!



‘‘आपल्या आयुष्याची गाडी नेहमीच सरळ चालेल असं नाही. ती निरनिराळी
स्टेशन्स घेत, अनुभव घेत पुढे जाते. कधीतरी कुठेतरी तिचा अपघातही होतो.
नात्यांचंही असंच असतं. टप्याटप्यानं ते विकसित होतं. नात्याचा पाया बळकट
करण्यासाठी नात्यांवर विशेष मेहनत घ्यावी लागते. वेळ द्यावा लागतो.
नात्यांमध्ये वाद झाला तर एकमेकांचे नीट ऐकण्याइतपत मोकळेपणा आपल्याजवळ
असायला पाहिजे. तसं झालं नाही तर शब्दानं शब्द वाढत जातो. मग भांडणं,
आरोप करणं, खुलासे मागणं, एकमेकांवर टीका करणं या सगळ्या गोष्टी सुरू
होतात. तसं आपल्या नात्याचं होऊ द्यायचं नसेल तर दुसरा जे काही सांगतोय,
ते पटत नसलं तरी शांतपणे ऐकून घेऊन मग त्यावर प्रतिक्रिया देण्याचा
समजूतदारपणा दाखवायलाच हवा.’’
 

जीवन हरवले आहे

ए‌. सी. ऑफिस, स्वतंत्र केबीन
फटाकडी सेक्रेटरी, दिवसभर मिटिंग्जच मिटिंग्ज
मिटिंग्जमुळे खूप भेटी राहिल्या आहेत
सगळ्या मिटिंग्ज सोडून ज्याला भेटावं
असा लंगोटी यार मात्र हरवला आहे


भरपूर पगार, उदंड सेव्हिंग
मनसोक्त शॉपिंग, सामानाचा ढिगच ढिग
सामानाच्या ढिगाखाली खूप गोष्टी दडल्या आहेत
चूक करून ज्याच्या आड लपाव
असा आईचा पदर मात्र हरवला आहे
हरवला आहे

दिवसाआड पार्टी, कधी पब कधी डिस्क
धुंद रात्र मस्तीची ,प्याल्या प्याल्यातून झिंगच झिंग
चिअर्सच्या चित्कारात खूप आवाज विरून गेले आहेत
ज्या आवानानी हृदयाला साद घालावी
असा आरतीचा गजर मात्र हरवला आहे
हरवला आहे

कारच्या वेगात, सायकलची फेरी हरवली आहे
हॉटेलच्या खाण्यात, फोडणीची पोळी हरवली आहे
तारांकित क्रुझच्या आरामात, पंढरीची वारी हरवली आहे
पिकनिकच्या स्पॉटच्या गर्दीत, मामाचा गाव हरवला आहे
बंद दाराच्या अपार्टमेंटमध्ये, शेजार हरवला आहे
डीजे व्हिजेच्या गोंगाटात, वासुदेवाची मुरली हरवली आहे
साठ फुटी सिमेंटच्या रस्त्यात, वडाची सावली हरवली आहे
कॉन्व्हेंटच्या अट्टाहासात, बाराखडी हरवली आहे

हाय हॅलो थँक युमध्ये, साधीभोळी अनौपचारिकता हरवली आहे
फायद्यातोट्याच्या गणितात, उस्फुर्तता हरवली आहे
निलाजऱ्या रिमिक्समध्ये, निरागसता हरवली आहे
धकाधकीच्या दिनक्रमात, निवांत गप्पा हरवल्या आहेत
सिमेंटच्या जंगलात, माती हरवली आहे
चौकोनी कुटुंबात, नाती हरवली आहेत

आम्ही धावणार करिअरमागे, बाकी कशाची खंत नाही
कशाकशाचा हिशोब मांडू?

*ह्या चकचकीत मॉडर्न जगण्यात जिंदगीच हरवली आहे
जिंदगीच हरवली आहे *

Thursday, April 5, 2012

काही नाती

*जीवनात नाती तशी अनेकच असतात,
पण ती जपणारी लोक फार कमीच असतात......

काही नाती असतात रक्ताची,
तर काही हृदयाची......

काही नाती असतात जन्मो-जन्मीची,
तर काही.. ' काही क्षणापुरतीची '.......

काही नाती असतात,
केसांसारखी न तुटणारी,
पण वेळ आलीच तर वाकणारी.....

काही नाती असतात,
लांबुनच आपले म्हनणारी,
जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी.....

काही नाती असतात,
पैशाने विकत घेता येणारी,
तर काही प्रेमाने आपलेसे करणारी......

काही नाती असतात,
न जोडता सुद्धा टिकणारी,
तर काही जोडून सुद्धा तुटणारी......

जीवनात नाती तशी अनेकच असतात....

म्हणुनच म्हणतात ना.....

" हे जीवन एक रहस्य आहे,
तिथे सर्व काही लपवावं लागतं....
मनात कितीही दुःख असले,
तरी जगा समोर हसावं लागतं....!!!"*

मैत्री हा असा एक धागा

*मैत्री हा असा एक धागा,
जो रक्ताची नातीच काय
पण परक्यालाही खेचून आणतो
आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो.

मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर

काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
अशी असते ती मैत्री
ठेवा लक्षात या गोष्टी.................!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!*

Tuesday, April 3, 2012

आभाळातून पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब

आभाळातून पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब आपल्याला काही ना काही देऊन
जातो, शिकवून जातो ...

जेंव्हा तो तहानलेल्या धरती वर पडतो... तेंव्हा तो मातीला एक वेगळाच गंध देऊन
जातो... ओल्या मातीचा गंध...* *
'देण्यात' किती सामर्थ्य असतं हेच तो नकळत आपल्याला सांगून जातो...

जेंव्हा तो झाडांच्या पानांवर पडतो... जास्त वेळ थांबत नसेलही तो तिथे... पण
तरीही तो त्या पानांना अगदी टवटवीत करून जातो...
'ओझरता स्पर्श'... ओझरत्या स्पर्शाची ताकद दाखवून जातो तो आपल्याला ...
कारण त्यात 'लालसा' नसते... त्यात असते एक अनामिक 'ओढ'... अन तीच आपल्याला
टवटवीत ठेवते...
अन जेंव्हा तो तिच्या चेहऱ्यावर पडतो... तेंव्हा ....
तेंव्हा राहतंच काय हो ;)...

तिच्या गालावरून खाली येतांना तर तो खुद्द बेभान होऊन जातो...
बेधुंद 'जगणं' काय असतं हेच तो आपल्याला सांगून जातो...*

*कधी असही जगाव लागत *

*कधी असही जगाव लागत *
*खोट्या हास्य्च्या पडद्याआड *
*खर दुख लपवावं लागत *
*
*
*कर्तव्याच्या नावाखाली *
*स्वताला राबवाव लागत *
*
*
*इतरांना आनंदी ठेवण्यासाठी *
*डोळ्यातलं पाणी लपवावं लागत *
*
*
*तीव्र इछ्या असून देखील *
*नाही म्हणव लागत *
*
*
*खूप प्रेम असून देखील *
*नाही असे दाखवाव लागत *
*
*
*अस इतरांना हसवता हसवता *
*कधी खूप रडव लागत *
*
*
*कधी असही जगाव लागत *

नशीब

*नशीब" कोणी दुसरं लिहित
नसतं,

आपल नशीब आपल्याच
हाती असतं,

येताना काही आणायच नसतं,
जाताना काही न्यायचं
नसतं,

मग हे "आयुष्य"
तरी कोणासाठी जगायचं
असतं,

याच प्रश्नाचे उत्तर
शोधण्यासाठी "जन्माला"
यायचं असतं....................!!!!!!!!!!!!!!!*

Monday, April 2, 2012

जगण्यासाठी अजुन काय हवं?

आई, एक बाप,
एक भाऊ, एक बहिण,
असं एखादं घर हवं,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक मित्र, एक शत्रु,
एक सुख, एक दु़:ख,
असं साधं जीवन
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक प्रेयसी, एक अर्धांगिनी,
एक खरं प्रेम, एक भक्क्म आधार,
यात कुठेही नसला प्रेमाचा अभाव तर,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक सुर्य, एक चंद्र,
एक दिवस, एक रात्र,
फक्त सगळं समजायला हवं,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक शक्ती, एक भक्ती,
एक सुड, एक आसक्ती
ठायी असेल युक्ती तर,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

थोडा पैसा, थोडी हाव,
थोडा थाट, थोडाबडेजाव,
सगळयांच्या तोडी आपलंच नाव,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक नोकरी, एक छोकरी,
दोन मुलं अन खायला भाकरी,
उत्तम प्रकारची जर असेल चाकरी,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक समुद्र, एक नदी,
एक शांत, एक अवखळ
जीवनात असली जर एक तळमळ
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक इच्छा, एक आशा,

असे शब्द होते

*असे शब्द होते
तसे शब्द होते
जसा अर्थ घ्यावा
तसे शब्द होते*

*कुणा ना कळावे
खरे काय होते
असे मुक्त वेडे
तुझे शब्द होते*

*श्रवून जाहले ते
लिहून घेतले ते
जपून ठेवले ते
खुळे शब्द होते*

*जगी जाणकार
कुणी ही असू दे
कविता म्हणाया
खुजे शब्द होते*

*प्रतिभेस माझे
साष्टांग नमन
समजलेच नाही
कसे शब्द होते*

*अनुवाद व्हावा
जरा इंग्रजीत
मराठीत बहुदा
न हे शब्द होते*

*ऐकता वाचता
जाहलो "आडवा"
तरीही उरावर
उभे शब्द होते..

बोट...

बोट...

ती जोपर्यंत जमिनीवर असते तोपर्यंत ती अशीच निश्चल पडून असते...
पण जेंव्हा ती पाण्यात उतरते तेंव्हा ती तरंगायला लागते...
हळूहळू का होईना पण प्रवाहाच्या दिशेने वाहायला लागते...

आयुष्यात पण आपल्याला दोन प्रकारची माणसं भेटतात...
पहिली त्या जमिनीसारखी असतात...
ती आपल्या आयुष्यात येतात... त्यांच्या सहवासात, दिवस, महिने, वर्ष सरत जातात
पण आपण जिथल्या तिथेच असतो..

अन दुसरे.. दुसरे त्या पाण्यासारखे असतात...
आपल्याला स्वतःच्या प्रवाहात वाहून घेणारे...
त्यांच्या सहवासात आपण डुलत राहतो, तरंगत राहतो...
एक वेगळीच आशा असते त्यांच्या सहवासात... कुठल्यातरी नवीन किनाऱ्यावर
पोहोचण्याची...

पण कधी कधी परिस्थिती आपली ताकद दाखवते...
वातावरण बदलते... एक भलं मोठं वादळ येतं... अन सगळं काही अस्ताव्यस्त होऊन
जातं...
अश्या वेळी दोनच गोष्टी होतात...
एक तर आपण पूर्णतः बुडून जातो...
आणि जर वाचलोच तर वादळी प्रवाह आपल्याला एखाद्या अज्ञात, अनोळखी बेटावर वाहून
नेतो...

"अन तिथून परत येणं हे जवळ जवळ अशक्यच असतं..."

गुरु

गुरु :
गु म्हणजे *गुप्त* आणि रु म्हणजे *रूप*.
*आत्म्याचे गुप्त रूप* साधकाला (भक्ताला) दाखवणारा, साधकाच्या अनुभवास आत्मरूप
आणून देणारा (*१*) तो गुरु.
आत्म्याचे गुप्त अंग जो दाखवितो तो गुरु.
गुरुपद म्हणजे तत्पद. तत्पद म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण या चार
देहांच्या पलीकडे असणारे आत्मतत्त्व. तत्पद म्हणजे सत्पद. सत्पद म्हणजेच
चित्पद. म्हणून गुरु हे चैतन्यरूप आहेत व त्यांचे पदही चैतन्यरूप आहे. चैतन्य
हेच गुरूचे स्वरूप आहे. गुरु हे देहातीत व चैतन्यरूप असतात. निरुपाधिक जीवन
हेच त्यांचे खरे स्वरूप. गुरु हा सत्तारूप आहे. गुरु सोहंरूप आहेत. सोहंमधील
आकाश म्हणजे चिदाकाश. चिदाकाशात आत्मा तेजोरूपाने आहे; तेच गुरूचे खरे स्वरूप
आहे. तेथेच गुरूंचा वास असतो.

गुरुकृपा ही विषासारखी आहे. विष माणसाला आपणासारखे करून टाकते. कृपेने गुरु हे
शिष्याला आपणासारखे करून टाकतात.

गुरुकृपेशिवाय *आत्मसाक्षात्कार* होत नाही..

गुरुविण कोण दाखविल वाट ?

गुरुविण कोण दाखविल वाट ?
संवेदनाशील व्यक्तिमत्वच चाकोरीबाहेरील जीवनाचा विचार करू शकते. प्राप्त
जीवनात काहीतरी करायचे आहे या ध्येयवादाने पछाडले गेलेले असे व्यक्तिमत्व मग
गुरुच्या शोधास लागते.
एकदा खात्री झाली की आपणाला याच मार्गदर्शनाची आवश्यकता आहे की मग नकळत
गुरु-शिष्यांचे नाते निर्माण होते. प्रेम व भक्ती जागृत होते. श्रद्धा बसते.
श्रद्धेमध्ये जबरदस्त शक्ती असते. आत्म-विश्वास निर्माण होतो. आणि नकळत
शिष्याची मजल गुरुच्याही पुढे जाते.
गुरुपासून ज्ञानप्राप्ती करून घेत असता शिष्याची अभ्यासू वृत्ती वृद्धिंगत
होत. पर्यायाने इच्छित ज्ञानाबरोबरच तदनुषंगिक इतर ज्ञानांचा फुलोरा फुलत
जातो. शिष्याचे व्यक्तिमत्व बहरले जाते आणि मग नकळत जिज्ञासूंमध्ये चर्चा सुरू
होते की, श्री रामकृष्ण परमहंस मोठे की स्वामी विवेकानंद..................
जनार्दनस्वामी श्रेष्ठ की संत एकनाथ गुरु निवृत्तीनाथाची महती मोठी की संत
ज्ञानेश्वर माउलीची ?
खरे म्हणजे या प्रश्नाचे उत्तर आधी बी का आधी झाड... एवढे अवघड आहे. गुरु
आणि शिष्य यांचा मोठे पणा मोजायला कोणतेही व्यावहारिक परिमाण उपयोगी पडत नाही.
पण त्यातील महत्त्वाचा मुद्दा एकच गुरुशिवाय ध्येयवादी व्यक्तिमत्वाला पर्याय
नाही. मग असा गुरु भेटतो तेव्हा? कोठे? कसा? वगैरे वगैरे.
याचे उत्तर अगदी सोपे आहे. तुमच्या घरातही तुम्हांस आईच्या रूपाने, भाऊ अगर
वडिलांच्या ज्ञानाने, शिक्षकांच्या ममतेने गुरुछत्र लाभू शकते.
क्रीडांगणावरील अगर रंगभूमीवरील अनुभवी कलाकार, हेही त्या क्षेत्रातील गुरुच
होत. लो. टिळक, म. गांधी, स्वा. सावरकर हे आजच्या अनेक राजकीय पुढाऱ्यांचे
गुरुच होते. म्हणजे गुरु हा फक्त आध्यात्मिक क्षेत्रापुरताच मर्यादित नाही. तर
जीवनाच्या प्रत्येक प्रक्रियेशी त्याचा निकटचा संबंध असू शकतो.
यासाठी संवेदनाशील व्यक्तिमत्वाला जरुरी आहे मनोनिग्रहाची, श्रद्धेची आणि
भक्ती व प्रेमाची आवश्यकता आहे. चिकाटी व प्रामाणिकपणाची. या गुणांसह डोळस व
अभ्यासू दृष्टीने वाटचाल केल्यास योग्य गुरु लाभू शकेल. आणि मग ध्येयप्राप्ती
दृष्टिपथात येऊ शकेल. आज समाजाच्या कोणत्याही क्षेत्रात र्कीर्तिशिखरावर
विराजमान झालेल्या व्यक्तीचा इतिहास पडताळून पाहता त्याच्या यशाचे रहस्य हे,
हे त्याच्या अचूक गुरुप्राप्तीत असल्याचे आढळून येईल. आणि म्हणूनच हे सत्य आहे
की ...........
गुरुविण कोण दाखविल वाट ?

आई, तू आहेस म्हणूनचं

आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या
अस्तित्वाचं इथे नांदणं आहे
संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी
हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे

आई, तुझ्या रागवण्यातही
अनूभवलाय वेगळाच गोडवा
तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात
फिका पडतो दसरा नि पाडवा

आठवतं तापाने फणफणायचो तेव्हां
तू रात्रभर कपाळावर घड्या घालायचीस
सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरी
तुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच लढायची

एकदा जरासं कुठे खरचटलो
आई, किती तू कळवळली होतीस
एक धपाटा घालून पाठीत
जख्मेवर फुंकर घातली होतीस

जख्मं ती पुर्ण बुजली आता
हरवून गेली त्यावरची खपली
तो धपाटा, ती फुंकर, ती माया
ती हरेक आठवण मनात जपली

आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितींदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी

आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फीटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजावनं मिटणार नाही

आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो
तरी तू मला शोधून काढशील
आई, तुला एकदाच हाक दिली
तरी अब्जांनी धावून येशील
एक अंत आत ' म्हणजे एकांत..
आयुष्यात काही क्षण इतके हळवे असतात की तेव्हा माणसाला एकांत हवा असतो...
बर्‍याचवेळी हा एकांत आपल्या जवळच्या व्यक्तीच्या विचित्र वागण्यानेच हवा असतो
हे न पचणारे न पटणारे तथ्य...
एखाद्या व्यक्तीचे विचित्र वागणे, मन दुखावणे, सोडून जाणे या आणि अश्या असंख्य
गोष्टी ज्याने मन बेचैन होते आणि मग आपल्याला हवा असतो तो फक्त आणि फक्त
एकांत...

एकांत चांगला की वाईट?? यावर प्रत्येकाचे वेगळे वेगळे मत असु शकते... पण तो
सर्वांना हवा असतो हेही तितकेच खरे... कधी कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी,
त्रास देणारे क्षण विसरण्यासाठी...आयुष्यातली न सुटणारी कोडी
सोडवण्यासाठी...तर कधी सार्‍याचाच कंटाळा येऊन फक्त आणि फक्त एकट
राहण्यासाठी.. अश्या असंख्य कारणांसाठी प्रत्येकाला एकांत हवा असतो...भारताची
लोकसंख्या पाहिली तर अशी किती कारण असतील याचा विचार न केलेलाच बरा नाहीतर
त्यासाठी सुद्धा एकांत शोधावा लागेल...

जेव्हा कधी आपल्याला वाटेल की एखादी आपल्या जवळची व्यक्ती दु:खी आहे त्यावेळी
तिला एकटे राहू द्या... तो अनुभव त्या व्यक्तीला खूप काही देऊन जातो सांत्वन
करण्यापेक्षा त्या व्यक्तीला थोडासा वेळ देणे जास्त योग्य... एकांत आणि
एकाकिपणा यात खूप फरक आहे... ’

आयुष्य जगताना खूप खाचखळगे होते, असणार आणि कायम राहणार...चालताचालता लागलं तर
कोणी चालणे सोडत नाही.... आयुष्यात जवळचे कोणी गेले तर कोणी जगणे सोडत नाही..
तसेच कोणी बरोबर असो वा नसो एकांत हा सुद्धा कोणीच सोडू शकत नाही...