*आनंद हा मिळवता येत नाही, आनंद ही सहज प्रवृत्ती असली पाहिजे, आनंदाचे तरंगमनात आपोआप निर्माण झाले पाहिजेत. झऱ्याप्रमाणे तो मनात पाझरला पाहिजे, ज* *ीवनात यशस्वी होणं, हीसुद्धा सहज प्रवृत्ती असते. जीवनाबाहेरच्या उपायांनीयशस्वी बनविता येत नाही. बाहेरच्या गोष्टीनं जीवनात आनंदही मिळत नसतो. आनंदानंउंच उंच झोका घ्यायला शिकलं पाहिजे, झोका घेऊन आनंद मिळवायचा नसतो, तुम्हातरुणांनी हे लक्षात घेणं अत्यावश्यक आहे! ................ एक तरुणी रस्त्यानं एकटीच चालत होती. चेहरा उदास होता. स्वत:वरच नाराज होती.आसपास वसंताचा फुलोरा फुलला होता. प्रत्येक झाड नवी, कोवळी, हिरवी, पोपटीपालवी लेवून चैतन्यानं सळसळत होतं. पक्ष्यांचा गोड किलबिलाट चालू होता, परंतुतिचं त्याकडे लक्ष नव्हतं. ती स्वत:च्या विचारात होती. तिच्या मनात शल्य सलतहोतं की आपण संुदर नाही. 'माझ्या मैत्रिणींना बॉयफ्रेंड्स आहेत. परंतु, मलाचनाहीत. त्या सर्व आनंदी आहेत. मी सुंदर नसल्यानं मला बॉयफ्रेंड नाही.' या विचारांमध्ये ती गढली असतानाच वाऱ्याची झुळूक आली, तिच्या कपाळावरील बटा उडूलागल्या, नाचू लागल्या. तिच्या कानात हळूच, प्रेमानं गुंजारव करत झुळूक तिलाम्हणाली, 'माझ्या मुली, तू माझ्यासमवेत उडत चल, विचारांमध्ये गुंतून खिन्न बनूनबसू नको. मग तूही फुलत जाशील.' केवळ देहाच्या सौंदर्याकडं पाहात बसू नको, असंसमजावण्याचा प्रयत्न ती करू लागली. वाऱ्याची ती झुळूक इकडून तिकडे, तिकडून इकडे, अशी सर्वत्र पिंगा घालत होती. एकाजागी थांबायला तयार नव्हती. जीवन विशाल आहे. एका जागी, एका विचाराला तू चिकटूनराहू नको. शरीर आणि मनानं चालत राहा, फिरत राहा. हेच जीवन आहे. झुळूक तिलापटवण्याचा प्रयत्न करू लागली, 'हे बघ, मी आनंद मिळवण्यासाठी इकडून तिकडे फिरतनाही, तर आनंदानं बेहोष होऊन सर्वत्र फिरत आहे. माझ्या मनात निर्माण झालेलाआनंद व्यक्त करत आहे, आनंदाचा झरा माझ्या मनातच आहे. माझं मन आनंदानं इतकं भरूनगेलं आहे, की मला काय करू आणि काय नको, असं झालं आहे. माझं हे नृत्य, नाच,पिंगा त्याचं प्रतीक आहे. आनंदापोटी हे घडत आहे. आनंद मिळविण्यासाठी मी हे करतआहे, असं तुला वाटत असेल, तर ते चूक आहे. आनंद हा मिळवता येत नाही, आनंद हीसहजप्रवृत्ती असली पाहिजे, आनंदाचे तरंग मनात आपोआप निर्माण व्हावेत. जीवनातयशस्वी होणं, हीसुद्धा सहजप्रवृत्ती असते. जीवनाबाहेरच्या उपायांनी यशस्वीबनविता येत नाही. बाहेरच्या गोष्टीनं जीवनात आनंद मिळत नसतो. आनंदानं उंच उंचझोका घ्यायला शिकलं पाहिजे, झोका घेऊन आनंद मिळवायचा नसतो, तुम्हा तरुणांनी हेलक्षात घेणं अत्यावश्यक आहे!' तुमच्या अंगी असलेली प्रवृत्ती अधिक महत्त्वाची आहे. अंगी योग्य वृत्ती असेल तरतुमचं मन नेहमीच प्रफुल्लित राहील. तुमच्यापुढं निर्माण होणाऱ्या समस्या कधीमोठ्या नसतात, तुम्ही मोठे असतात. समस्यांचे बळी बनता कामा नयेत, तर यासमस्यांवर विजय मिळविता आला पाहिजे. त्यामुळे तुम्ही नेहमी आनंदी राहू शकता. एखादी सोपी गोष्ट अवघड बनू शकतं. त्यास दुसरं कोणी जबाबदार नसतं, तर तुमचादृष्टिकोन जबाबदार असतो. तुमच्या अंगी चांगली, विधायक प्रवृत्ती असेल तर अवघडकामही आव्हान ठरू शकतं! तुम्ही वागण्याची पद्धत बदला. एका पब्लिक स्पीकिंग क्लासमध्ये तरुणांना मार्गदर्शन करताना प्रशिक्षकानंसांगितलं, 'तुमच्या बोलण्यात स्वर्गाचा जेव्हा उल्लेख येईल, त्यावेळी तुमचाचेहरा आनंदानं धगधगला पाहिजे, तळपला पाहिजे. डोळे चमकले पाहिजेत, ओठ थरथरलेपाहिजेत.' हे ऐकून एका युवकानं शंका विचारली, 'नरकाचा उल्लेख आला तर चेहऱ्यावरकसे भाव हवेत?', त्यावर प्रशिक्षकानं उत्तर दिलं, 'त्यासाठी तुमच्याचेहऱ्यावरील नेहमीचे भाव पुरसे आहेत!' एक लक्षात घ्या, विधायक विचार हा जीवनाचा फार मोठा ठेवा असतो. तुमचं मन, विचारबदला. मनात नेहमी चांगले विचार राहू द्या. निराशावाद्याला कधीच चांगली संधीसापडत नाही आणि आशादायी माणसाला अडचणींमध्येही संधी सापडते. जेव्हा एक दरवाजाबंद होतो, त्याचवेळी संधीचा दुसरा दरवाजा उघडतो. जीवनावर विश्वास ठेवा. तुमचंजीवन सहज, हलकं, तरंगतं, कसं बनेल, याकडे लक्ष दिलं पाहिजे, जीवनाशी झगडत राहूनये, तुम्ही लहरींशी लढत बसू शकत नाहीत, परंतु, लहरींवर तरंगू शकता. तुम्ही मनातील भावना बदलू शकता. तुमच्या जीवनाचा दर्जा, तुमच्या मनात सातत्यानंनिर्माण होणाऱ्या भावनांवर अवलंबून असतो. तुमच्या भावना खालावत जातात, त्यावेळीत्यात बदल घडवून आणा. जीवनातील आनंदी घटना आठवा. जीवनमूल्यांमध्येही बदल घडवून आणा. जीवनातील चांगुलपणा आणि समाज यांना जोडणारीमूल्यं जोपासा. अनेकजण अपयशाला, मरणाला, असुरक्षिततेला, नकाराला भितात.दृढनिश्चयानं पुढे या, मग तुम्हाला समजेल की, अपयश म्हणजे दुसरं काही नसून पुढंसरकलेलं यश आहे. अपयश हे यशासाठी घातलेलं खतपाणी आहे. तुम्ही तुमच्या जीवनातऊर्जा आणली तर ही ऊर्जा तुम्हाला मनातील अपयशाची भीती घालविण्यास मदत करील.तुम्ही भीतीचं विश्लेषण केलं तर तुमच्या लक्षात येईल की, भीती ही नेहमीविचारांची चालना आहे आणि विचार म्हणजे मानसिक शब्दांना मिळणारी चालना आहे. अशाया भीतीचे, भीतीदायक विचारांचे गुलाम होऊन बसता. जर तुम्हाला धाडसाची आवड असेलतर असुरक्षिततेतून मार्ग काढण्याचे आव्हान तुम्ही सहज पेलू शकाल. मग तुम्हालाअशा या असुरक्षितेतही गंमत वाटेल. * *अनुवाद : जॉन कोलासो*