Wednesday, June 6, 2012

*लाल, हिरवा, निळा, पिवळा... अशे अनेक रंग... पण त्यातला खरा रंग कुठला...

*लाल, हिरवा, निळा, पिवळा... अशे अनेक रंग... पण त्यातला खरा रंग कुठला...
खरं सांगायचं तर कुठलाच नाही...
हे सगळे फक्त उघड्या डोळ्यांना दिसणारे भ्रम ...
इथेच माणसं चुकतात... डोळ्यांना जो उठून दिसतो त्यालाच ते खरा रंग मानतात...

एखादा विशिष्ट रं* *ग अगदी उठून दिसत असला तर त्यात सगळ्यात जास्त श्रेय असतं
स्वतः पाठीमागे राहून त्या रंगाला उठाव देणाऱ्या त्या पृष्ठभागाच...
जसं पांढऱ्या खडूची अक्षरं काळ्या black-board वरंच आणि रंगीबेरंगी चित्र
पांढऱ्या canvas वरंच उठून दिसतात...

पण आजूबाजूच्या वातावरणापेक्षा त्या रंगाला एक विशिष्ट उठाव देणाऱ्या
पाठीमागच्या पृष्ठभागाकडे माणसं नेहमी दुर्लक्ष करतात...
तारीफ होते ती नेहमी स्पष्ट दिसणाऱ्या अक्षरांची किंवा मोहक वाटणाऱ्या रंगीत
चित्रांची... black-board आणि canvas ची नाही...

आयुष्यातही अशे अनेक प्रसंग येतात जेंव्हा आपली स्थिती त्या पाठीमागच्या
पृष्ठभागासारखी होते...
श्रेय मिळतं ते उठून दिसणाऱ्या रंगांना, बोलून दाखवणाऱ्या व्यक्तींना...

अश्या वेळी आपण दुखी वाटून घेऊन नये...
सत्याकडे दुर्लक्ष्य करायची लोकांची नेहमीचीच सवय...
आपण फक्त, आपण मागे राहिल्यामुळे कुणीतरी 'दुसरं' उठून दिसतंय हा गोष्टीत
दिलासा मिळवावा...

ह्या दोन गोष्टी एकदा पचवल्या की मग black-board बनून राहण्यासारखी
मजा दुसऱ्या कशातच नाही...*
*
[image: Photo: लाल, हिरवा, निळा, पिवळा... अशे अनेक रंग... पण त्यातला खरा
रंग कुठला... खरं सांगायचं तर कुठलाच नाही... हे सगळे फक्त उघड्या डोळ्यांना
दिसणारे भ्रम ... इथेच माणसं चुकतात... डोळ्यांना जो उठून दिसतो त्यालाच ते
खरा रंग मानतात... एखादा विशिष्ट रंग अगदी उठून दिसत असला तर त्यात सगळ्यात
जास्त श्रेय असतं स्वतः पाठीमागे राहून त्या रंगाला उठाव देणाऱ्या त्या
पृष्ठभागाच... जसं पांढऱ्या खडूची अक्षरं काळ्या black-board वरंच आणि
रंगीबेरंगी चित्र पांढऱ्या canvas वरंच उठून दिसतात... पण आजूबाजूच्या
वातावरणापेक्षा त्या रंगाला एक विशिष्ट उठाव देणाऱ्या पाठीमागच्या
पृष्ठभागाकडे माणसं नेहमी दुर्लक्ष करतात... तारीफ होते ती नेहमी स्पष्ट
दिसणाऱ्या अक्षरांची किंवा मोहक वाटणाऱ्या रंगीत चित्रांची... black-board आणि
canvas ची नाही... आयुष्यातही अशे अनेक प्रसंग येतात जेंव्हा आपली स्थिती त्या
पाठीमागच्या पृष्ठभागासारखी होते... श्रेय मिळतं ते उठून दिसणाऱ्या रंगांना,
बोलून दाखवणाऱ्या व्यक्तींना... अश्या वेळी आपण दुखी वाटून घेऊन नये...
सत्याकडे दुर्लक्ष्य करायची लोकांची नेहमीचीच सवय... आपण फक्त, आपण मागे
राहिल्यामुळे कुणीतरी 'दुसरं' उठून दिसतंय हा गोष्टीत दिलासा मिळवावा... ह्या
दोन गोष्टी एकदा पचवल्या की मग black-board बनून राहण्यासारखी मजा दुसऱ्या
कशातच नाही...]
*

No comments:

Post a Comment