Sunday, July 31, 2011

जमेल का पून्हा लहान व्हायला..?

 
जमेल का पून्हा लहान व्हायला..?


जमेल का पून्हा लहान व्हायला..?

"क्षणात घेतात कट्टी
अन क्षणात घेतात बट्टी
आवडते त्यांना शाळा
जर असेल तर सूट्टी ...

कोणाच काही न ऐकनारा
स्वभाव त्यांचा हट्टी
धाक दाखवायला घ्यावी लागते
हातामध्ये पट्टी ..

अभ्यासाचा वेळी यांना
खेळ भारी सुचतो
क्लासमध्ये बसल्या बसल्या
बाजुवाल्याला पेन्सीलच टोचतो ..

छडीसारखे प्रसाद तर
यांना रोजचेच भेटतात
दप्तर फ़ेकून घरात
खेळायला पळतच सुटतात ..

अभ्यासात नेमके यांचे
पाढेच कसे चुकतात
गणित सोडवायला घेतल की
हातचे एकच हुकतात ..

चित्र काढतांना मात्र
चित्रामध्येच घुसतात
ओरडा खाऊन मोठ्यांचा
कोपर्‍यात जाऊन बसतात ..

अस हे लहाणपन पून्हा कधीच
वाट्याला कुणाच्या येत नाही
लहान मुलांबरोबर खेळतांना
ठरवूनही मन लहान होत नाही.....!!!!!..
 

Friday, July 22, 2011

या मातीतुन जन्मलो

*या मातीतुन जन्मलो
या मातीतच मी संपणार

येतानाही जवळ नव्हते काही
जातानाही काहीच बरोबर नाही मी नेणार

परमेश्वरांन दिलेल आयुष्य
प्रत्येक क्षण क्षण मी जगणार

दु:खाला सुखाचा सोबती करुन
संकटाशी हितगुज मी करणार

जितके जमेल तितके हासु वाटत
सर्वांचे अश्रु विकत मी घेणार

तु दिलेले जीवन
तुझ्याच कार्यास बहाल मी करणार
या मातीतुन जन्मलो
या मातीतच मी संपणार
दु:खी कष्टी न राहो कोणी
यासाठी सद्येव मी झिजणार
अन्यायाशी लढा देत
प्रामाणिकपणा मी जपणार
सतत कष्टत राहुन
माझ्या घामाचे चित करणार
या मातीतुन जन्मलो
या मातीतच मी संपणार
शेवटी मरण येईल तेव्हा
मुखी तुझेच नाम घेणार
जाता जाता हे जीवन
ईतरांच्यासाठी सार्थकी मी लावणार
या मातीतुन जन्मलो
या मातीतच मी संपणार*
 

फळांचे औषधी उपयोग Fruits as Medicine

फळांचे औषधी उपयोग Fruits as Medicine
आंबा :
[image: Mango]

आंबा हा फळांचा राजा तो फक्त वैशाख व ज्येष्ठ महिन्यातच खावा, असे
आयुर्वेदाच्या अभ्यासकांचे सांगणे आहे. हे फळ शक्तिवर्धक आहे. अन्नाबद्दल रूचि
उत्पन्न करणे व भूक वाढविणे हे त्याचे प्रमुख गुण होत तसेच शरीराची आग होत
असल्यास आंबा उपयुक्त ठरतो. यावरून उन्हाळ्यात आंबा खाणे योग्य आहे. हे दिसून
येते. अतिसार म्हणजे वारंवार शौचास होणे. या व्याधीवर आंब्याची साल व कोय
उपयुक्त आहे. साल ठेवून तिचा काढा तयार करून घेतात. तसेच कोय भाजून तिचे चूर्ण
करून मधातून दिल्यास विशेषतः लहान मुलांचा अतिसर दूर होतो.

अंजीर :
[image: Anjeer]

अंजीर ह्या फळाचा उल्लेख पुरातन ग्रंथात तसेच बायबलमध्ये उन्हाळा व पावसाळा या
दोन्ही ऋतुत अंजीराचा सीझन असतो. उन्हाळ्यात येणारे अंजीर गोड असते. अंजीरातून
शरीराला लोह, व्हिटॅमिन्स ए. बी. सी बऱ्याच प्रमाणात मिळते. तसेच शर्करा भरपूर
प्रमाणात मिळते. अंजीर खायला थंड व पचायला जड असतात. यांच्या सेवनाने गॅससेची
तक्रार दूर होते. तसेच पित्त विकार, रक्तविकार, व वात विकार यातील औषधी
गुणधर्मामुळे दूर होतात.

अपचन ऍसिडीटी, गॅसेसचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी दररोज सकाळ-संध्याकाळ १ ते २
अंजीर खावीत किंवा याचा रस प्यावा. वरील त्रासापासून आराम मिळेल. अंजीर
खाल्यानी बौद्धिक व शारिरीक थकवा दूर होण्यास मदत होते. लघवीचा त्रास होत
असल्यास दिवसातून तीन-चार अंजीर नियमितपणे खावीत यामुळे मुत्रविकार दूर होतात.
अशक्त व्यक्तींनी अंजिराचे रस अथवा खाल्याने गुणकारी परिणाम होतात. त्वचा
विकार, त्वचेची आग होणे व कांजण्या या आजारात आराम पडण्यासाठी अंजीर खावीत.
दररोज कोणतेही एक फळ खाल्याने शरीर निरोगी नक्कीच बनते.

अंजीर खाल्ल्याने अजीर्णाचा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे पोटात केस गेल्यावर
अंजीर खाल्यामुळे त्याचे पाणी होते, असे म्हणतात. अंजीर शक्तीवर्धक आहे. तसेच
ते सारकही आहे. म्हणजे ओली किंवा सुकी दोन अंजिरे झोपण्याच्या वेळी खाऊन थोडे
पाणि प्यावे. थोड्याच दिवसात तक्रार दूर होते.
आवळा :
[image: Awala]

आवळा हे फळ हे फळ बहुगुणी आहे. हे मुख्यतः पित्तशामक आहे. आवळ्याचा चमचाभर रस,
जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास आम्लपित्त
कमी होते. पित्तामुळे भोवळे येणे कमी होते. लघवीच्या विकारांवर हे परिणामकारक
औषध आहे. आवळा व खडीसाखर घेतल्याने लघवीला साफ होते आणि लघवीच्या वेळी आग होणे
किंवा लघवी कमी होणे या तक्रारी दूर होतात. आवळा उपलब्ध नसल्यास त्या पासून
तयार केलेली आवळकंठी वापरतात येते. याशिवाय अंगावर खरका किंवा कोरडी खरूज
उठल्यास आवळकंठी पाण्यात भिजवून अंगास लावावी. आवळ्यापासून तयार केलेला मोरावळा
हा तर पित्तावर उत्तम आहे. रोज परसाकडेला साफ होत नाही, पोट जड वाटते, भूक लागत
नाही, मन प्रसन्न राहत नाही, आजारी असल्यासारखे वाटते अशा तक्रारींवर मोरावळा
रामबाण आहे. रोज नियमाने मोरावळ्यातले दोन आवळे खाण्यामुळे, ही नेहमी दिसून
येणारी तक्रार दूर होते. आवळ्यापासून बनविलेले तेल डोके थंड राखण्यासाठी
उपयुक्त आहे.
ऊस :
[image: Sugar Cane]

ऊस खाण्यामुळे लघवी साफ होते. तसेच लघवीच्या वेळी आग होत असल्यासही तो उपयुक्त
ठरतो. कावीळ झालेल्या रोग्यास तर ऊसासारखे दुसरे औषध नाही. काविळीचे रोग्याने
रोज दोन वेळा जेवणापूर्वी ऊस खावा. चार पाच दिवसात प्रकृतीत सुधारणा होते. ऊस
हा थंड आहे. त्यामुळे उन्हाळ्यात घेतल्यास उपकारक ठरतो. त्याचप्रमाणे कलिंगड हे
एक थंड फळ आहे. त्याबद्दल एकच काळजी घेणे आवश्यक आहे. रस्त्यात गाडीवर
मिळणाऱ्या उघड्या फोडी खाल्यामुळे एखाद्या वेळी अपाय होण्याचा संभव असतो. कारण
त्याच्यावर माशा बसून व रस्त्यातील धूळ उडून त्या दूषित झाल्या असण्याचा संभव
असतो.
द्राक्षे :
[image: Grapes]

द्राक्षे हे मलावरोधावर उत्तम औषध आहे. तसेच त्यापासून तयार केलेला मनुकाही एक
चांगले टॉनिक आहे. पचनाच्या सर्व विकारांवर द्राक्षे उपयोगी आहेत. घसा जळजळणे,
घशाशी येणे, पोटदुखी, आंबट ढेकरा, उलटी या अपचन व आम्ल पित्ताच्या लक्षणावर
द्राक्षे खावी. मूठभर द्राक्षे व मूठभर बडीशेप ठेचून कपभर पाण्यात रात्री भिजत
घालून ठेवावी व सकाली कुसकरून थोडी खडीसाखर घालून सेवन केल्याने वरील सर्व
तक्रारी दूर होतात. मोठ्या तापानंतर आलेल्या अशक्ततेवर मनुका मनुका उपयुक्त
आहेत. रोज सकाळी १०-१५ मनुका बिया काढुन खाव्या आणि त्यावर १-१.५ कप दूध
घ्यावे. त्यामुळे भूक वाढते. अन्न पचन होते व शक्ति येते. घसा बसणे, कावीळ व
अन्नाबद्दल रूचिहीन वाटणे या विविध विकारांमध्ये मनुका खाण्याने फायदा होतो.
मनुका तुपावर परतून व त्यात चवीपुरते सैंधव घालून खाल्याने चक्कर येण्याचे
थांबते. मनुका, जेष्ठमध व गुळवेल समप्रमाणात एकत्र करून तयार केलेला काढा
पित्तावर उपयुक्त ठरतो. क्षय इत्यादी छातीच्या विकारांत खोकल्याबरोबर रक्त
पडते, त्या वेळी हा काढा घ्यावा क्षयरोगांमध्ये येणारी अशक्तता मनुक खाण्यामुळे
कमी होते.
पपई े :
[image: Papaya]

पपई हे फार मोठे औषध आहे. रोज नियमाने खाल्ल्यास भूक उत्तम लागते व अन्न पचते.
पपईचा चीक गजकर्ण, खरूज, नायटा या त्वचारोगावर लावल्यास उपयुक्त ठरतो. जंतावर
हे एक चांगले औषध आहे. हा चीक व मध दोन दोन चमचे एकत्र घोटावा. त्यात दुपट्ट
गरम पाणी घालून थंड झाल्यावर लहान मुलांना अर्धा चमचाभर ओळीने तीन दिवस द्यावा.
जंत पडून जाताट. गर्भवती स्त्रियांनी पपई खाऊ नये. त्यांना ती अपायकारक असते.
लिंबु :
[image: Lime]

लिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत. लिंबु उभे कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास
ओकारी थांबते. पोटदुखी थांबण्यास आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा.
अजीर्णावर लिंबू फार उपयुक्त आहे. ते आडवे कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव (मीठ)
घालून निखाऱ्यावर गरम करावे आणि वारंवार चोखावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी,
पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो. पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत घ्यावे.
त्याने भूक वाढते. अन्न पचते व शौचास साफ होते. मेदवृद्धि म्हणजे लठ्ठपणा कमी
करण्यासाठीही रोज लिंबाचा रस उन पाण्यात घालुन घेतल्याने उपयोत होतो. वाळलेले
लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच ओकारी थांबण्यास मदत होते.
अंगाला कंड सुटत असल्यास लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून अंगास चोळावा व ऊन
पाण्याने स्नान करावे. कंड कमी होतो. नायटे व डोक्यातील खवडे यावरही लिंबाचा रस
चोळल्याने चांगला परिणाम होतो.
जांभूळ :
[image: Jamun]

जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. तसेच ते अतिसार थांबविणारे औषध आहे. जांभळीच्या
पानांचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो.
जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम औषध आहे. परंतु ते तज्ञांच्या
सल्ल्यानेच घ्यावे.

जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. शौचास साफ होत नसेल तर त्यावर जांभळीची साल देतात.
ही साल चांगली तीन तोळे ठेवून पाण्यात एक अष्टमांश काढा करावा. व त्यात अर्धा
तोळे तूप, ३ मासे दूध व पैसाभर खडीसाखर घालून घ्यावा. दिवसातून दोन वेळा असा
घेतल्यास पाच-सात दिवसांत अतिसार व आव थांबते. स्त्रियांच्या अंगावर जाणारे
पाणीदेखील वरील काढ्याने थांबते. चांगल्या पिकलेल्या जांभळाच रस काढून बरणीत
भरून ठेवता व एक वर्ष जाऊ द्यावे. अशा रसाला जांभळाचा शिरका, जांभळाची आंब,
खाटी किंवा जांभळाचे आसव असे म्हणतात. जांभळाचे आसव तर वेळेव अर्धा तोळा चौपट
पाणी घालून

Thursday, July 21, 2011

ते बाबा असतात...

आपले चिमुकले हाथ धरून जे आपल्याला चालायला शिकवतात.... ते बाबा असतात..... आपण काही चांगले केल्यावर जे अभिमानाने सगळ्याना सांगतात..... ते बाबा असतात.... माझ्या लेकराला काही कमी पडू नए या साठी जे घाम गाळतात..... ......ते बाबा असतात.... आयुष्याच्या रस्त्यावर चालताना जे आपल्याला चुकताना सावरतात.... ते बाबा असतात... आपल्या लेकराच्या सुखा साठी जे आपला देह ही अर्पण करतात...... ते बाबा असतात...

अविचाराने किंवा अधाशीपणाने मनुष्य संकटात सापडतो

एक खूप अशक्त उंदीर होता. एकदा त्याला खूप भूक लागली म्हणून एका धान्याच्या
कणगीच्या भोकातून तो आत शिरला आणि तेथे बरेच दिवस राहून त्याने मनसोक्त खाऊन
घेतले.
खाऊन खाऊन तो इतका धष्टपुष्ट झाला की, त्याला त्या भोकातून बाहेर येता येईना.
तो तेथेच धडपडत होता.
ते पाहून एक चिचुंद्री त्याला म्हणाली, "मित्रा, ह्या भोकातून बाहेर पडायचं
असेल तर तुला परत पहिल्यासारखं बारीक व्हायला पाहिजे.

तात्पर्य - अविचाराने किंवा अधाशीपणाने मनुष्य संकटात सापडतो

आयुष्यात जिंकाल तेव्हा

"आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू विजयाची सवयच आहे, हराल तेव्हा असे
हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे...."

अ‍ॅन्ड्रॉइड’चा धुमाकूळ!

‘अ‍ॅन्ड्रॉइड’चा धुमाकूळ!

गेल्या काही वर्षांपासून बाजारात अ‍ॅन्ड्रॉईड मोबाइल फोन्सची चलती
आहे. आयफोन चांगला की अ‍ॅन्ड्रॉइड यावर अनेकांच्या रंगलेल्या चर्चाही आपण
ऐकल्या असतील. पण ‘अ‍ॅन्ड्रॉइड’ म्हणजे नेमके काय? त्याचा उपयोग, त्याची
वैशिष्टय़े आदी प्रश्न अनुत्तरितच आहेत. त्याच प्रश्नांची उत्तरे देणारा हा
लेख.

अ‍ॅन्ड्रॉइड म्हणजे नेमक काय? अ‍ॅन्ड्रॉइड फोन्स हा शब्द सारखा
कानावर पडल्याने अ‍ॅन्ड्रॉइड हा एखाद्या कंपनीचा फोन आहे असा अनेकांचा गैरसमज
असतो, खरं तर अ‍ॅन्ड्रॉइड हा कोणताही फोन नसून ती एक ऑपरेटिंग सिस्टम आहे.
ज्याप्रमाणे कॉम्प्युटर, लॅपटॉप चालविण्यासाठी विंडोज ७, विन्डोज एक्स पी या
ऑपरेटिंग सिस्टम्स असतात, तसेच मोबाईल चालविण्यासाठी गुगल या कंपनीने
अ‍ॅन्ड्रॉइड नामक ऑपरेटिंग सिस्टम विकसित केली. ‘अ‍ॅपल’ने डिझाइन केलेल्या
आयफोन्सना बाजारात टक्कर देण्यासाठी अ‍ॅन्ड्रॉइडची निर्मिती करण्यात आली होती
आणि त्यानेही आपले काम चोख बजावले.

अ‍ॅन्ड्रॉइड ही एक ओपन सोर्स सिस्टम आहे. आपल्या ताकद व गरजेनुसार
अ‍ॅन्ड्रॉइडच्या रूपात बदल करून त्याद्वारे आपण आपला फोन विकसित करू शकतो.
अगदी याच कारणामुळे डबघाईला आलेली अनेक कंपन्यांची दुकाने पुन्हा एकदा चालू
लागली आहेत. बाजारात नजर टाकली असता एचटीसी, मोटोरोला, सोनी एरेक्सन, सॅमसंग या
साऱ्या कंपन्यांनी अ‍ॅन्ड्रॉइड फोन्स डेव्हलप करण्यावरच भर दिल्याचे दिसून
येते.

काहीही असले तरी ‘एचटीसी’ हाच अ‍ॅन्ड्रॉइडचा जिवाभावाचा मित्र मानला
जातो, कारण ‘एचटीसी’नेच ‘ड्रीम’ हा पहिला अ‍ॅन्ड्रॉइड फोन बनविला, मग पुढे
आयफोनला टक्कर देण्यासाठी एचटीसीने अ‍ॅन्ड्रॉइडला सोबत घेऊन कधी ‘हीरो’, तर कधी
‘लिजेण्ड’ला बाजारात आणला. आता अ‍ॅन्ड्रॉइडला सर्व ऑपरेटिंग सिस्टमपेक्षा हटके
आणि बेस्ट बनविणाऱ्या त्याच्या फिचर्सबद्दल जाणून घेऊ या. सर्वात महत्त्वाचे
वैशिष्टय़े म्हणजे अ‍ॅन्ड्रॉइड फोन सर्वसामान्यांच्या खिशालाही सहज परवडतो.
अगदी किफायतशीर किमतीत हे फोन्स उपलब्ध होतात. तुम्ही 7 हजारांपासून पुढे
कोणताही महागडा फोन घेऊ शकता.

सर्वात जमेची बाजू म्हणजे अ‍ॅन्ड्रॉइडच्या डोक्यावर गुगल बाबांचा हात
आहे. त्यामुळे गुगलच्या सर्वच सव्‍‌र्हिसेस (यू टय़ुब, गुगल मॅप्स इत्यादी)
अ‍ॅन्ड्रॉइडवर वरदान म्हणून उपलब्ध होतात. तसेच अ‍ॅन्ड्रॉइड फोन्स फ्लॅश
सपोर्टेड असतात, त्यामुळे वेब पेजेसचा ले आऊट अगदी लॅपटॉपइतकाच चांगला दिसतो.
सध्या तरुणाईचे सर्वस्व झालेल्या सोशल नेटवर्किंगसाठी त्याचा चांगला उपयोग
होतो. फेसबुक, ट्वीटरसाठी वेगवेगळे अ‍ॅप्स वापरण्यापेक्षा फक्त कॉन्टॅक्ट नेमवर
क्लिक केले असता साऱ्या अपडेट्स एकाच ठिकाणी पाहता येतात.

अ‍ॅन्ड्रॉइडमध्ये सगळा डाटा क्लाऊडवर म्हणजे दूर असलेल्या
सव्‍‌र्हरवर सेव्ह होतो. त्यामुळे आपल्याला अनलिमिटेड फोन मेमरी व अनलिमिटेड
कॉलहिस्टरी लिस्ट मिळते. त्याशिवाय अ‍ॅन्ड्रॉइड ओपन सोर्स असल्याने आपणही
आपल्या गरजेनुसार अ‍ॅप्स बनवता येऊ शकतात. अशाप्रकारे अनेकांकडून डिझाइन केल्या
गेलेल्या उपलब्ध असणाऱ्या अ‍ॅप्लिकेशन्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

टेक्नोसॅव्ही लोकांच्या हातात अ‍ॅन्ड्रॉइडच नवीन व्हर्जन येते,
तोपर्यंत ते जुने झालेले असते. म्हणजेच अ‍ॅन्ड्रॉइड एकानंतर एक असे अनेक
सर्वोत्तम व्हर्जन्स बाजारात आणते, त्यांची नावेही जिभेला पाणी आणणारी असतात.
अ‍ॅन्ड्रॉइड१.५- कप केक, अ‍ॅन्ड्रॉइड१.६ डोनट, अ‍ॅन्ड्रॉइड २.० एक्लेअर इ.. आता
अ‍ॅन्ड्रॉइड हनिकॉम्ब व जिंजरब्रेड यांच संकरित रूप असलेल
‘अ‍ॅन्ड्रॉइड-आईस्क्रीम सॅण्डविच’ हे नवीन व्हर्जन लवकरच बाजारात आणणार आहे.

एकूणच दिवसागणिक अधिक शक्तिशाली होत जाणाऱ्या अ‍ॅन्ड्रॉइडने सध्या
साऱ्या बाजारात धुमाकूळ घातला आहे.