Thursday, July 7, 2011

हसू लपविल्याने लपत नाही

हसू लपविल्याने लपत नाही,
भावना दाखविल्या ने दिसत नाही..
नेहमीच हसण्या मागे आनंद नसतो,
नेहमीच दुःख झाले म्हणुन अश्रु गाळत नसतो..
जे मागतो ते नेहमीच मिळत नाही,
त्याग करुण सुधा त्याची कीमत कुणाला नाही..
स्वप्नाना उड़न्या साठी मोकले आकाश लागत नाही,
नुसत जिव्हाळा लागन म्हणजे प्रेम नाही..
स्वताच्या फायद्यात कुणाचे नुकसान दिसत नाही,
केलेला गुन्हा कधीच समजत नाही..
शोधल्या शिवाय काहीच सापडत नाही,
चुक केल्यावर पश्च्चातापा शिवाय पर्याय नाही..
मित्राच्या हाकेला होकार दिला नाही तर मैत्रीचा काहीच अर्थ नाही..

लाख क्षण अपूरे पडतात

लाख क्षण अपूरे पडतात
आयुष्याला दिशा देण्यासाठी
पण, एक चुक पुष्कळ आहेते दिशाहीन करण्यासाठी,,,,,,,,,,,!

किती प्रयास घ्यावे लागतात
यशाचं शिखर चढण्यासाठी
पण, जरासा गर्व पुरा पडतोवरुन खाली गडगडण्यासाठी,,,,,,,,,,,,!

देवालाही दोष देतो आपण
नवसाला न पावण्यासाठी
कितींदा जिगर दाखवतो आपण
इतरांच्या मदतीला धावण्यासाठी,,,,,,,,,!

किती सराव करावा लागतो
विजयश्रीवर नाव कोरण्यासाठी
पण, जरासा आळस कारणीभूत ठरतो
जिंकता जिंकता हरण्यासाठी,,,,,,,!

कितीतरी उत्तरं अपुरी पडतात
आयुष्याचं गणित सुटण्यासाठी
कितीतरी अनुभवातनं जावं लागतं
आयुष्य एक कोडं आहे हे पटण्यासाठी,,,,,,,,,!

विश्वासाची ऊब द्यावी लागते
नात्याला जीवनभर तारण्यासाठी
एक अविश्वासाचा दगड सक्षम आहेते कायमचं उद्धवस्त करण्यासाठी.""

नशीब म्हणजे काय?

खरय,
नशीब, नशीब म्हणजे काय?
आपण आपल्या विचारांनी किंवा कृतिने लिहिलेलं आपल्या भविष्याच पुस्तक.जी माणस विचाराने चांगली असतात त्यांना सार काही चांगल मिळत.
विचार किंवा कर्म वाईट असल कि .............?????.

मग माणस नशिबाला दोष देतात.पण त्यांना हे कळत नाही कि हा नशीब नावाचा शिलालेख आपणच आपल्या हातानी पूर्वी कधीतरी लिहिलेला असतो.

" जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत लढाईचा शेवट होण शक्यच नाही....

" जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत लढाईचा शेवट होण शक्यच नाही....आयुष्यातली प्रत्येक लढाई जिंकली नसेन कदाचित.... पण लढली जरुर आहे ... "या जन्मावर.. या जगण्यावर शतदा प्रेम करावे...!!" आणि हेच जगणे आनंदी करणारी काही नाती माझ्या आयुष्यात महत्वाची आहेत. आयुष्यातील चांगुलपणावर विश्वास. खोटेपणा, वाईट वृत्ती, माणंस यांचा तिरस्कार..!! नशीबावर विश्वास नाही.....आयुष्य तुम्हाला ज्या मार्गाने नेत असेल त्या मार्गाने जाऊ नका. तर तुम्हाला ज्या मार्गाने जायचे असेल त्या मार्गाने आयुष्याला न्या "

" वादळ कधी परवानगीची वाट पाहत दारावर थांबत का?....

" वादळ कधी परवानगीची वाट पाहत दारावर थांबत का?.... संसारात आपण कोणत्या व्यक्तिबरोबर संसार करतो आहे तिला महत्त्व द्यायला हव... संसाराला नाही...... श्रद्घा प्रेम शिकवते आणि अंधश्रद्धा फक्त बळी मागते...... "निसर्गाला रंग हवा असतो, फुलानाही गंध हवा असतो, माणूस हा एकटा राहणार कसा, कारण त्यालाही मैत्रीचा छंद हवा असतो !!!!!" ....पण फसवणाऱ्या व्यक्तिसाठी माझ्या आयुष्यात स्थान नाही....... सोय पाहून केला जातो तो व्यवहार आणि गैरसोयीतही सोय पहिली जाते ते प्रेम .....हिशोब कळतो पण किम्मत कळत नाही"

लग्न म्हणजे..

लग्न म्हणजे..
लग्न म्हणजे लग्न म्हणजे लग्न असते
दुरून राजवाडा जवळून बुरुज भग्न असते।।

लग्न म्हणजे हरवलेली छत्री असते
खूप पाऊस पडताना कधीच जवळ नसते।।

लग्न म्हणजे धार नसलेली कात्री असते,
तिची चिमटी मात्र उगीच टोचत राहते।
लग्न म्हणजे चंद्रावरचा डाग असते
वरकरणी शीतल, विवरांमध्ये आग असते।।

लग्न म्हणजे सुगरणीचा भात असते
वर कच्चा, मध्ये ठीक,जळका आत असते।
लग्न म्हणजे संपलेला रॉक असते
मधुर वयानंतरचा कॅटवॉक असते।।

लग्न म्हणजे लपवलेला खजिना असते
प्रत्यक्ष हाती चिल्लर आणा लागते।
लग्न म्हणजे पत्नीने विणलेले स्वेटर असते
नको तिथे नको तेव्हा टोचत राहते।।

लग्न म्हणजे तव्यावरची पोळी असते
ताजी बरी लागते पण लवकर शिळी होते।
लग्न म्हणजे न गजबजणारे बेट असते
कविता संपते व डिक्शनरी थेर उरते।
तरीही लग्न म्हणजे सहजीवन असते
सजा असते तरीही ती आजीवन असते।

आयुष्य फार सुंदर आहे....!


 आयुष्य फार सुंदर आहे! ..एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं... असं वाटण्याची जागा, मूल झालं की... मोठं घर झालं की... अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते . दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत . ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल , अशी आपण मनाची समजूत घालू लागतो .
मुलांच्या वाढत्या वयात, त्यांच्या भवितव्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतो. मुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरून जाईल, असं आपल्याला वाटत असतं. आपला नवरा / बायको जरा नीट वागायला लागला लागली की... आपल्या दाराशी एक गाडी आली की ... आपल्याला मनाजोगी सुटी मिळाली की ... निवृत्त झालो की ... आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईल, असं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो. खरं असं, की आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आत्ताच्या  वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही. आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश्‍चय करायचा हेच बरं नाही का? जगायला - खरोखरीच्या जगण्याला - अद्याप सुरुवात व्हायचीये , असंच बराच काळ वाटत राहतं . पण, मध्ये बरेच अडथळे असतात. काही आश्‍वासनं पाळायची असतात, कोणाला वेळ द्यायचा असतो, काही ऋण फेडायचं असतं.... आणि अगदी शेवटी कळतं, की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं. या दृष्टिकोनातून पाहिलं की कळतं, आनंदाकडे जाणारा कोणताही मार्ग नाही. आनंद हाच एक महामार्ग आहे.   म्हणून प्रत्येक क्षण साजरा करा . शाळा सुटण्यासाठी... शाळेत पुन्हा जाण्यासाठी ... वजन चार किलोने कमी होण्यासाठी... वजन थोडं वाढण्यासाठी ... कामाला सुरुवात होण्यासाठी ... एकदाचं लग्न होऊन जाऊदे म्हणून ... शुक्रवार संध्याकाळसाठी ... रविवार सकाळसाठी... नव्याकोऱ्या गाडीची वाट बघण्यासाठी... पावसासाठी... थंडीसाठी... सुखद उन्हासाठी ... महिन्याच्या पहिल्या तारखेसाठी... आपण थांबून राहिलेले असतो. एकदाचा तो टप्पा पार पडला की, सारं काही मनासारखं होईल, अशी आपणच आपली समजूत घातलेली असते. पण, असं काही ठरवण्यापूर्वी आनंदी होण्याचं ठरवा . आता जरा या पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या पाहू -   १ - जगातल्या पहिल्या दहा सर्वांत श्रीमंत माणसांची नावं सांगा पाहू. २ - गेल्या पाच वर्षांत विश्‍वसुंदरी किताब मिळवणऱ्यांची नावं आठवतायत? ३ - या वर्षीच्या पाच नोबेल विजेत्यांची नावं सांगता येतील? ४ - गेल्या दोन वर्षांतल्या ऑस्कर विजेत्यांची नावं लक्षात आहेत का? हं! काहितरीच काय विचारताय? असं तर वाटलं नाही ना तुम्हाला? पण , असं वाटलं नसलं तरी, या प्रश्‍नांची उत्तरं देमं तसं सोपं नाहीच, नाही का ? टाळ्यांचा कडकडाट हवेत विरून जातो . पदकं आणि चषक धूळ खात पडतात. जेत्यांचाही लवकरच विसर पडतो. आता या चार प्रश्‍नांची उत्तरं द्या पाहू - १ - तुमच्यावर ज्यांचा प्रभाव आहे अशा तीन शिक्षकांची नावं सांगा बरं. २ - तुम्हाला अगदी तातडीची गरज असताना मदत करणाऱ्या तीन मित्रांची नावं सांगता येतील? ३ - आपण म्हणजे अगदी महत्त्वाची व्यक्ती आहोत, असं तुम्हाला वाटायला लावणाऱ्या एखाद-दोघांची नावं सांगता येतील तुम्हाला? ४ - तुम्हाला ज्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडतो अशा पाच जणांची नावं सांगा बरं.
क्षणभर विचार करा . आयुष्य अगदी छोटं आहे.   तुम्ही कोणत्या यादीत असाल ? काही अंदाज लागतोय ? मी सांगतो. जगप्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत तुमचं नाव नक्कीच नाहिये. पण , हा मेल ज्यांना आवर्जून पाठवावा असं मला वाटलं , त्यांच्या यादीत तुमचं नाव नक्कीच आहे.... आता एक गोष्ट. काही वर्षांपूर्वीची . सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेले नऊ स्पर्धक स्पर्धा सुरू होण्याच्या संकेताची वाट पाहात जय्यत तयार उभे होते. ही सारी मुलं शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती. पिस्तुलाचा आवाज झाला आणि शर्यत सुरू झाली. साऱ्यांनाच पळता येत होतं असं नाही. पण, प्रत्येकाला स्पर्धेत भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं होतं. धावता धावता एकाचा तोल गेला. काही गोलांट्याखाऊन तो पडला आणि रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले. सारे मागे फिरले... सारे जण... " डाउन्स सिन्ड्रोम'ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसली. तिने त्याला मिठी मारली आणि मग विचारलं, ""आता बरं वाटतंय?'' मग साऱ्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत गेले. ते दृष्य पाहून मैदानावर उपस्थित असलेले सारेजण हेलावून गेले . उभे राहून मानवंदना देत साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला . बराच काळ त्या टाळ्यांचा आवाज आसमंतात गुंजत होता... त्यावेळी तिथे उपस्थित असलेली मंडळी अजूनही त्या घटनेची आठवण काढतात. का? कुठेतरी आत खोलवर आपल्याला प्रत्येकाला ठाऊक असतं की आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा कितीतरी मोठी असते. आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इतरांना जिंकायला मदत करणं. त्यासाठी वेळप्रसंगी आपला वेग कमी करावा लागतो किंवा अगदी शर्यतच बदलावी लागते. शक्‍य तितक्‍या लोकांना हे सांगा. त्यानं आपलं हृदयपरिवर्तन घडून येईल. कदाचित इतरांचंही... मेणबत्ती लावण्यासाठी वापरल्याने पहिल्या मेणबत्तीचं काहीच कमी होत नाही. नाही का ? जर आपणास हे विचार आवडले असतील तर इतरांना पाठवून विचार करावयास प्रवृत्त  करा.