Sunday, March 4, 2012

झाड...

झाड...
एक छान पाऊस पडतो अन जमिनीत लपलेल्या बीजांना अंकुर फुटतो... मग एक छोटंसं
रोपटं आपली मान धर्तीच्या वर काढतं... पण ते मोठं व्हायला कित्येक वर्ष
लागतात... नंतर कधीतरी एक लाकुडतोड्या येतो त्या झाडावर अनेक घाव करतो अन काही
तासात त्याचे लाकडाच्या छोट्या छोट्या तुकड्यात रुपांतर करतो... त्या लाकडांची
राख करायला मग एक ठिणगीच खूप असते...

नात्यांचही काही तसंच असतं...
अश्याच कुठल्यातरी क्षणी काही भेटीगाठी होतात, त्यात गप्पांचा पाऊस पडतो अन
एका नवीन नात्याला अंकुर फुटतो... मग संवादाच्या निमित्ताने हे नातं आपली मान
वर काढतं... आणि हे नातं जपून ठेवायला वर्षानुवर्षे लागतात... त्याला जोपर्यंत
'विश्वासाचं' खत-पाणी दिलं जातं तोपर्यंत ते सुखरूप वाढतं... पण जर त्यात
'गैरसमज' आला तर मग त्या नात्याचे छोटे छोटे तुकडे होतात... कारण तेंव्हा घाव
सरळ मनावर होतात... आणि एकदा मनं बिघडली की मग त्या नात्याची राख व्हायला
संशयाची एक ठिणगीच खूप असते...

 

जगात तीन प्रकारची माणस असतात...

जगात तीन प्रकारची माणस असतात...
१. 'वाट' बघणारे
२. 'वाट' लावणारे
अन
३. 'वाट' शोधणारे

शब्द तोच आहे ... पण त्याच्या उपयोग जो तो आपल्या हिशोबाने करतो...

काही लोक, 'जे होत ते चांगल्या साठीच होत' असं म्हणत काहीतरी होण्याची 'वाट'
बघत बसतात... पण त्याला जर कृतीची साथ नसेल तर मग त्यांची 'वाट लागते'...

'वाट' लावणाऱ्या बद्दल तर बोलायलाच नको... हे लोक पूर्ण वेळ स्वतः खाली राहून
दुसऱ्याला सुद्धा खाली ओढण्यात मग्न असतात... त्यांच्या आनंदाची परिसीमा
तेवढीच...

त्यातला तिसरा वर्ग महत्वाचा... 'वाट शोधनार्यांचा' ... कितीही संकटं, कितीही
अडथळे आले तरी जिद्दीने नवीन वाट शोधणारे मग पुढे निघून जातात...
आपण कुठली 'वाट' निवडायची ते आपणच ठरवायचं....

इच्छा असली तर मार्ग सापडतोच !!!
 

आयुष्यातले सगळेच निर्णय आपण आपल्या मनाप्रमाणे घेऊ शकत नाही...

आयुष्यातले सगळेच निर्णय आपण आपल्या मनाप्रमाणे घेऊ शकत नाही...
काही निर्णय अशे असतात जे घेऊन आपण परिस्थितीवर मात करतो... तर काही निर्णय
अशे असतात जे आपल्यावर 'लादून' परिस्थिती आपल्यावर मात करते...
पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवावी... कुठलाही निर्णय घेतल्यावर त्याचा परिणाम काय
होईल हे जसं आपण सांगू शकत नाही तसंच परिस्थितीने आपल्यावर लादलेल्या
निर्णयाचा परिणाम देखील काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही... खुद्द परिस्थिती
सुद्धा नाही... अमुक निर्णय परिस्थितीने लादला म्हणजे त्याचा परिणाम वाईटच
होणार हे जेंव्हा आपण गृहीत धरतो तेंव्हाच आपण परिस्थितीला आपल्यावर मात
करायची संधी देतो...

त्याउलट आपण एकच करावं... पूर्ण ताकदीनिशी झगडावं आणि खंबीरपणे परिस्थितीला
सामोर जावं... ही लढाई प्रत्येकवेळेस तुम्ही जिंकालच असे नाही... कधी
परिस्थितीही जिंकेल.. पण atleast लढता लढता हारल्याच समाधान तर मिळेल... आणि
हेच समाधान तुम्हाला पुढच्या लढाईसाठी सज्ज होण्याची शक्ती सुद्धा देईल...


 

मी प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर एक नवीन सकाळ होतांना पाहिलीये !!!

कडक उन्हात चालावं लागलं कधी तर थकून जाऊन थांबू नकोस... चालत रहा..
कारण मी कडक उन्हानंतर पडणारा मुसळधार पाऊस पाहिलाय...

चालतांना टोचलेत काटे जरी तरी चालत रहाणं थांबवू नकोस...
कारण मी काट्यांना फुलांचं रक्षण करतांना पाहिलंय...

वाटेत आले कितीही अवरोध तरी बावरून वगैरे जाऊ नकोस...
कारण मी अवरोधांना अनेक 'अपघात' होणं टाळतांना पाहिलंय...

गमावलस जरी बरंच काही तरी त्याच्या शोकात हरवून जाऊ नकोस...
कारण सर्व पान झडलेल्या वृक्षांना मी नवीन अंकुर फुटतांना पाहिलंय...

झालाच कधी अंधार आयुष्यात तर स्वतःला असहाय्य मानू नकोस...
कारण मी प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर एक नवीन सकाळ होतांना पाहिलीये...

मी प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर एक नवीन सकाळ होतांना पाहिलीये !!!

आपली सावली...

आपली सावली...
पण तिला आपली म्हणणं कितपत योग्य आहे हे मला नाही कळत...
ती सावली... ती आपली नसतेच मुळी... तिचं नातं सूर्याशी.. त्याच्या
प्रकाशाशी... सूर्य डोक्यावर आला की तीही आपल्या पायाखाली कुठेतरी लपून
बसते... आपल्याला चटके खायला एकट सोडून... अन सूर्य अस्ताला आला की ती आपले
पांग पसरते... आपण असतो त्यापेक्षा दुप्पट जागा ती व्यापते... मग तिला आपलं
म्हणावं तरी कसं... ती अंधारात आपली साथ सोडते म्हणतात... अरे पण मी म्हणतो
त्या अंधाराला का उगीच दोष... त्याचा गुणधर्मच तो... आणि सावली तरी नेमकी काय
हो... तो सुद्धा अंधारच... रंगीत सावली पाहिलीये का कधी !!
सगळा आपल्या विचारांचा अंधार...
शेवटी आपलं असतं कोण... कुणीच नाही... आपले आपणच असतो ... बस्स !!!!

--

स्वभावधर्म

प्रत्येकाचा स्वभावधर्म वेगवेगळा असतो. जसा विंचवाचा नांगी मारण्याचा स्वभावधर्म आहे, तसा आपला धर्म, दया दाखविण्याचा, दुसऱ्यांच्या सुखदु:खात सहभागी होण्याचा, त्यांची काळजी घेण्याचा आहे. त्यामुळे इतरांच्या वाईट वागण्याचा आपल्यावर प्रभाव पाडू देऊ नये. त्यांच्या अंत:करणातील अंधारामुळे आपल्या हृदयातील प्रकाश विझू देऊ नये, प्रकाशाची ज्योत तेवतच ठेवलीच पाहिजे…

मी

निळ्या स्वप्नात रमणारा मी
स्वप्न पहाट उजाडण्याची वाट पाहतो
भावनांच्या ओल्या वाळूवर
पावलांचे ठश्यावर ठसे उमटवतो !!
बेचैन वेदनेत रमणारा मी
ओल्या दवात भिजत राहतो
पावसात खेळता खेळता
ओले पाय किनार्यावर रुतवतो !!
रात्रीचे उसाशे पेलणारा मी
वेदनांचे हुंकार झेलीत राहतो
पंख मिटल्या झोपड्यांचे
दुःख अनुभवत राहतो
जीवनाचे संदर्भ कधी शोधतो
तर कधी मोजत राहतो ......