Saturday, January 14, 2012

*उपदेश देयला सगलेच असतात
मात्र समजून घेणार कोणीच का नसते
सुखात सगलेच सहभागी होतात
पण दुखत मात्र अदृश्य का होतात
जीवंत असताना कोणीच जवळ नसते
मग मेल्यावर का सगळे एकत्र येतात
हे आयुष्य असे का असते
जिथे गरज असताना कोणीच का नसते.....??*

* मैत्री करत असाल तर *

*मैत्री करत असाल तर
पाण्या सारखी निर्मळ करा
दूरवर जाऊन सुद्धा
क्षणों क्षणी आठवेल अशी करा

मैत्री करत असाल तर
चंद्र तारे यां सारखी अतूट करा
ओंजळीत घेवून सुद्धा
आकाशात न मावेल अशी करा

मैत्री करत असाल तर
दिव्यातल्या पणती सारखी करा
अंधारात जे प्रकाश देईल
हृदयात अस एक मंदीर करा

मैत्री करत असाल तर
निसर्गापेक्षा ही सुंदर करा
शेवट पर्यंत निभावण्या करता
मरण सुद्धा जवळ करा..!!!

शेवटी एकच सांगू इच्छीतो की,
मैत्री करत असाल तर
नुसतेच मित्र म्हणुन Add करून ठेवू नका
किमान एक mail करून आपण *
*या मित्राची/मैत्रीणीची आठवण ठेवा......!!!!!
*

काही म्हणी .................

 
     म्हणी तर सर्वांना माहित आहेतच आणि त्याचा वापरही आपण करतो पण सगळ्याच म्हणींचा अर्थ आपल्याला माहित आहे का? काही म्हणी आणि त्यांचे अर्थ दिले आहेत ..अजून कोणाला वेगळ्या म्हणी आणि त्याचे अर्थ माहित असेल तर प्लीज शेअर करा .. # पी हळद हो गोरी - उतावळेपणा दाखविणे # मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही - प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही # बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर - दोनपैकी एक पर्याय निवडणे # चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे - प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच # आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे - अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे # उंटावरचा शहाणा - मूर्ख सल्ला देणारा # अडला हरी गाढवाचे पाय धरी - अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते # नाचता येईना अंगण वाकडे - स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो # तोंड दाबून बुक्क्यांचा मार - विनाकारण जुलूम सहन करावा लागणे # नावडतीचे मीठ अळणी - नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही # अंथरूण पाहून पाय पसरावे - ऎपत पाहून खर्च करवा # छत्तीसाचा आकडा - विरुद्ध मत असणे # तेरड्याचा रंग तीन दिवस - एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे # दुष्काळात तेरावा महिना - संकटात अधिक भर # नव्याचे नऊ दिवस - नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही # एका हाताने टाळी वाजत नाही - दोष दोन्हीकडे असतो # पालथ्या घड्यावर पाणी - सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे # वासरात लंगडी गाय शहाणी - अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो # रात्र थोडी सोंगे फार - काम भरपूर, वेळ कमी # अति शहाणा त्याचा बैल रिकामा - अति शहाणपणाने नुकसान होते # शेरास सव्वाशेर - प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ # नाकाचा बाल - अत्यंत प्रिय व्यक्ती # नाकापेक्षा मोती जड होणे - डोईजड होणे # आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना - दोन्ही बाजूंनी अडचण # कामापुरता मामा - काम साधण्यापुरते गोड बोलणे # आधी पोटोबा मग विठोबा - अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे # काखेत कळसा गावाला वळसा - वस्तू स्वत:पाशी असून शोधत राहणे # झाकली मूठ सव्वा लाखाची - दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत # पायीची वहाण पायी बरी - योग्यतेप्रमाणे वागवावे # मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये - एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊ नये # उंटावरून शेळ्या हाकणे - आळस, हलगर्जीपणा करणे # कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही - क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही # कोल्हा काकडीला राजी - लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात # गाढवाला गुळाची चव काय - अडाणी, मूर्ख माणसास गुणाचे कौतुक नसते # घोडामैदानजवळ असणे - परीक्षा लवकरच होणे # डोंगर पोखरून उंदीर कढणे - जास्त श्रम करून कमी फायदा होणे # भरंवशाच्या म्हशीला टोणगा - पूर्ण निराशा करणे # वरातीमागून घोडे - एखदी गोष्ट झाल्यावर तिची साधने जुळवणे # पाण्यात राहून माशाशी वॆर - बलवानाशी शत्रुत्व काय कामाचे? # खायला काळ भुईला भार - ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो # तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले - दोन्ही फायदा करून देणाऱ्या गोष्टी मूर्खपणामुळे हातच्या जाणे # नाव मोठे लक्षण खोटे - कीर्ती मोठी पण कृती छोटी # हपापाचा माल गपापा - लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते # कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ - आपल्याच हातून आपल्या जातभाईंचे नुकसान होणे # गर्जेल तो पडेल काय? - पोकळ बडबडणारा काही करून दखवत नाही # टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नही - कष्टाशिवाय यश मिळत नाही # वारा पाहून पाठ फिरवावी - वातावरण पाहून वागावे # कुंपणानेच शेत खाणे - रक्षणकर्त्यानेच नुकसान करणे # दगडावरची रेघ- कायमची गोष्ट जेवढे माहित होते ते लिहिले अजून जास्त कोणाला माहित असतील तर सांगा !!! --